कोणत्याही उपकरणाविना नकाशा तयार करणा-याचं कौतुक करावं तितकं कमीच!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
उत्तराखंड राज्यातील पिथौरगड जिल्ह्यात एक मिलम नावाचे गाव आहे. या गाव २१ ऑक्टोबर १८३० ला मानचित्रकार नैन सिंघ रावत यांचा जन्म झाला. नैन सिंघ रावत एक असे भारतीय आहेत ज्याचं नाव इंग्रज देखील मोठ्या सन्मानाने घेतात. याला कारण म्हणजे त्यांची चित्रकारिता.
नैन सिंघ रावत यांनी कुठल्याही उपकरणा शिवाय संपूर्ण तिबेट चा नकाशा तयार केला होता. हा तो काळ होता जेव्हा तिबेट येथे कुठल्याही विदेशी व्यक्तीला जाण्यास परवानगी नव्हती.
जर कोणी चोरून तिबेट मध्ये प्रवेश घेण्यात सफल झाले, तर तो पकडल्या गेल्यावर त्याला सरळ सरळ फाशीची शिक्षा ठोठवण्यात यायची. अश्या धोकादायक परिस्थितीतही नैन सिंघ रावत यांनी न केवळ तिबेट मध्ये प्रवेश मिळविला तर संपूर्ण तिबेट मोजून त्याचा नकाशाही तयार केला आणि तेही केवळ दोरखंड, कंपास आणि थर्मामीटरच्या सहाय्याने. त्यांची ही कामगिरी त्यांची शूरता आणि चातुर्य दर्शविते.
१९ व्या शतकात इंग्रज संपूर्ण भारताचा नकाशा तयार करत होते. भारताचा नकाशा पूर्ण झाल्यावर त्यांना तिबेटचा नकाशा तयार करायचा होता, पण फॉरबिडन लैंड मानल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये कुठल्याही विदेशी व्यक्तीला जाण्यास मनाई होती.
त्यामुळे एखाद्या भारतीय नागरिकाला येथे पाठविण्याची योजना आखण्यात आली. यासाठी इंग्रज एका अश्या व्यक्तीच्या शोधात होते जी हे काम चोखपणे करू शकेल. १८६३ साली इंग्रजांना अखेर ते व्यक्ती सापडले, ते होते पंडित नैन सिंघ आणि त्यांचा चुलत भाऊ मनी सिंघ.
हे ही वाचा –
===
या दोघानांही ट्रेनिंग देण्याकरिता देहरादून येथे आणण्यात आले. त्या काळात दिशा आणि अंतर मोजण्याचे यंत्र हे आकाराने खूप मोठे असायचे. त्यामुळे त्यांना तिबेटमध्ये नेणे धोक्याच असू शकत होतं. कारण या यंत्रांमुळे ते दोघेही पकडले गेले असते.
जर असे झाले असते तर त्यांना फाशीची शिक्षा झाली असती. या सर्व कारणांमुळे या दोन्ही भावंडांना एक छोटा कंपास आणि तापमान मोजण्याकरिता थर्मामीटर देण्यात आले.
अंतर मोजण्याकरिता नैन सिंघ यांच्या पायांना ३३.५ इंचेची दोरी बांधण्यात आली. जेणेकरून त्यांचे पाय एका ठराविक अंतरापर्यंतच जाऊ शकतील. हिंदूंची १०८ मण्यांच्या माळी ऐवजी त्यांनी आपल्या हातात १०० मण्यांची माळ घेतली, त्यामुळे त्यांना मोजमाप सोपे झाले. १८६३ साली या दोनह भावंडांनी वेगवेगळा मार्ग धरला. नैन सिंघ रावत हे काठमांडू मार्गे तर मनी सिंघ हे काश्मीरच्या मार्गे तिबेट करिता निघाले. पण मनी सिंघ या योजनेत असफल ठरले आणि ते परत आले. मात्र नैन सिंघ यांनी त्यांची यात्रा कायम ठेवली.
नैन सिंघ हे तिबेट येथे पोहोचण्यात यशस्वी झाले, त्यांनी त्यांची ओळख लपविण्यासाठी बौद्ध भिक्खूचं रूप घेतल आणि तिथल्या लोकांमध्ये वावरायला लागले. ते दिवसा शहरात फिरत आणि रात्री एखाद्या उंच ठिकाणावरून तार्यांची गणना करत. ती गणना ते कवितेच्या स्वरुपात लक्षात ठेवत.
लहासा हे समुद्र तळापासून किती उंचीवर आहे, हे नैन सिंघ रावत यांनीच पहिल्यांदा जगाला सांगितले. त्याचे अक्षांश आणि देशांतर सांगितले. एवढचं नाही तर त्यांनी ब्रह्मपुत्रा नदी सोबत जवळजवळ ८०० किमीची पायी यात्रा केली आणि जगाला हे सांगितले की सवंग आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्या एकच आहेत. त्यांनी जगाला तिबेटच्या कित्येक न उलगडलेल्या राहस्यांशी अवगत करविले.
१८६६ साली नैन सिंघ रावत हे मानसरोवरमार्गे भारतात परतले. १८६७-६८ साली ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माणा येथून मार्गक्रमण करत ते तिबेटच्या थोक जालुंग येथे पोहोचले, जिथे सोन्याच्या खाणी होत्या. त्यांची तिसरी मोठी यात्रा ही १८७३-७४ साली करविण्यात आली, ही शिमला ते लेह आणि यारकंद ची होती.
हे ही वाचा –
===
त्यांची शेवटची आणि सर्वात महत्वाची यात्रा ही १८७४-७५ साली झाली.ज्या दरम्यान ते लडाख ते लहासा गेले आणि तेथून आसाम पोहोचले. या यात्रे दरम्यान ते काही अश्या ठिकाणांवरून गेलेत जिथे या आधी कोणीही मनुष्य पोहोचू शकला नव्हता.
पंडित नैन सिंघ रावत यांच्या या कामगिरीला ब्रिटीशांच्या सरकारने देखील सन्मानित केले. याचं फलस्वरूप त्यांना १८७७ साली बरेली जवळील ३ गावांची जागीरदारी उपहार म्हणून देण्यात आली. या व्यतिरिक्त त्यांच्या या धाडसी कार्याला बघता ‘कम्पेनियन ऑफ द इंडियन एम्पायर’ चा खिताब त्यांना बहाल करण्यात आला.
अश्या या शूर आणि धाडसी व्यक्तिमत्वाची दखल गुगलने देखील घेतली आणि २१ ऑक्टोबर ला पंडित नैन सिंघ यांच्या १८७ व्या जन्मदिनी त्याचं डूडल प्रदर्शित केलं.
अखेर १ फेब्रुवारी १८८२ ला मुरादाबाद येथे कॉलरामुळे नैन सिंघ रावत यांचा मृत्यू झाला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.