Site icon InMarathi

अनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका मोठ्या सवयीच्या विळख्यात आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘दो घुंट मुझे भी पिला दे शराबी’, ‘हमका पिनी है पिनी है हमका पिनी है’.. ही गाणी आपल्याला पार्टीच्या मुडमध्ये आणतात.

अनेक चित्रपटांत आपण हिरो-हिरोईन्सना दारू ची बाटली घेऊन नाचताना बघितले असेल.

जॉनी वॉकर, प्राण हे असे कलाकार होते ज्यांनी कधीही कोणते व्यसन केले नाही. दारू न पिता दारू प्यायलाचा अभिनय करणे आणि दारू पिउनही दारू न प्यायल्याचा अभिनय करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

दारूच्या नशेत अनेक कलाकारांनी काय उपदव्याप केलेत हे ही आपण अनेक बातम्यांमध्ये वाचले असेल. त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकले असेल.

तुम्ही जर कोणत्या हॉटेलमध्ये किंवा पोलिसात नोकरी करत असाल तर अनेक सेलिब्रिटींचे अंतरंग तुम्हाला माहित असतीलच.

पडद्या समोर छान छौकी बोलणारे विविध भुमिका करणारे कलाकार आपल्या प्रत्यक्ष जिवनात कसे असतात हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच असते.

विशेषतः एखाद्या कलाकाराच्या डायहार्ट फॅनला.

असेही काही कलाकार आहेत, जे आपले खाजगी जीवन सर्वांसमोर येऊ देत नाहीत. तर असे काही कलाकार आहेत जे आपल्या आवडीनिवडी आणि बऱ्याच गोष्टी सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमांतून जनतेसमोर मांडतात.

जे आपल्या व्यसनांबद्दल म्हणा किंवा आवडीबद्दल म्हणा ते सर्वांसमोर आपल्या पिण्याचा कबुलीजबाब देतात.

आज जाणून घ्या अश्या काही कलाकारांबद्दल, ज्यांच्या मद्य-प्रेमासाठी ते चांगलेच ओळखले जातात!

रणबीर कपूर

 

Indiatoday

 

कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे चालवणारा रणबीर कपूर हा आजच्यापीढीने डोक्यावर घेतलेल्या नवीन हिरोंपैकी एक.

व्होऐज या मासिकाच्या मुलाखतीत त्याने असं म्हटलं आहे की,

‘मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देतो. तसंच अभिनय मनापासून करतो. ज्यावेळी मी काम करतो किंवा इतर कोणत्याही कामात असतो त्यावेळी मी पित नाही. पण ज्यावेळी मी निवांत असतो त्यावेळी मी दारू पितो.’ रणबीरने आपल्या या आवडीची खुलेपणाने मान्यता दिली आहे.

याआधीही अनेकदा रणबीरच्या दारुपार्ट्यांचे फोटो, व्हिडिओ आपण पाहिले आहेतच.

अर्जून रामपाल

 

Liquorsky

 

डॅडी या अरुण गवळीच्या जीवनावरील चित्रपटात सकस अभिनय केलेल्या अर्जून रामपाल याने एका मुलाखती दरम्यान उघडपणे सांगितले काबुल केले की,

त्याने वयाच्या २१ व्या वर्षी दारू पिण्यास सुरवात केली. अर्जूनने आपल्या या कृत्याचे समर्थन केले नसले तरी त्याने हे मान्य केले आहे.

करीना कपूर खान

 

Liquorsky

कपूर घराण्यातल्या या करिष्माच्या लहान बहिणीने चमेली, युवा आणि हिरोईनमध्ये दमदारभुमिका केल्या आहेत.

तिने हे अनेकदा सांगितले आहे की ती “दारू पिण्यासाठी कारणच शोधत असते!

सैफ अली खान

 

 

नवाब सैफ अली खान याचे करिअर त्याच्या व्यसनांमुळे खंडीत झाल्याचे त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सैफ हा त्याचे पहिले लग्न तसचं डिव्होर्स आणि परत करीना कपूर सोबतचं लग्न आणि ताजमध्ये त्याने केलेल्या मारामारीमुळे अधिक चर्चेत राहिला आहे.

 

अमिषा पटेल

 

 

अमिषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

पुढे तिने गदर सारखा हिच चित्रपट दिला, परंतू तिचा हा चढता आलेख इथपर्यंतच मर्यादीत राहिला आहे. या व्यतिरिक्त तिने फारसे हिट चित्रपट दिले नाहीत.

तसच ती मीडियामध्ये सतत चर्चेत राहिल असंही काही केलं नाही. तिच्या सिनेसृष्टीतील काराकिर्दीला दारूमुळे खीळ बसली आहे. असंही विटीफीड वर म्हटलं आहे.

धर्मेंद्र

 

getty

 

तुम्हाला तो शोले मधला अमिताभ आणि बसंतीच्या मौसीमधील संवाद आठवतो का ?

त्यामध्ये जय म्हणजेच अमिताभ आपल्या प्रिय मित्र विरूचे एक-एक (अव) गुण मौसी समोर मांडतो आणि मौसीने प्रस्ताव नकारल्यावर विरू पाण्याच्या टाकीवर चढून जे डायलॉग बोलतो ते आजही शोले बघितलेल्या प्रत्येकाला आठवून हसू येत असेल.

हो, धर्मेंद्र ने स्वतः आपल्या दारूच्या व्यसनामुळे आपण मागे राहिल्याचे एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

मनिषा कोयराला

 

dailypost

 

मनिषाने दिलसे, खामोशी सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.

तसच एक छोटीसी लव्हस्टोरी नावाच्या चित्रपटावरून तिचा त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत वादही झाला होता.

मध्यंतरी तिला कँसर झाला असल्याने उपचारादरम्यान तिने सर्व प्रकारचे अमली पदार्थ सोडले.

विद्या बालन

starsunfolded

 

परिणिता, डर्टी पिक्चर, कहानी अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या विद्या बालन बद्दल,

ती चित्रपटातल्या भुमिके प्रमाणेच प्रत्यक्ष जिवनात दारू पित असल्याचं बोललं जातं.

 

कपिल शर्मा

 

youtube

 

ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी सर्कस आणि कॉमेडी नाईट्स विथ कपिल या टिव्ही शो मधून गाजलेला टिव्ही स्टार म्हणजे कपिल शर्मा.

त्याचा शो पहिले वादग्रस्त झाला याला कारण म्हणजे त्याने दारूच्या नशेत सहकलाकरांना दिलेली वागणूक. पुढे त्याच्या शो चा टिआरपी घसरल्याने काय झाले हे वेगळे सांगायला नकोच.

मद्यपान ही गोष्ट मुळातून वाईट आहे का – ह्यावर मतभेद असू शकतात. पण मद्याच्या आहारी जाणं, अतिरेक होणं किती वाईट आहे हे वेगळं सांगायला नको.

कित्येकांचं आरोग्य, करिअर, कुटुंब ह्या व्यवसानामुळे बरबाद झालेत.

असं असूनसुद्धा – पडद्यावर आपल्या समोर अनेक चांगल्या भूमिका साकारणारे वरील कलाकार ह्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत.

आपण लोकांचे आयडॉल असताना आपल्या प्रत्येक वागणुकीवर प्रेक्षक, मिडीया यांची बारीक नजर असते हे सेलिब्रिटींनी लक्षात ठेवावं.

अभिनय, प्रसिद्धी या क्षेत्रात लखलखच्या क्षेत्रात वावरताना दारु, व्यसनं यांसारख्या नशेपासून दूर राहिलेलं बरं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version