आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक लोकांनी त्यांचं रक्त सांडलं, कित्येक लोकं ऐन तारुण्यात फाशीवर चढले!
पण तरीही असे कित्येक क्रांतिकारक आहेत ज्यांची आपल्या सध्याच्या पिढीला अजिबात कदर नाही, त्यांची प्रतिमा ही जास्तीत जास्त मलिन कशी करता येईल हयाकडे बऱ्याच लोकांचा कल असतो!
टिळक, सावरकर, सुभाषचंद्र बोस, नेहरू अशा कित्येक लोकांचे चारित्र्य मलिन करायचे प्रकार तर आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले असेलच!
आता हयात शहीद भाग सिंग ह्यांना सुद्धा लोकांनी सोडले नाही हे आपल्याला दिसून येते!
खरंतर शहीद भगतसिंग आणि काश्मीरमध्ये राहून आपल्याच देशाविरुद्ध कारवाया करणारा देशद्रोही बुर्हान वाणी ह्यांची तुलना होऊच शकत नाही, हे देशाभिमान असलेला अगदी लहानगा पोरगाही छातीठोकपणे सांगेल.
पण आपल्यातच काही लोक असे आहेत ज्यांना खाली डोके आणि वर पाय करून विचार करण्याची सवयच जडलेली असते.
काही वर्षांपूर्वी अश्याच लोकांपैकी एकाने क्वोरा ह्या सोशल साईटवर एक प्रश्न विचारला होता की,
भगत सिंग आणि बुर्हान वाणी दोघेही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी लढताना मृत्यू पावले, तरी भगत सिंग यांना ‘शहीद’ म्हटले जाते आणि बुर्हान वाणीला ‘दहशतवादी’ असे का?
हा प्रश्नच मुळात बिनडोक आहे आणि त्याला जशास तसे उत्तर मिळणे अपेक्षित होते आणि तसे झाले देखील.
काताकाम मानस तेजा ह्या हैद्राबाद येथे राहणाऱ्या आणि क्वोरा वर अॅक्टीव्ह असणाऱ्या इतिहास प्रेमीने ह्या प्रश्नाला आपल्या उत्तराच्या सहाय्याने जबरदस्त चपराक कशी दिली ते आपण बघूया
काताकाम मानस तेजा म्हणतात की,
जर कोणाला वाटत असेल की बुर्हान वाणीची शहीद भगत सिंग ह्यांच्याशी तुलना केली जाऊ शकते तर मी म्हणेन की असा विचार करणारा एक तर विचाराने दुर्बल असावा किंवा बुद्धीने विक्षिप्त असावा.
आपण सर्वात प्रथम दहशतवादाची व्याख्या पाहू –
राजकीय ध्येयाने उद्दिक्त होऊन हिंसा आणि धमकीच्या जोरावर, विशेषतः सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर कृत्ये करण्याला दहशतवाद म्हटले जाते.
भगत सिंग हे महान होते आणि त्यांना शहीद हा दर्जा का दिला गेला कारण त्यांनी कधीही कोणत्याही सामान्य नागरिकांची हत्या केली नाही.
मग तो माणूस ब्रिटीश असो व भारतीय. त्यांची ब्रिटीश सरकार विरोधात आणि भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांविरोधात होती.
पण दुसरीकडे तुम्ही म्हणताय त्या हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुर्हान वाणीचे हात कित्येक निष्पाप जीवांच्या रक्ताने माखलेले आहेत.
त्याने केलेल्या कृत्यांचा पाढा वाचायचा असले तर ही लिंक नक्की पहा आणि स्वत:च ठरवा बुर्हान वाणीला दहशतवादी संबोधायचं की शहीद संबोधायचं?
अजून एक महत्त्वाची गोष्ट जी अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही ती म्हणजे,
तो केवळ दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा कमांडरच नव्हता तर त्याने सोशल मिडीयाच्या सहाय्याने देखील कित्येक तरुण मुलांना भूलथापा देऊन त्यांचे ब्रेन वॉश करून ह्या वाईट कृत्यात त्यांना सामील करून घेतले.
आणि कित्येक घरे उध्वस्त केली, त्यांच्या आई-बापाचा, भावंडांचा आधार हिरावून घेतला.
बरं अजून एक महत्वाची गोष्ट जी की भगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल ती म्हणजे,
लष्कर-ए-तयब्बा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेने जी अनेक हिंसक कृत्ये केली आणि निष्पाप नागरिकांचा बळी घेतला त्या संघटनेशी देखील बुर्हान वाणीचे संबंध होते.
दुसरीकडे भगतसिंग यांच्याकडे पहा, त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य, त्यांची जीवनगाथा ही प्रेरणादायी आहे.
पण बुर्हान वाणीने असे कोणतेच प्रेरणादायी विचार समाजात पसरवलेले माझ्यातरी ऐकिवात नाहीत. उलट त्याने तरुणांच्या मनात विष कालवण्याचेच कार्य केले.
आताही जर तुम्ही म्हणत असाल की बुर्हान वाणी ह्याला स्वातंत्र्यवीर वा शहीद म्हणावे, तर तुम्हाला खरंच कोपरा पासून नमस्कार!
मुळात ह्या अशा विकृत विचारांनाच आपण ह्या देशात थारा देतो म्हणूनच हे सगळं फोफावत चाललं आहे. आज तुम्हा आम्हाला इतिहास ठाऊक आहे त्यामुळे आपण काय चुक काय बरोबर हे ठरवू शकतो!
पण समजा उद्या ह्या देशाचं भविष्य असणाऱ्या लहान मुलांनी हे असे प्रश्न वाचून, तथ्य समजून न घेता ह्या गोष्टीच खऱ्या मानून बसले तर देशाची संपूर्ण पिढीच्या पिढी बरबाद होईल ह्याचा आपण विचार करायलाच हवा!
हे असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना तिथेच उत्तर देऊन ठेचलं पाहिजे हे मात्र नक्की!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.