आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणून सँमसंग कंपनी ओळखली जाते. पण बऱ्याच जणांना हे माहित नसले की ह्या कंपनीचा इतिहास काय आणि प्रवास काय?
चला तर जाणून घेऊया ह्या सँमसंग कंपनीच्या अज्ञात प्रवासाबद्दल!
कोरियाचा २८ वर्षीय जमीनादर युवक ली-ब्युंग-चुल याने १ मार्च १९३८ मध्ये ४० लोकांसोबत सँमसंग ट्रेडिंग कंपनी सुरु केली.
तेव्हा या कंपनीचे मुख्य काम दुरवरच्या प्रदेशात आणि शेजारी देशांमध्ये ताजे आणि ड्राय फिश विकणे. त्यासोबतच फळे आणि भाजीपाला निर्यात करणे होते.
सॅमसंग ग्रूपने आतापर्यंत जवळपास ८० वेगवेगळे व्यवसाय केले आहेत. पुढे हळूहळू या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यास आणि विकण्यास सुरूवात केली. यामध्ये टीव्ही, फ्रीज या सोबतच मोबाईल फोन आणि स्वयंपाक घरात उपयोगी वस्तूंचा समावेश होता.
सॅमसंगला आज या उंचीवर नेण्यासाठी या कंपनीचे फाऊंडर ली- ब्युंग चुल (Byung-Chull Lee) यांचे खुप मोठे योगदान आहे.
मोबाईल डिव्हाईस सेगमेंटमध्ये सॅमसंगचे सर्वात पहिले उद्दीष्ट एक लिडिंग कंपनीच्या रुपाने पुढे येण्याचा होता.
फीचर बेस्ट नोकीया आणि अॅपल आयफोनला मागे टाकत सर्वात वरचे स्थान पटकावण्यास सॅमसंग यशस्वी ठरले. ही कंपनी आपल्या फोन्सच्या साह्याने प्रत्येकाच्या खिशापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरली.
१९७२ मध्ये सॅमसंगने प्रथम स्वतःच्याच देशात प्रथम ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीची निर्मीती सुरु केली. त्यानंतर जपानच्या पावलावर पाऊल ठेवत मायक्रोचीपच्या निर्मीतीमध्ये कंपनीने पदार्पण केले.
१९८० मध्ये ब्युंग-चुल ली यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा ली- कुन- ही कडे सॅमसंगचे चेअरमनपद आले.
लीच्या कारकीर्दीत सॅमसंगने जगभर पसारा वाढविला आहे. वायरलेस तंत्रज्ञानाला भविष्य आहे याचा अंदाज घेऊन कंपनीने १९८८ मध्ये पहिला मोबाइल लॉन्च केला.
त्यानतंर कंपनीने मार्केटिंग स्ट्रॅटजीमध्ये अमुलाग्र बदल केले.
ली कुन ला कंपनीला जीई, पी अँड जी आणि आयबीएम सारखी आपली कंपनी असावी असे वाटत होते. त्यासाठी त्याने कंपनीच्या उच्चपदस्थांना २००० पर्यंतची मुदत दिली.
कंपनीचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी ली १९३३ मध्ये जगाच्या दौऱ्यावर निघाला.
त्याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये कॅलिफोर्नियामधील एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात त्याने पाहिले की, सोनी आणि पॅनॉसोनिकचे टीव्ही दर्शनी भागात ठेवलेले आहेत आणि सॅमसंगचा टीव्ही शेल्फच्या खालच्या भागात धुळ खात आहे. हे दृष्य पाहून ली रागाने लाल झाला.
जूनच्या अखेरीस त्याने जर्मनीच्या फ्रँकफोर्ट येथे शेकडो एक्झिक्युटिव्हीची तातडीची बैठक बोलावली. आदेश एवढा कडक होता की सर्वांनाच हातातील सर्व कामे सोडून जर्मनीला जावे लागले.
सर्वांच्या सुचना ऐकल्यानंतर ली कुनने भाषणाला सुरुवात केली जे सलग तीन दिवस सुरु होते. सलग बोलल्यानंतर ते सायंकाळी विश्रांती घेत होते.
त्यांच्या भाषणातील शेवटचे वाक्य होते –
आपली मुले आणि पत्नी सोडून सर्वकाही बदलून टाका.
सॅमसंगच्या इतिहासात १९९३ चा हा कार्यक्रम फ्रँकफोर्ट घोषणापत्र या नावाने ओळखला जातो. ली कुन यांनी घोषणापत्राचे एक पुस्तक प्रकाशित केले आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. कमी शिक्षित कर्मचाऱ्यांसाठी कार्टून आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.
या बैठकीनंतर म्हणण्यापेक्षा ली कुन यांच्या या भाषणानंतर सॅमसंगच्या मोबाइल आणि टीव्हीमध्ये क्रांतिकारक बदल झाले. कंपनीचा मार्केटमध्ये टॉप प्लेअरमध्ये समावेश होऊ लागला.
ली कुन याने आपले भाषण संस्मरणीय करण्यासाठी फ्रँकफोर्ट येथील त्या हॉलमधील फर्नीचर आणि सजावटीचे साहित्य खरेदी करुन ते कंपनीच्या हेडकॉर्टरमध्ये जसेच्या तसे सजवून ठेवले.
ली कुन यांना महागड्या आणि वेगवान कार आपल्या ताफ्यात ठेवण्याचा छंद आहे.
यॉन्गिन येथे सॅमसंगचे ऑटो संग्रहालय आहे. येथे पोर्शे, रोल्स रॉइस, लुम्बॅर्गिनी, फेरारी, मेबॅक, मर्सिडिज अशा एकाहून एक कार आहेत. त्यांच्या देखभालीसाठी स्पेशलिस्ट तंत्रज्ञ आहेत.
तर असा आहे सॅमसंगचा अद्भुत प्रवास !!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.