सुटी एन्जॉय करण्याचा, फारसा माहिती नसलेला हा अनोखा पर्याय नक्की आजमावून बघा!
आपण नेहमी म्हणतो की शेतीच्या कामात जेवढे एकूण कष्ट पडतात तेवढे कष्ट कोणत्याही कामात पडत नाही आणि ही गोष्ट अगदीच खरी आहे. कारण ह्या कामात मेहनतीला सीमा नाही. ह्या कामात कष्टाला अंत नाही. जेवढे परिश्रम घेऊन घाम गाळणार तेवढंच मातीतून सोनं उगवणारं! पण नंतर पोटाच्या पोराप्रामाणे सांभाळून वाढवलेलं पिक पाहून मिळणारं समाधान लाखमोलाचं असतं. शहरातले लोक नेहमी म्हणतात की शेतीचा व्यवसाय हा आता जुनाट झाला. शेतीमध्ये काही ठेवलेलं नाही आहे, पण अशी मते मांडणाऱ्या लोकांना थक्क करते ती यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा. यशस्वी शेतकऱ्यांच्या ह्या यशोगाथा सिद्ध करतात की शेतीमधून तुम्ही भरघोस उत्पन्न तर मिळवालच, पण सोबत तुम्हाला मिळणारे मानसिक समाधान देखील अमुल्य असेल.
ह्याच सकारात्मक दृष्टीकोनामुळे आज दिसुन येते की कित्येक सुशिक्षित भारतीय महिला आणि पुरुषांच्या मनात कृषी क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण होत आहे. त्यांना जाणून घ्यायचं आहे शेती काय आहे, त्यांना शेतीची प्रक्रिया जवळून पहायची आहे, एक दिवस का होईना पण शेतकऱ्याचे जीवन जगून पहायचे आहे. अश्या शहरी मंडळींना एका छताखाली आणते अॅग्रिटुरिझम!
अॅग्रिटुरिझम हा प्रकार भारतात तसा नव्यानेच जन्माला आला आहे. येथे खऱ्या अर्थाने आपल्याला जाणीव होते शेतकऱ्याच्या मेहनतीची आणि त्याच्या अनमोल शेतीची! आणि आपसूकच आपल्याही मनात कृषी क्षेत्राबद्दल प्रेम निर्माण होतं. इथे तुम्हाला शेतात काम करण्याची संधी मिळते, आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही काही काळ निसर्गाच्या सानिध्यात घालवता, ग्रामीण जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटीज करता, त्यामुळे तुमची मस्तपैकी ट्रीप तर होते आणी तुम्ही ग्रामीण जीवनाच्या प्रेमात देखील पडता!
अॅग्रिटुरिझममुळे केवळ आपल्याच अनुभवात भर पडते असं नाही, तर ज्या शेतकऱ्याबद्दल आपल्या मनात (खास करून शहरी लोकांच्या मनात!) विविध कारणांनी उत्सुकता असते, त्या शेतकऱ्यांसाठी देखील ते एक उत्पन्नाचे साधन आहे. म्हणजेच एक प्रकारे अॅग्रिटुरिझमद्वारे ज्या भागात अॅग्रिटुरिझम आहे तेथील स्थानिक शेतकऱ्यांना देखील अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी ते फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर अॅग्रिटुरिझममुळे लोकांच्या मनात शेतीविषयी असणारे गैरसमज दूर होतात, आपल्या अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील शेतीची निर्णायक भूमिका पटवून देता येते.
ज्यांना कुणाला अॅग्रोटुरिझबद्दल फारशी माहिती नाहीये, त्या बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, अॅग्रिटुरिझम हे अतिशय महागडे असते.
पण वास्तवात एखाद्या रिसोर्टमध्ये जाऊन तुम्ही जी मौजमजा करता त्यापेक्षा अगदीच कमी खर्चात कधीही न अनुभवलेली अॅग्रिटुरिझमची मज्जा तुम्हाला मिळते. मुख्य म्हणजे शेतातील टुरिझम कंटाळवाणं होत नाही…एक नवाच अनुभव असतो तो! शहरातील मोठा गट असा असतो ज्यांना स्वत:चे गाव नसते, त्यांनी कधीही गाव पाहिलेला नसतो, त्यामुळेच गावाकडचे जीवन, राहणीमान, वेशभूषा, भाषा ह्यांबद्दल त्यांना नेहमीच उत्सुकता असते. अश्यांसाठी अॅग्रिटुरिझम हा पर्याय उत्तम आहे.
कोणत्याही प्रकारे शिकाऊ व्यक्तींचा समावेश न करता गावातील खऱ्याखुऱ्या गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या साथीने अॅग्रिटुरिझम चालत असल्याने, येथे येणाऱ्या प्रत्येकाचे दिखाऊपणाचे झालर नसणारे साधे पण उच्च दर्जाचे आदरातिथ्य केले जाते आणि त्यामुळेच अॅग्रिटुरिझममध्ये खऱ्या अर्थाने शेती आणि गाव ह्यांची सुरेख सांगड पाहायला मिळते.
असाच एक अॅग्रिटुरिझमचा सुरेख पर्याय उपलब्धही आहे…!
पुण्यापासून अगदी जवळ असलेलं – वाडकर अॅग्रिटुरिझम!
आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात मित्रपरिवाराबरोबर काही दिवस निवांत – ते ही निसर्गाच्या सान्निध्यात – घालवण्यासाठी उत्तम वाडकर अॅग्रिटुरिझम.
वाडकर कृषिपर्यटन म्हणजे संह्याद्रीच्या कुशीतील २० एकर चा परिसर! निसर्गाच्या सानिध्यात ही मोठी फळबाग फुलवलेली आहे. इथे आंबा, नारळ, सीताफळ, जांभूळ, केळी, डाळिंब अशी विविध फळझाडं पहायला आणि अर्थातच, ती फळं चाखायला मिळतात. चहूकडे निसर्ग असल्याने पक्षी-प्राण्यांशी खेळता येतं. दोस्ती करता येते. मित्र परिवाराबरोबर मैदानी खेळ खेळता येतात!
वाडकर कृषिपर्यटन येथे आधुनिकता आणि नैसर्गिक शेती याचा मिलाफ पहायला मिळतो. ड्रीप, स्पिंकलर इरिगेशन, ट्रॅक्टर यांसारख्या आधुनिक पद्धती वापरून पाण्याची बचत केली जाते. तसेच केमिकल मुक्त शेती करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धती अवलंबली जाते. पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी येथे मोठा शेत तलाव तयार करण्यात आला आहे.
निसर्गात हरवून जात..मैदानी खेळ खेळत…इथल्या पाण्यात निवांत डुंबत असताना, रेन डान्स मध्ये मस्ती केल्यानंतर तुम्हाला कधी सडकून भूक लागलीये कळतही नाही!
अत्यंत चविष्ट, रुचकर भोजन ही वाडकर कृषिपर्यटनची आणखी एक खासियत!
शहरातील धकाधकीत आपल्याला भूक लागत नाही असं नाही. पण वाडकरांच्या फळ बागेत लहान मुलासारखा धिंगाणा घालून, मनसोक्त खेळून लागलेली भूक काही औरच असते.
ह्या भुकेला शांत करण्यासाठी वाडकरांनी समोर ठेवलेलं खमंग जेवण निव्वळ बहार आणतं!
या जेवणाचा आस्वाद आपण वीर धरणाचे पाणी आणि संपूर्ण फळबागेचं दर्शन घेत करतो ज्यामुळे नैसर्गिक तृप्तीचा आनंद मिळतो
जेवणावर ताव मारून एखाद्या झाडाखाली जरा डुलकी घ्या…किंवा बागेत निवांत फेरफटका मारा….ट्रॅक्टर राईडची मजा घ्या….गॉडफादर मधल्या डॉन ने म्हटलेल्या “लाईफ इज ब्युटीफुल” ची प्रचिती आल्याशिवाय रहाणार नाही!
लहान मुलांचे खास आकर्षण – ससे, गाई, बदक सुद्धा येथे आहेत.
आणि मुलांसाठी स्वतंत्र प्ले एरिया देखील आहे. येथे पक्ष्यांच्या राजाचाही मुक्त वावर पाहायला मिळतो.
त्यामुळे, वाट बघू नका – फोन उचला आणि वाडकर कृषिपर्यटनशी संपर्क साधून पुढची सुटी बुक करून टाका!
वाडकर कृषिपर्यटन शी संपर्क साधण्यासाठी 9405577498 किंवा 7447791221 वर फोन करा. किंवा wadkarsagritourism@gmail.com वर ईमेल करा.
त्यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्या वेबसाईट – wadkarsfarm.com – किंवा फेसबुक पेजला – facebook.com/WadkarsAgritourism ला भेट द्या…!