आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
व्यवसाय करणे कधीही सोप्पे नसते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याचबरोबर तो व्यवसाय नीट चालेल का? तो व्यवसाय यशस्वीपूर्ण वाटचाल करेल का? याची धाकधुकी देखील नेहमी मनामध्ये असते.
त्यातच आपली नोकरी चांगली असेल आणि आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर सहसा कुणीही आपल्या या निर्णयाला पाठिंबा देत नाही.
आज आपण अश्या एका धाडसी निर्णय घेतलेल्या स्त्रीबद्दल जाणून आहोत, जिने एका मोठ्या हुद्याची आणि पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला आणि आज ती कोट्यावधीचा व्यवसाय चालवते आहे.
चला तर मग जाणून घेऊया या महत्त्वकांक्षी स्त्रीबद्दल…
या स्त्रीचे नाव अश्विनी अशोकन आहे. अश्विनी ही मॅडस्ट्रीट डेनची सह-संस्थापक आहे. चेन्नईची ही कंपनी कम्प्युटर इंटेलिजन्स बरोबर काम करते. ह्या स्टार्टअपने काही काळातच १.५ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १० कोटी रुपये कमवले.
अश्विनी सुरुवातीला इंटेल कंपनीमध्ये काम करत होती. तिने १० वर्ष या कंपनीमध्ये काम केले आहे. तिची गोष्ट खूप प्रेरक असून ती चढउताराने भरलेली आहे.
अश्विनी ही गेल्या १५ वर्षांपासून यु.एस.ला राहत होती आणि तिकडेच ती इंटेलमध्ये कामाला होती.
हा निर्णय घेतला त्यावेळी ती आणि तिचे पती हे सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावर बसलेले होते, त्यावेळी तिच्या मनामध्ये खूप विचार येत होते.
आपण हा निर्णय घेऊन काही चूक तर केली नाही ना, असा प्रश्न तिच्या मनामध्ये सारखा येत होता. पुढे जाऊन सर्व व्यवस्थित होईल ना, ही चिंता तिला भेडसावत होती.
कारण केवळ २० दिवसांमध्ये त्यांनी यू.एस. सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घेऊन अश्विनी भारतात आली.
अश्विनीने आपले तरुणपण अमेरिकेमध्येच घालवले. तिने चेन्नईच्या एनओपी वैष्णव महाविद्यालयामधून पदवी मिळवली आहे. तिथेच तिचे आयआयटी मद्रासच्या एका मुलाबरोबर प्रेमाचे सूत जुळले.
त्या दोघांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचे ठरवले. अश्विनीला शास्त्रीय संगीत तज्ञ आणि डान्सर बनायचे होते. पण अमेरिकेत जाऊन तिच्या जीवनाचा उद्देशच बदलला. तिथे गेल्यानंतर काही असे झाले, ज्याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती.
डिझाईनमध्ये पदवी घेतल्यानंतर तिला फेसबुक, गुगल, ट्विटर आणि आयडीयो अशा सर्व ठिकाणांवरून काम करण्याची ऑफर आली. पण इंटेलसाठी तिने सर्वांना नकार दिला, कारण तिला जगातील सर्व युजर्स इंटरफेसची टेक्नीक जाणून घेण्यामध्ये रस होता.
अश्विनी व्यवसाय सुरू करताना कोणताही निर्णय अचानक घेऊ इच्छित नव्हती. तिने पर्सनल कम्प्युटर, स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल यांसारख्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या तंत्रज्ञानावर खूप रिसर्च केली आणि त्याच्या वापरावर देखील खूप वेळा घालवला.
अश्विनीने इंटेल सोडल्यानंतर ती अशी काही प्रोडक्ट्स बनवत होती, जी तंत्रज्ञानाच्या आधारे चालत असत. त्यांनतर तिला एका अनुभवी टीमबरोबर हे सर्व शिकण्याचा चान्स मिळाला.
त्यामुळे तिला या सर्वांबद्दल खूप चांगला अनुभव घेता आला आणि तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान मिळाले. यामुळेच तिला पुढे जाण्यासाठी मार्ग सापडला.
त्यावेळी तिच्या कामाला चालना मिळाली, ज्यावेळी तिने आपल्या पतीबरोबर काम केले. तिचा पती हा एक न्यूरोसाइंटिस्ट म्हणून काम करायचा. तो स्नॅपचिप बनवत असे.
अश्विनी लोकांच्या कामी येणारे आर्टिफिशियल इंटेलिजेंस विज्ञान प्रयोगशाळेच्या बाहेर काढू इच्छित होती आणि जगभरातील गरजू लोकांना देऊ इच्छित होती.
त्यामुळे तिने मॅडस्ट्रीट डेन बनवले आणि तोच तिचा आर्टिफिशियल स्टार्टअप बनला. ही कंपनी आता चेन्नईमध्ये स्थित आहे.
अश्विनीने जेव्हा हा निर्णय घेतला, त्यावेळी तिला सर्वांनी वेड्यात काढले. कुणीही तिला साथ देण्यास तयार नव्हते. २०१० मध्ये जेव्हा ती आई झाली, त्यावेळी तिला आराम करण्यास सांगण्यात आले होते, परंतु फक्त ६ आठवड्यांतच ती पुन्हा कामाला जाऊ लागली.
तिने कधीही आपला आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. समाजाची चिंता न करता, मोठ्या जिद्दीने तिने हा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये तिला तिच्या पतीची देखील तेवढीच मदत मिळाली.
आज हेच स्टार्टअप कोटीचा व्यवसाय करत आहे.
यावरून हे लक्षात येते की, जीवनात यशस्वी होण्यासाठी कधीतरी रिस्क घ्यावीच लागते, पण ही रिस्क घाईघाईने घेणे चुकीचे असते.
जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल – काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची जिद्द असेल – आणि धीर धरून निर्णय घेण्याची क्षमता असेल – तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.