Site icon InMarathi

भारतातील शहरं किती सुरक्षित आहेत? वाचा विचार करायला लावणारा अहवाल..

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आजच्या परीस्थितीत पेपर वाचायला घेतला किंवा न्यूज बघायला बसलो की त्यात सर्वात जास्त गुन्हेगारीच्या बातम्या पाहायला मिळतात. त्यामुळे आपला देश खरचं सुरक्षित आहे का, हा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. जगातील प्रत्येक देशाने त्यांच्या-त्यांच्या परीने सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य ती व्यवस्था केलेली आहे.

तशीच व्यवस्था भारतात देखील आहे, तरी भारतात सतत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. देशातील वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालणे खूप गरजेचे आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही योग्य निर्णय घ्यावेच लागतात. आपल्यापेक्षा प्रगत देशांमध्ये तिथल्या नागरीकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जातो तसा आपल्याकडेही होतो पण हवा तेवढा नाही. महत्वाच म्हणजे भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूरू यांसारखी महत्वाची शहरेच आता सुरक्षेच्या दृष्टीने मागे पडत चालली आहेत. त्यामुळे आता यावर काहीतरी उपाययोजना नक्की करायला हवी. नाहीतर देशातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येईल.

jagran.com

आज आपण जगातील काही अश्या शहरांची माहिती घेणार आहोत, जे सुरक्षेच्या बाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत.

टोकियो शहर हे जगातील सर्वात सुरक्षित शहर असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. तर पाकिस्तानातील कराची हे सर्वात असुरक्षित शहर मानले गेले आहे. ‘द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ च्या ‘सेफ सिटी इंडेक्स- २०१७’ मधून ही माहिती समोर आली आहे.

hospitalityonline.com

पाकिस्तान हा देश नेहमीच असुरक्षित मानला जातो, त्यामुळे या देशातील शहरे बाकी देशातील शहरांपेक्षा असुरक्षित आहेतच.

crisisgroup.org

टॉप १० सुरक्षित शहरांमध्ये आशिया आणि युरोप खंडातील देशांमधील शहरांचा दबदबा असल्याच या यादीतून दिसून आलं. या यादीमध्ये जपानचे टोकियो हे शहर अव्वल स्थानी आहे.

सुरक्षतेच्या बाबातीत सर्वोत्तम असलेली दहा शहरे पुढीलप्रमाणे-

१. टोकियो, जपान

२. सिंगापूर

३. ओसाका, जपान

४. टोरटो, कॅनडा

५. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

६. एमस्टर्डम, नेदरलँड्स

७. सिडनी, ऑस्ट्रेलिया

८. स्टॉकहोम, स्वीडन

९. हॉंगकाँग

१०. ज्युरीख, स्वित्झर्लंड

अशी ही सुरक्षेमध्ये सर्वोत्तम असलेली जगातील १० शहरं आहेत.

त्याचप्रमाणे सर्वात कमी सुरक्षित देश पुढीलप्रमाणे-

कराची, पाकिस्तान

यंगून, म्यानमार

ढाका, बांगलादेश

जकार्ता, इंडोनेशिया

हो ची मिन्ह, व्हियतनाम

तेहरान, इराण

भारताची राजधानी दिल्लीचा सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये ४३ वा क्रमांक लागतो, तर मुंबईचा ४५ वा क्रमांक लागतो. भारतातील ही प्रमुख शहरे सुरक्षेच्या बाबतीत बाकी देशांच्या तुलनेत खूप मागे पडली आहेत.

india.com

चीनमधील बीजिंग आणि शंघाई या दोन शहरांनी देखील टॉप ३५ मध्ये स्थान मिळवले आहे.

chinalawblog.com

या इंडेक्समध्ये ६० शहरांना समाविष्ट करण्यात आलेले आहे. या शहरांना पर्सनल सिक्युरिटी, डिजिटल सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा यांसारख्या ४९ स्टँडर्ड्सच्या आधारावर ही यादी बनवण्यात आलेली आहे. २०१५ मध्ये या इंडेक्समध्ये ५० शहरांची नावे होती.

मुंबई आणि दिल्ली २०१५ च्या तुलनेत एका स्थानाने खाली आलेली आहेत. तर २०१५ च्या तुलनेत खूप शहरांच्या सुरक्षेची पातळी ढासळली  आहे.

सुरक्षित शहरांच्या या यादीवरून हे स्पष्ट होते की, भारताला आपल्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये अजूनही खूप सुधारणा करण्याची गरज आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version