आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
राजकारण्यात कोणालाही जर पुढे जायचे असेल, तर राजकारणातील अनुभव असणे खूप गरजेचे आहे. राजकारणात कोणतेही पद सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी तुमच्यामागे अनुभव आणि लोकांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. लोकांना राजकारणामध्ये अनुभव मिळवण्यासाठी आणि त्याचे धागेदोरे समजून घेण्यासाठी खूप वर्ष जातात. त्यामुळे तुम्ही नेहमी पाहिले असेल की, राजकारणात उच्च पदावर असलेली माणसे ही वयस्कर असतात. आपल्या भारतामध्ये तर तरुण राजकारणी खूपच कमी दिसून येतात, आजकालची तरुण पिढी या सर्वांमध्ये फसण्यापासून वाचते. पण जगामध्ये आपल्याला तरुण राजकारणी खूप दिसून येतील. आज आपण अश्याच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत, जो वयाच्या फक्त ३१ व्या वर्षी ऑस्ट्रियाचा राष्ट्रप्रमुख बनू शकतो. चला तर जाणून घेऊया, या तरुणाबद्दल..
ऑस्ट्रियाचे राजकारण सध्या एका वेगळ्या वळणावरून चालले आहे. ३१ वर्षाचा सेबास्तियन कुर्ज हा तरुण ऑस्ट्रियाच्या राष्ट्रप्रमुखाच्या खुर्चीवर बसू शकतो. त्याला जगातील सर्वात तरुण नेत्याचा मान दिला जात आहे. त्याच्या ऑस्ट्रियन पिपल्स पार्टी (OVP) ने राष्ट्रीय निवडणुकीमध्ये खूप चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे त्यांचे विरोधक चकित झाले आहेत. स्टेट ब्रॉडकास्टर ORF च्या रिपोर्टनुसार ९० टक्के झालेल्या मतदानामध्ये कुर्जच्या पार्टीने ३१ टक्के मते मिळवली आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्जने सांगितले की,
आम्हाला जनतेने महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. ती आम्हाला योग्यरीत्या पूर्ण करायची आहे. लोकांच्या आमच्याकडून खूप आशा आहेत, त्यामुळे आम्हाला खूप कामे करायची आहेत. आम्हाला आमच्या देशामध्ये एका नवीन राजकारणाची सुरुवात करायची आहे.
कुर्जचा जन्म २७ ऑगस्ट १९८६ रोजी ऑस्ट्रियाच्या व्हियेना येथे झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव जोसेफ, तर आईचे नाव एलिझाबेथ हे आहे. २०१० – ११ मध्ये तो व्हियेना सिटी कॉन्सिलचा मेंबर होता.
पण या निवडणुकीमध्ये कोणत्याही पार्टीला बहुमत मिळाले नाही. अश्यावेळी कुर्जच्या पार्टीला (OVP) २६.८ टक्के मते मिळवलेल्या फ्रिडम पार्टीने त्यांना पाठिंबा दिला आहे. २० ऑक्टोबर २०१७ त्यांना राष्ट्रपती अॅलेक्झांडर वॅन डेर बेलेनद्वारे ऑस्ट्रियाचा चान्सलर म्हणून नियुक्त केले गेले.
तुम्हाला आम्ही सांगू इच्छित आहोत की, कुर्ज सध्या ऑस्ट्रियाच्या विदेश मंत्रीच्या रुपात कार्य करत आहे. २७ वर्षाचा असताना त्याला हे पद दिले गेले होते. तो चान्सलर म्हणून नोव्हेंबरपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळेल. त्याला युरोपीय राजकारणाचा शुटींग स्टार देखील संबोधले जाते. ऑस्ट्रियाच्या राजकारणामध्ये त्याला वुंडरवूज्जीच्या नावाने देखील ओळखले जाते. याचा अर्थ असा आहे की, असा मनुष्य जो पाण्यावर देखील चालू शकतो. त्याला एक चांगला अर्थशास्त्रज्ञ देखील मानले जाते. याच वर्षी मे च्या दरम्यान कुर्जला पार्टी अध्यक्ष म्हणून देखील निवडण्यात आले होते.
यावरून असे लक्षात येते की, तरुणांनी मनावर घेतले तर ते राजकारणात देखील यशस्वीपणे आपले पाय रोवू शकतात. समाजकार्यासाठी कधीही मागे न पडता, लोकांचे कल्याण आपल्याला कसे करत येईल, यावर नेहमीच भर दिला पाहिजे. कुर्ज याने नेहमी लोकांच्या भल्याचाच विचार केला आहे, यावरून आपल्याला दिसून येते. यावरून भारतातील तरुणाने प्रेरणा घेऊन राजकारणामध्ये काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page