Site icon InMarathi

बक्कळ पैसे असून सुद्धा ती रस्त्यावर विकतेय छोले कुल्चे, मग तुम्ही का लाजताय, वाचा…

urvashi yadav InMarathi Feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आजकाल माणसाला पैसा मिळवण्यासाठी खूप झटावे लागते. जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी असावी लागते. गरिबीतून मोठी झालेली माणसं आपण पहिली असतील, पण कधी श्रीमंत माणसाला रस्त्यावर एखादा स्टॉल चालवताना पाहिले आहे का ?

आता तुम्ही विचाराल, श्रीमंत माणसाला स्टॉल लावण्याची गरजच काय आहे, तो तर आधीच श्रीमंत आहे! तुमचे तसे बरोबरच आहे, पण आज आम्ही तुम्हाला यावरच आधारित एका स्त्रीची गोष्ट सांगणार आहोत.

ही स्त्री ३ कोटींच्या घरामध्ये राहत असून देखील एक स्टॉल चालवते. तुम्हाला नक्कीच हे विचित्र वाटत असेल, पण हे खरे आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्त्रीबद्दल…

 

 

या स्त्रीचे नाव उर्वशी यादव असे आहे. ही गुरगावमध्ये एका ३ कोटीच्या घरामध्ये राहते, तसेच ती एका एसयूव्ही गाडीची मालकीण देखील आहे. पण तुम्ही तिला रस्त्याच्या बाजूला छोले-कुल्चेचा स्टॉल चालवताना पाहू शकता.

आपल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उर्वशीने हे पाऊल उचलले आहे.

तिच्या पतीचा अचानक झालेल्या अपघाताने तिच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी सहा महिन्यामध्ये दुसऱ्यांदा हिप रिप्लेसमेंट करण्याची गरज असल्याचे सांगितले.

त्यामुळे उर्वशीने कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कशी झाली याची सुरुवात :

काही काळापर्यंत तिने नर्सरीच्या शिक्षकाच्या रुपात काम करून कुटुंब चालवले. पण तिच्या लक्षात आले की, यामधून मिळणाऱ्या पगारातून ती जास्त पैश्यांची बचत करू शकत नाही, त्यामुळे तिने छोले-कुल्चेचा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला.

 

उर्वशीने सांगितले की,

‘जरी आज आम्ही आर्थिक रूपाने कमकुवत नाही, पण मी भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही. परिस्थिती बिकट होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी, मी आताच ती चांगली रहावी यासाठी प्रयत्न करत आहे.

मला जेवण बनवणे खूप आवडते, त्यामुळे यामध्ये इन्वेस्ट करण्याचा निर्णय मी घेतला.’

उर्वशीचे पती अमित यादव एका मोठ्या कंपनीमध्ये कार्यकारी अधिकारी रुपात काम करत असून त्यांचे सासरे एक सेवानिवृत्त भारतीय वायूसेना विंग कमांडर आहेत.

३१ मे २०१६ मध्ये अमित सेक्टर १७ ए मध्ये पडले. डॉक्टरांनी डिसेंबरमध्ये त्यांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला. अपघाताच्या एका दिवसानंतर उर्वशीने सेक्टर १४ च्या बाजारामध्ये एका झाडाखाली स्टॉल लावण्यास सुरुवात केली.

 

 

उर्वशीने सांगितले की,

‘माझ्या मुलांना परिस्थितीमुळे त्यांची शाळा बदलावी लागू नये, यासाठी मी हे प्रयत्न करत आहे. मी दरदिवशी २,५०० ते  ३,००० रुपयांपर्यंत कमवते आणि मी यापासून खूप आनंदी आहे’.

पण तिला हे यश काही सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. स्टॉल लावण्याच्या निर्णयामुळे तिच्या  कुटुंबियांकडून तिला खूप विरोध करण्यात आला होता. तिने सांगितले की –

‘हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा बदल होता. सतत एसीमध्ये राहणारी मी रस्त्यावर जेवण विकण्यासाठी उतरली. माझ्या कुटुंबियांना हे पटतच नव्हते की, महिंद्रा स्कॉर्पियो आणि ह्युंडाई क्रेटाची मालक असलेली उर्वशी रस्त्यावर स्टॉल लावेल.

 

 

माझ्या सासऱ्यांनी मला एक दुकान उघडून देतो असे सांगितले, पण मी त्यांची मदत घेण्यास नकार दिला.

जेव्हा मी हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्या कुटुंबियांना वाटले की, हा व्यवसाय दोन-तीन दिवसांमध्येच बंद पडेल. पण जेमतेम दीड महिन्याच्या आतच माझा हा स्टॉल खूप हिट झाला.’

अश्या या जबाबदार स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या श्रीमंतीचा गर्व न करता मेहनत करण्याचा निश्चय केला. समाजाचा विचार न करता आपले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला.

एक वर्षानंतर, उर्वशी यादव आपल्या आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर होत्या – तिचे ब्रँड न्यू रेस्टॉरंट, उर्वशी फूड जॉइंट, आता गुरगावच्या सुखलीमध्ये – (ब्लू डार्टच्या समोर)उघडलेले आहे. मेनू खूप इंटरेस्टींगआहे, इथले अन्न हे पौष्टिक, हार्दिक आणि घराच्या स्वादिष्ट, स्वच्छ आणि रुचकर जेवणासारखेच आहे, आपल्याला आवडते अगदी तसे…

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version