आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हॉलीवूडमध्ये खूपवेळा आपण मोठमोठ्या इमारती पहिल्या असतील. एवढ्या मोठ्या इमारती पाहून आपले मन नक्कीच थक्क होऊन जात असेल!
कारण भारतामध्ये आपण अश्या इमारती सहसा कुठेही पाहिलेल्या नसतात. त्याचवेळी मनामध्ये असा देखील एक प्रश्न निर्माण होतो की, खरच अश्या इमारती अस्तित्वात आहेत का?
की, कम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने ह्या गगनचुंबी इमारती बनवल्या गेल्या आहेत. पण या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला युनायटेड अरब अमिरातीच्या दुबईमध्ये मिळेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
युनायटेड अरब अमिरातीचे दुबई हे शहर त्याच्या दिमाखदारपणामुळे खूप प्रसिद्ध आहे. गगनचुंबी इमारती, तेथील लोकांचे आगळेवेगळे शौक यामुळे हे शहर नेहमीच चर्चेत राहिले आहे.
बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत देखील दुबईमध्येच आहे.
पण दुबईमध्ये फक्त एक बुर्ज खलिफा ही इमारतच विचार करायला लावणारी नाही, तर अश्या कितीतरी गोष्टी तिथे आहेत. ज्या पाहून आपल्या तोंडून आश्चर्याचे बोल बाहेर पडतील.
आज आम्ही दुबईची काही अशी छायाचित्रे दाखवणार आहोत, जी पाहून तुम्ही एकदातरी दुबईला फिरायला जाण्याचा निश्चय कराल..
१. जमिनीवरून पाहिल्यास हे दृश्य खूपच अविश्वसनीय दिसते.
२. आकाशातून पाहिल्यास दुबईचा नजारा काही वेगळ्याच जगाचा आभास करून देतो.
३. दुबईमध्ये जीप देखील ‘किंग साइजची’ असते.
४. जर तुम्हाला रस्त्यावरील ट्रॅफिक आवडत नसेल, तर याप्रकारे शहरातील गर्दीला तुम्ही पार करू शकतात.
—
- या मुस्लिम देशात ऍडल्ट सिनेमांवर आता सेन्सॉरची कात्री चालणार नाही!
- पर्यटकांचं आकर्षण असलेल्या ‘दुबई’बद्दलच्या या १० गोष्टी तुम्हाला अचंबित करतीलच..!
—
५. दुबईमध्ये पोलीस पेट्रोलिंगसाठी बेंटले, फेरारीज आणि लॅमबोरगिनी यांसारख्या महागड्या गाड्यांचा वापर करतात.
\
६. दुबईच्या वेंडिंग मशीन्समधून तुम्ही चॉकलेटच्या जागी सोने देखील खरेदी करू शकता.
७. दुबईतील लोकांना सोने एवढे आवडते की, त्यांनी सोन्याच्या गाड्या देखील तयार केल्या आहेत.
८. दुबईतील लोक मांजरीऐवजी चित्ता पाळणे जास्त पसंत करतात.
९. ज्यांना चित्ता कमी भीतीदायक वाटतो, ते लोक वाघ पाळतात.
१०. ज्या लोकांचे पैसे संपलेले असतात, अश्या लोकांसाठी स्थानिक बाजारामध्ये काही कपाटांमध्ये खाद्यपदार्थ ठेवलेले असतात.
११. येथील हॉटेल्स देखील असे असतात, ज्यांच्या भिंतीमध्ये Aquarium लावलेले असतात.
१२. तुम्ही देखील समुद्रापासून एवढ्या उंचावर टेनिस खेळण्यास नक्कीच उत्सुक असाल.
१३. सर्फिंग करण्याची दुबईमध्ये काही वेगळीच मज्जा आहे.
१४. जेव्हा बाहेर तापमान ५० अंश सेल्सियसपेक्षा अधिक असते, तेव्हा स्किंग करण्यासाठी तुम्ही जगातील या सर्वात मोठ्या मॉलमध्ये जाऊ शकता.
१५. येथे सफेद घोडा देखील मिळतो, जो गवत नाहीतर पेट्रोल खातो.
असे हे दुबईचे वेगळेपण सर्व जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणाला एकदातरी नक्की भेट द्या.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.