हे “५ पदार्थ” तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यात मदत करतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण आणि आपली मित्रमंडळी चित्रपटातील सलमान, शाहरुख, ह्रितिकची बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून भारावून जातो, त्यासारखे सिक्स पॅक अॅब्स आपले देखील असावेत, असे आपल्याला नेहमी वाटत असते. त्यासाठी आपण जिममध्ये जाऊन खूप वेळ व्यायाम करतो.
पण हे सर्वकाही केल्यानंतर देखील आपले काही सिक्स पॅक अॅब्स बनत नाहीत, त्याऐवजी आपले पोट आणखी सुटत जाते.
पोट सुटल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग तुम्ही विचार करता की, मी सर्व काही करून देखील माझे पोट का सुटले?
आज तुमच्या याच प्रश्नावर आम्ही काही उपाय घेऊन आलो आहोत.
तुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटते, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आज आम्ही तुम्हाला यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे, हे सांगणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊ या या उपायांबद्दल…
१. दही
सर्वच डेअरी उत्पादनांमुळे गॅस निर्माण होतोच असे नाही. चीज आणि दुध आपले पोट सुटणे थांबवू शकते. पण दही विशेषतः ग्रीक योगर्ट (दह्याचा एक प्रकार) आपल्याला या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो.
याचे कारण असे की, दही हे चांगले जीवाणू (Good Bacteria) तयार करतात, ज्यामुळे आपल्या आतड्यांमधील अन्नप्रक्रिया चांगल्याप्रकारे होते आणि त्यामुळे सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.
प्रोबायोटिक दह्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन ठेवण्यास मदत होते.
–
- पोटाचा घेर वाढतोय? टेन्शन घेण्याऐवजी हे साधे-सोपे उपाय करा… फिट रहा..
- बारीक होण्यासाठी मांसाहार सोडताय, पण तरीही वजन वाढू शकतं! म्हणून या चुका टाळा
–
२. काकडी (पाण्याची मात्र जास्त असलेल्या भाज्या आणि फळे)
जास्त प्रमाणात पाणी पिल्याने आणि जास्त पाणी असलेल्या भाज्या किंवा फळे खाल्ल्याने तुम्ही तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता. काकडी हे तुमचे पोट साफ करण्यासाठी उत्तम आहे.
काकडी, टरबूज, द्राक्षे आणि अननस यांच्या मदतीने फुगलेले पोट तुम्ही कमी करू शकता. अननसमध्ये पोटॅशियम असते, ते पोटातील पाणी संतुलित करते. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी अननस आवर्जून खाल्ले पाहिजे.
३. आलं (आद्रक)
पोटाच्या दुखण्यावर आलं हे एक रामबाण उपाय आहे. आलं आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. आल्याचे चमत्कारिक आणि आरोग्यमय फायदे आहेत.
त्यातलाच एक फायदा म्हणजे हा फुगलेले पोट कमी करण्यात मदत करतो. आलं हे आतड्यांना साफ करण्याचे काम करते आणि यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
४. केळी
केळी ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते आणि त्याचबरोबर आळशी माणसांना देखील केळी आवडतात. त्यामुळे केळी खायला आवडणार नाहीत, असे कोणतेही कारण नाही आहे.
पण कधीही पूर्णतः पिकलेली खेळीच खावीत, कारण कच्चे केळे खालल्याने गॅस होतो.
केळी जर तुम्ही योग्य त्या प्रमाणात खाल्लात, तर तुम्ही तुमचे सुटलेले पोट आटोक्यामध्ये आणू शकता.
–
- नकोश्या कडवट डाएटपेक्षा हे पदार्थ म्हणजे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करण्याचा पौष्टिक मार्ग!!
- नवरात्रीत खेळला जाणारा गरबा म्हणजे फक्त मनोरंजन नाही. हे आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे!
–
५. ओट्स
ओट्समध्ये विद्रव्य फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हा एक स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. ओट्स हे गॅस आणि बद्धकोष्ठतेसाठी उपयोगी आहे. ओट्समुळे बद्धकोष्ठता टाळता येत असल्याने, तुमचे पोट सुटत नाही. विद्रव्य फायबरचे इतर स्त्रोत हे सफरचंद, पेर आणि स्ट्रॉबेरी हे आहेत.
वरील सर्व खाद्यपदार्थ तुमच्या अस्वस्थ भावनांना दूर करण्यास मदत करेल. या पदार्थांचे योग्यरीत्या सेवन केल्याने तुम्ही फिट राहू शकता आणि तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.