' या राजाच्या अंत्ययांत्रेवर केला गेला तब्बल ५८५ कोटी रुपयांचा खर्च! पण का? – InMarathi

या राजाच्या अंत्ययांत्रेवर केला गेला तब्बल ५८५ कोटी रुपयांचा खर्च! पण का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातामध्ये नाही. मृत्यू हा अटळ आहे आणि प्रत्येकालाच त्याला सामोरे जावे लागणार आहे. एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यानंतर त्याचे अंतिम संस्कार कसे केले जातील, हे पाहण्यासाठी तो नसतो, तरीदेखील कधी-कधी एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारावर खूप रक्कम खर्च केली जाते.

पण काहीवेळा असे होते की, जर कोण्या गरीब माणसाचा मृत्यू झाला तर, त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील कुणी पुढे येत नाही.

आपल्या देशात देखील कधी-कधी असे घडते. आपण मोठमोठ्या श्रीमंत लोकांची, स्टार्सची आणि राजकारण्यांची अंतयात्रा पाहिली असाल. त्यांच्या त्या अंतयात्रेसाठी हजारो-लाखो रूपये खर्च केला जातो.

पण तुम्ही कोणाच्या अंतयात्रेवर करोडो रुपये खर्च झालेला ऐकले आहे का ? कदाचित नसेल ऐकले. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका राजाच्या अंतयात्रेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या अंतिम यात्रेला चक्क ५८५ कोटी रूपये खर्च झाले आहेत.

 

Bhumibol Adulyadej.inmarathi
thestar.com

थायलंडचा राजा भुमिबोल अदुलयादेश हा गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी मरण पावला. भुमिबोल अदुलयादेश हा जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक राजा होता. त्याचा राहण्याचा थाट काही वेगळाच होता.

भुमिबोल अदुलयादेश हा राजा माहीडोल अदुलयादेशचा सर्वात मोठा मुलगा होता.

भुमिबोल अदुलयादेश या राजाचा जन्म ५ डिसेंबर १९२७ रोजी युनायटेड स्टेट्स येथे झाला होता. त्याला एक लहान बहिण देखील आहे, तिचे नाव गल्यानी वधना हे आहे.

१९२८ मध्ये भूमिबोलचे कुटुंब थायलंडमध्ये आले. त्यानंतर किडनी फेल झाल्याने त्याच्या वडिलांचा सप्टेंबर १९२९ रोजी मृत्यू झाला. त्यावेळी या राजाचे वय २ वर्षापेक्षा कमी होते. त्यांनतर त्याने बँकॉकमध्ये काही काळ शिक्षण घेतले.

भुमिबोल अदुलयादेश राजाने सिरीकीत नावाच्या मुलीशी लग्न केले. त्याच्या जीवनाच्या मध्य काळामध्ये त्याला उतरती कळा लागली होती. त्यावेळी या राजाच्या समोर खूप मोठमोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या.

 

Bhumibol Adulyadej.inmarathi1
tribuneindia.com

पण १९४९ नंतर त्याला त्याचे हे अधिकार पुन्हा एकदा परत मिळाले. त्याने आपल्या लोकांसाठी त्याच्याकडून काहीही कमी पडू दिले नाही. त्याने नेहमी जनतेचाच विचार केला.

काही दिवसांपूर्वीच थायलंडच्या भुमिबोल राजाच्या अंतिम यात्रेची रंगीत तालीम करण्यात आली. या तालमीच्या वेळी सर्व अधिकाऱ्यांनी ब्लॅक टॉप आणि प्राचीन काळामधील कपडे घातले होते.

त्याचवेळी बँडने म्युझिक देखील वाजवले. या राजाला एका शवपेटीमध्ये ठेवण्यात आलेले आहे. काहींनी या राजाचे डुप्लिकेट अस्थी कलश हातामध्ये ठेवले होते. या अस्थी कलशांच्या आधारे ते त्याच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी हातात घेतलेले सर्व कलश हे सोन्याचे होते.

या थायलंडच्या भुमिबोल राजाच्या भव्य अंतयात्रेसाठी लागणारे बजेट हे ३ बिलियन थाई बात म्हणजेच अमेरीकेचे ९० मिलियन डॉलर आणि आपल्या भारतातील जवळपास ५८५ कोटी रुपये होते.

या राजाच्या अंतिम यात्रेची तयारी गेल्या एका वर्षापासून केली जात होती. या अंत यात्रेसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे बनवण्यात आले आहेत. ग्रँड पॅलेसच्या समोर सोन्याचा मुलामा असलेले पव्हिलियन बनवण्यासाठी खूप कलाकार तिथे काम करत होते.

 

Bhumibol Adulyadej.inmarathi2
cnn.com

राजा भुमिबोल अदुलयादेश याने थायलंडवर ७० वर्ष राज्य केले. या राजाला तेथील लोक माणसातील देवच समजत असत. त्याच्या अंतयात्रेला जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त लोक  उपस्थित राहिले होते.

इतर देशांतील मोठमोठे नेते देखील या राजाच्या अंतयात्रेसाठी उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि जपानचा राजकुमार अकीशिनो आणि राजकुमारी किको हे  देखील उपस्थित राहिले होते.

या राजाची अंतयात्रा दोन वर्षांपूर्वी काढण्यात आली.

असा या भुमिबोल अदुलयादेश राजाची अंतयात्रा ही खूपच मोठी आणि भव्य होती. कदाचित हे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झाले असेल की, एखाद्या माणसाच्या अंतयात्रेसाठी एवढा जास्त पैसा खर्च करण्यात  आला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?