आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
====
सध्या जग मोबाईलमुळे जरी जवळ आलं असलं, तरी माणसा माणसांतलं अंतर मात्र वाढत चाललं आहे. आता कुणीही एकमेकांशी संवाद साधण्याकरिता मोबाईलचाच वापर करतात. त्यामुळे परस्पर संवाद कमी होत चालला आहे. त्यातच तरुण-तरुणींना या मोबाईलचं जास्त वेड. गेम खेळण्यापासून ते एखाद्या मुलीला प्रपोज करण्यापर्यंत सर्व आपण या मोबाईल द्वारे करतो.
आपल्याला आवडत्या मुलीशी गप्पागोष्टी करण्यासाठी साथ देतो तो हाच मोबाईल. आजकाल ऑनलाईन चॅटिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कित्येक जण याच चॅटिंगच्या माध्यमातून आपले प्रियकर निवडतात. आपल्या प्रेयसीकडे आपलं प्रेम व्यक्त करतात.
तुमची देखील अशी कोणती मैत्रीण आहे का? किंवा एखाद्या मुलीशी तुम्हाला मैत्री करायची आहे का ? हो ना. पण काही कारणांमुळे तुम्ही त्यात मागे पडत असला तर या काही टिप्स तुमच्यासाठीच आहेत. जर तुम्ही कोणत्या मुलीशी चॅट करताय, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधताय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे तिने तुम्हाला रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. जर ती रिस्पॉन्स देत असेल. तर तिच्या सोबत चॅट करण्यात, मैत्री वाढविण्यात काहीही हरकत नाही.
१. आत्मविश्वास महत्वाचा
जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या मुलीला भेटता, तेव्हा तिच्या देहबोलीतूनच तीला तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे की नाही हे कळेल. जर तिला तुमच्याशी बोलण्याची इच्छा असले तर मग तुम्ही पुढे संवाद वाढवू शकता. तुम्ही स्वतःच्या दिसण्याची फारशी काळजी न करता तिच्यासमोर आत्मविश्वासाने बोला.
२. तिच्या आवडी निवडी विचारा
मुलींना आपलच म्हणणं दमटवणारे लोकं सहसा आवडत नाहीत. तेव्हा तिला तिच्या आवडी निवडी विचारा. एखादी गोष्टं का आवडते या मागचं कारण विचारा, तसेच जमल्यास तिच्या आवडीचं कौतुक करा.
तुमचं हे संभाषण एकतर्फी होणार नाही ना याची काळजी घ्या. या गोष्टी तिला तुमच्या बोलण्यात गुंतवून ठेवतील. तिला अधिक बोलण्यास वाव द्या.
३. तिची काळजी घ्या
तुमच्या बोलण्यातून तुम्हाला तिची काळजी आहे हे कळू द्या. तिचा आधीचा दिवस खराब गेला असेल तर आज कसं वाटतंय, आजचा दिवस कसा गेला हे विचारा. तुम्ही जर तिच्याबाबत काळजी व्यक्त केली आणि तिचे म्हणणे ऐकून घेतले तर तिच्या गुडबुकमध्ये तुम्ही असणारच.
४. तिच्या बद्दल उत्सुकता असूद्या
तुमच्या आवडत्या मुलीशी व्हर्च्युअल मैत्री झाल्यावर ती तुमच्याशी सहज आणि खुलून बोलते हे लक्षात आल्यावर तुम्हाला तिला बघायचं आहे. भेटायचं आहे हे सांगा. जमल्यास तिला वेब कॅम चॅटिंग करण्यात इंट्रेस्ट आहे का ते विचारा.
तिने होकार दिला (अर्थातच) तर तिच्याशी वेबकॅम चॅटिंग करा. तिने होकार दिल्यावर तुम्ही तिला आवडता हे जवळ जवळ निश्चितच झाल्यात जमा आहे.
हसऱ्या चेहऱ्याने चॅटिंगला सुरवात करा. चॅटिंगची वेळ तिला आवडेल अशी असावी हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तिचे आवडते विषय तुम्ही तिच्याशी बोला. जेणेकरून वातावरण हलकं फुलकं आणि गप्पीष्ट असल्याचं तुमच्या वागण्यातून जाणवू द्या.
५ . मोहक आणि हजरजबाबी रहा
मुली त्या मुलांसोबत त्या व्यक्तींसोबत जास्त वेळ घालवतात ज्यांच्यासोबत त्या स्वतःला सुरक्षित समजतात. त्यांना तुम्ही सोबत असल्यावर सुरक्षित वाटण आवश्यक आहे. तसेच तिचा मुड फ्रेश ठेवा. हजरजबाबीपणे जोक्स करा. तिच्या चेहऱ्यावर हसू येईल किंवा ती हसेल तिला आवडतील असे जोक्स केल्याने तिचा मुड फ्रेश राहिल.
सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आहात तसे रहा, आपला स्वभाव, पेहराव यात कुठेही खोटेपणा जाणवू देऊ नका. खरी परिस्थिती आणि खऱ्या गोष्टी बोलल्यास त्या लपवण्यासाठी नंतर कष्ट घ्यावे लागणार नाही.
तुम्ही खरे पणाने वागल्यास तुम्ही एखाद्या महिलेचं हृदय जिंकू शकता. याचीसाठी केला होता अट्टाहास कारण शेवट गोड व्हावा. हे लक्षात असू दे.
ज्या मित्रांना ह्या सगळ्या टिप्सची गरज आहे त्यांच्या सोबत हे आर्टिकल नक्की शेअर करा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.