Site icon InMarathi

या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात!

Bengali-Girls-Feature-InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही पिकू पाहिला असेलच. तसेच देवदास आणि विकी डोनरही पाहिला असेल. या चित्रपटांमध्ये ज्या नट्या आहेत त्या बंगाली दाखवल्या आहेत. असं म्हणतात की, चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. बंगाली स्त्रियांबद्दल सर्वसाधारण अशी प्रतिमा आहे की त्या अतिशय रूपवान आणि सुलक्षणी असतात. तीच प्रतिमा या चित्रपटांमधून व्यक्त होत असते.

मग असं काय विशेष आहे बंगाली मुलींमध्ये ज्यामुळे ती एक आदर्श पत्नी होण्यास पात्र ठरते? याचीच काही खास “मतं” आम्ही तुमच्या समोर आज मांडणार आहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बंगाली मुलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे डोळे. त्या आपल्या प्रियकराला डोळ्यांत गुंतवतात. त्यांच्या डोळ्यात खोलवर पाहिले असता तिचे आपल्यावर खूप प्रेम असल्याची जाणीव होते. जेव्हा ती तुमची चंपी (डोक्याला तेल मालीश) करत असेल तेव्हा तुम्हाला सर्व जग सुंदर वाटेल.

 

==

हे ही वाचा : स्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं! रहस्य जाणून घ्या…

==

त्यांना आत्मविश्वास जरी असला तरी तो अती आत्मविश्वास नसतो. त्या ज्या गोष्टी ठरवतात त्या पूर्ण करतात. “जेवलात का”, “शोना आणखीन बोलना” असं सर्व सामान्यपणे तुमची जर कोण गर्लफ्रेंड असेल तर ती म्हणत असेल. पण बंगाली मुली याला अपवाद आहेत.

त्या थेट हृदयातून संवाद करतात.

त्या औपचारिक संवाद करत नाहीत. तुमची किंवा तुमच्या मित्राची जर कोणी बंगाली गर्लफ्रेंड असेल तर त्याला विचारा ती चविष्ट पदार्थ बनवण्यामध्ये एक्सपर्ट असेल. तसंच त्याला खाण्यासही आग्रह करत असेल. विशेषतः माछेर झोल आणि भात हे त्यांचे आवडते खाद्य.

जर तुम्ही मांसाहारी असाल तर लग्नानंतरच्या जेवणाची कल्पनाच करा. तुम्हाला रोज मेजवानी असेल.

 

 

त्यांच्याशी जर गप्पा मारायला गेलात तर त्या तुम्हाला निशब्द करतील. ‘दो चुटकी सिंधूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’ हा डायलॉग एकून प्रेक्षक भारावलेच. त्यांनी तो डोक्यावर घेतलाच. पण आजही हा डायलॉग नव्यापिढीला भावला आहे. तसंच त्या त्यांच्या भाषेमध्ये अतिशय लडिवाळपणे बोलतात.

 

 

गर्लफ्रेंडच्या वडिलांशी बोलणे हे तसं धाडसाचं आणि जिकरीचं काम असतं. पण जर तुमची गर्लफ्रेंड बंगाली असेल तर तुम्ही नशिबवान आहात. कारण या मुलींचे वडिल गप्पीष्ट असतात.

बंगाली मुलींसोबत वेळ घालवण्यात कधीही कंटाळा येणार नाही. त्या लडिवाळपणे गप्पातर मारतातच पण जर तुम्ही एकत्रकुठे पिकनिकला गेलात तर त्या अधिक धाडसी मनमोकळ्या स्वभावाच्या असल्याने सहज मन जिंकतात.

 

 

बंगाली पद्धतीचं लग्न म्हणजे बराचवेळ चालणारे विधी, उत्साहपूर्ण वातावरण आणि मुख्य म्हणजे जेवणासाठी ओळखले जाते.

भाजी बाजारात भाव करण्यात बंगाली महिला प्रचंड चतुर असतात. त्या बाबत त्यांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांना हव्या त्या दरात हवी असलेली वस्तू घेतात. बंगाली लोकांमध्ये डाक नाम म्हणजेच टोपण नावं गमतीशीर असतात. उदा. पिकू, मिश्ती, शोन्हामोनी इ.इ. त्यामुळे तुम्हाला प्रेमाने हाकमारण्यासाठी वेगळे नाव शोधायची गरज नाही.

==

हे ही वाचा : जाणून घ्या स्त्री सौंदर्य खुलविणाऱ्या काजळाबद्दलची अतिशय रंजक व उपयुक्त माहिती!

==

 

ज्याप्रमाणे बंगाली मुली भाव करण्यात पटाईत असतात. त्याचप्रमाणे त्या भांडणातही पटाईत असतात. तुमचं जर त्यांच्याशी भांडण झालं तर तुम्ही हारलात म्हणूनच समजा. दुर्गापुजा हा त्यांचा आवडता सण इतर कोणत्याही सणापेक्षा त्या अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात.

या सणादरम्यान तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात तर त्यांच्या उत्साहाचे अनोखे रुप तुम्हाला पहायला मिळेल. बंगाली मुली फार बडबड्या नसतात. त्या तुमच्या प्रत्येक सेकंदाची नोंद ठेवत नाहीत. दर तासाला फोन करून कुठे आहात विचारत नाहीत.

पण जर का तुम्ही कोणत्या दुसऱ्या मुलीकडे पाहिलंत तर तुमची खैर नाही.

 

 

बंगाली मुली ह्या आधुनिक आणि निर्भिड असल्याचं आपण वर वाचलच तसंच त्या जिन्स-टिशर्ट आणि इतर मॉडर्न ड्रेसिंग तर करतातच. पण साडी हे त्यांचं सौंदर्य अधिक खुलवतं. वाचन हे माणसाला सजग बनवतं. साक्षर बंगाली मुली या साहित्य आणि इतर प्रकारच्या वाचनात पारंगत असतात.

“आमी तुमारो भालो बाशी”

– म्हणजेच बंगाली भाषेत I LOVE YOU म्हणालात तर त्या ताबडतोब वितळतात. त्या भावनिक आहेत हे सांगायला नकोच. रसगुल्ला, मिश्ती दही (गोड दही), संदेश ( मिठाई) हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत. ते त्या मुलींनी कितीही खाल्ले तरीही त्या जाडजूड होत नाहीत.

 

 

सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सर्वसमावेशक आहेत.

तुम्ही त्यांना कलाकुसर, डेकोरेशन, नाच गाणं, जेवण यापैकी काही करायला सांगा. त्या सर्वांमध्ये पारंगत असतात. पु.लं देशपांडे शांतिनिकेतन येथे बंगाली भाषा शिकण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांचे अनुभव ‘मुक्कामपोस्ट शांतीनिकेतन’मध्ये लिहीले आहेत. त्यामध्ये बंगाली महिला, पुरुष, समाज आणि त्यांची कलाकुसर यातील काहीच सुटले नाही.

पु.लंनीच त्यांच्या एका पुतण्याला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की,

सालस पण छंद असलेल्या मुलीशी लग्न कर, ती तुला जीवनाच्या वेगळ्या अंगाचे दर्शन घडवेल.

तसंच काहीसं बंगाली मुलींमध्ये असावं.

 

==

हे ही वाचा :  दूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता!

==

या लेखामागे आपल्या मराठी मुलींचा कोणत्याही प्रकारे तेजोभंग करण्याचा उद्देश नाही बरं का! या आर्टिकल चे टायटल आहे, “ह्या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात!” “अनेकांना” असं वाटतही असेल, पण तुम्हाला काय वाटतं, ते जास्त महत्वाचं! तुमचा विचार कंमेंट्स मधून जरूर कळवा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version