Site icon InMarathi

विमानांचा रंग पांढराच का असतो – जाणून घ्या!

white plane im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लांबचा प्रवास म्हणलं की सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या येतात. नको तो लांबचा प्रवास, त्यापेक्षा पैसे गेले तरी विमानाची तिकिटे काढून जाऊया म्हणतात हल्ली लोक. खरंच विमानामुळे प्रवास किती सुखद झालाय ना? त्यात अजून चांगली गोष्ट म्हणजे वेळ वाचतो.

.

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का विमाने पांढऱ्या रंगाचीच का असतात?

डोकं खाजवू नका, आम्ही देतो उत्तर! 😀

खरं तर त्यामागे बरीच कारणं आहेत, त्यातली ठळक आहेत:

पांढरा रंग हा एव्हरग्रीन रंग आहे!

 

.
हे आहे TWA L1011, तब्बल 15 वर्षांपासून इथे लावलेलं आहे. चित्रातून दिसेल की लाल रंग उडून गेलाय, धूसर झालाय. पण पांढरा तसा वाटत नाही!

म्हणजेच – बाकीचे रंग उन्हाने, पावसापाण्याने खराब होतात, फिके होतात पण पांढरा रंग जसाच्या तसा राहतो.

जास्त रंग – जास्त खर्च

एका विमानाला रंगवण्याचा खर्च साधारण ५० हजार ते २ लाख डॉलर्स इतका होतो. चांगलं दिसलं तर ग्राहक वाढतील म्हणून रंग देणं योग्य वाटू शकतं पण त्यासाठी पैसा लगाना पडेगा ना बाबा. त्यामुळे दिसायला बरं वाटेल एवढ्या भागात रंग दिल्या जातो आणि इतर पांढऱ्या भागावर फक्त पॉलिश दिलं जातं!

पांढरा रंग – उष्णतेपासून रक्षण

विज्ञान सांगतं – गडद रंग सूर्यप्रकाश जास्त शोषतात आणि त्यामुळे जास्त गरम होतात. विमान जेवढं तापेल, तेवढा त्या विमानाच्या AC चा खर्च वाढणार. पांढरा रंग बाकीच्या रंगांपेक्षा कमी उष्णता शोषतो आणि तुलनेने कमी गरम होतो.
.

दिसायला ठळक

जसा पांढऱ्या शर्टवर एखादा काळा डाग लगेच दिसून येतो तसेच पांढऱ्या background मुळे विमानावर oil leak, गंज पटकन ओळखता येतो.
निळ्याशार आकाशात पांढरं विमान दिसून येतं, तसंच जमिनीवर सुद्धा विमान ओळखता येतं.
.

Resale किंमत

जर तुम्ही विमान दुसऱ्या रंगात रंगवलं तर त्याची resale किंमत कमी होते. कारण विकत घेणाऱ्याला विमानाला परत रंग देत बसावं लागतं. कुणी चांगला व्यापारी हे विसरणार नाही…!

लीजच्या अटींची पुर्तता

तुम्हाला ऐकून नवल वाटेल बहुतेक विमान कंपन्या स्वतः विमान खरेदी करीत नाहीत. त्यांनी ते विमान-मालकाकडून लीज वर घेतलेले असते. समजा एखाद्या कंपनीची लीज संपली तर कंपनीचं नाव आणि लोगो काढून दुसऱ्या कंपनीचं लावायचं, बस! हे बदल करण्यासाठी पांढरा रंग अत्यंत योग्य background आहे.

विमानाच्या पांढऱ्या रंगामागे ही एवढी साधी आणि सोपी कारणं असतील हे मनात सुद्धा आलं नसेल, हो ना?

इच्छुकांसाठी बोईंग ७७७ विमानाला रंग देण्याच्या पद्धतीचा हा छोटासा व्हिडिओ !

 

स्त्रोत: ,

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version