Site icon InMarathi

परदेशातील अख्खा काळापैसा भारतात परतला तर काय होईल?- एका इकोनॉमिस्टचं उत्तर निराशाजनक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतातला काळा पैसा परदेशात अडकून पडला आहे आणि तो पुन्हा भारतात आणला पाहिजे अशी चर्चा आपल्याकडे नेहमी होत असते. हा तसा नवीन विषय नाही. गेली लोकसभा निवडणूक ज्या काही मुद्द्यांवर लढवली गेली त्यातला हा एक अग्रगण्य मुद्दा होता.

काळा पैसा परत आणून त्याचा भारतात पायाभ्हुत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी वापर केला जाईल असे वचन विद्यमान सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते, आणि लोकांनी त्यांना सत्तेवर विराजमान केले.

त्यांनी वचनपूर्ती केली नाही यावर एक वेगळी चर्चा होऊ शकेल. पण काळा पैसा परत आल्याने नक्की काय फरक पडेल याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण माध्यमातील गरमागरम चर्चांमध्ये दोन्ही बाजूंनी होताना दिसलं नाही.

हा काळा पैसा म्हणजे नेमका काय असतो? तो परदेशात जातो कसा? तो परत कसा आणायचा आणि परत आणला त्याचा इथल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याबाबत सामान्य माणूस अजूनही अज्ञानात आहे असे म्हटल्यास ती अतीशयोक्ति ठरणार नाही..

 

newsgram.com

याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत..

जर काळा पैसा भारतात परत आला तर काय होईल? असा प्रश्न क्वोरा या वेबसाईट वर विचारण्यात आला होता. ज्यावर अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या सुबोध माथुर यांनी अतिशय अभ्यासक उत्तर दिले आहे.

त्यांनी या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे वाचा…

No one knows how much black money is held abroad. The core estimate here is $ 500 billion.

विदेशात किती काळा पैसा आहे हे कुणालाही माहित नाही. तरी अंदाजे ते ५०० बिलियन डॉलर असावे.

is it all in the form of cash? No. People have property of various types. But, let’s say that $ 500 billion comes back to India.

पण काय ते सर्व रोख रकमेच्या स्वरुपात आहे? तर नाही, लोकांची संपत्ती वेगवेगळ्या स्वरुपात असते. पण तरी आपण असं मानून चालू की, ५०० बिलियन डॉलर भारतात परत आले.

If it comes back through the Reserve Bank of India, India will get this money in dollars. India today has a balance of $ 400 billion – so, this is a huge boost. It would make the rupee stronger – which would hurt exporters.

 

goodreturns.in

जेव्हा ते रिसर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारतात येईल, तेव्हा तो पैसा डॉलर्सच्या स्वरुपात असणार. सद्य स्थितीत भारताकडे ४०० बिलियन डॉलर आहेत, समजा जर असे झाले तर त्याने आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल. त्याने आपला रुपया मजबूत होईल. ज्याचा परिणाम निर्यातदारांवर होईल.

When the money is converted into rupees, the money supply will increase in a major way. Therefore, there is a risk of rising inflation . After all, the additional rupees will be spent somewhere in India – all of a sudden!

जेव्हा तो पैसा रुपयात बदलल्या जाईल, तेव्हा पैश्यांच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. शेवटी हा अतिरिक्त पैसा भारतातच कुठेतरी खर्च केल्या जाईल आणि तेही अचानकपणे.

The rising inflation will weaken the rupee over time, so the rupee would first strengthen and then weaken – a yo-yo effect.

या वाढत्या महागाईमुळे काही काळानंतर आपला रुपया परत कमकुवत होईल. म्हणजेच, आपला रुपया पहिले मजबूत होईल आणि मग कमकुवत. शेवटी काय तर, ‘पहिले पाढे ५५’…

Presumably, the black money would have to pay some tax. Let’s say it is 25%. This means $ 125 billion more for GOI. The GOI annual budget is about $ 340 billion. Say the Government spends the black tax money in 5 years, i.e., $ 25 billion more per year. That’s not a dramatic increase in the GOI budget, though every rupee is valuable.

 

indianexpress.com

ह्या काळ्यापैश्यावर काही कर देखील आकारण्यात येईल असे आपण गृहीत धरू. समजा तो कर रकमेच्या २५ टक्के असेल. म्हणजेच १२५ बिलियन डॉलर आणखी आपले सरकारला मिळाले. भारत सरकारचं वार्षिक बजेट हे ३४० बिलियन डॉलर एवढ आहे.

जर सरकारने ५ वर्ष्यांच्या कालावधीत हा काळ्या पैश्यांवरील कर खर्च केला, म्हणजेच २५ बिलियन डॉलर वर्षाला. हा पैसा भारत सरकारच्या बजेट मध्ये काही खूप मोठा बदल घडवून आणणार असे नाही, तरी प्रत्येक वाढ ही महत्त्वाचीच.

After tax, the people still have $ 375 billion. Some of it will be consumed, and some will be invested. Let’s split it 50–50.

कर भरल्यावर देखील आपल्याकडे ३७५ बिलियन डॉलर उरतात. त्यापैकी काही वापरण्यात येईल, तर काही गुंतवले जातील. त्याला आपण ५०-५० टक्क्यांत विभागू.

So, we get $ 190 billion for investment. Spread it over 3 years (faster than GOI), which gives $ 65 billion per year. Current investment in India is over $ 600 billion per year. So, investment will increase, but not a dramatic increase.

तर आता आपल्याकडे १९० बिलियन डॉलर आहेत गुंतवणुकीसाठी. हे आपण तीन वर्षांकरिता विभाजित केले, ज्यामुळे आपल्याला ६५ बिलियन डॉलर दर वर्षाला मिळणार. भारताची दर वर्षाला सध्याची गुंतवणूक ६०० बिलियन डॉलर एवढी आहे. यामुळे आपली गुंतवणूक तर वाढणारच पण काही खूप मोठ्या प्रमाणात नाही.

 

meghainvestments.com

Let’s say that the consumption of $ 190 billion is spent in 2 years, which gives $ 95 billion per year. Consumption in India is over $ 1,200 billion per year (Indian economy is over $ 2.5 trillion). So, consumption will increase, but not a dramatic increase.

समजा उर्वरित १९० बिलियन डॉलरचा वापर २ वर्षांत करण्यात आला. म्हणजेच ९५ बिलियन डॉलर वर्षाला. सध्या भारतात १,२०० बिलियन डॉलर दर वर्षाला वापरण्यात येतो आहे. (भारताची अर्थव्यवस्था ही २.५ ट्रीलीयन आहे). तर वापर वाढेल पण त्याचा काही खूप मोठा परिणाम होणार नाही.

In conclusion, bringing back all the black money will help – but it is not a game changer.

And, it’s unrealistic to think all of it can come back.

एकंदरीतच सांगायचं झालं तर, भारताबाहेरील सर्व काळा पैसा परत आणल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला मदत होणारच, पण ती काही गेम चेंजर वगैरे ठरणार नाही.

आणि काळा पैसा भारतात येईल याचा विचार हा पूर्णतः काल्पनिक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version