Site icon InMarathi

कॉमिक्सपेक्षा भारी, खरेखुरे ६ भारतीय, ज्यांच्याकडे आहे असामान्य क्षमता!

Nandana Autistic Inmarathi' Feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मानवी शरीर म्हटलं की त्याला काही मर्यादा आल्या. पण कल्पनेला मर्यादा नसतात. कल्पनेत आपण माणूस उडताना बघतो. विना ऑक्सिजन सिलेंडर पाण्याखाली जातो. कल्पनेत आपण शक्तिमान, सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडर मॅन इतकचं कशाला जेम्सबाँडही बघितला आहे. ते दिसतात माणसांसारखे पण त्यांच्याकडे अशी काही शक्ती असते, ज्यामुळे आपण कल्पनेत विचार करतो त्या गोष्टी ते प्रत्यक्षात करताना दाखवले जातात. नावाजलेला हॅरी पॉटरही याला अपवाद नाही. या गोष्टी मानवी मनातील कल्पना दाखवतात म्हणूनच आपण त्यांना डोक्यावर घेतो. याचा परामर्श घेणारी कविता म्हणजे,

‘सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्याकाठी’…

या कवितेत आपल्याला माणसाची कल्पना दिसून येते. आज आपण मानवी शरीर आणि त्यातील अपवादात्मक शक्ती यांची माहिती करून घेणार आहोत.

१) मनोज चोप्रा :

छत्तीसगढचे ६.५ फुट उंची आणि १५५ किलो वजन असलेली भारदस्त शरीरयष्टी असलेले मनोज चोप्रा. त्यांच्यानावे अनेक पराक्रमांची नोंद केल्या गेली आहे. मनोज यांनी शक्ती प्रदर्शनाचे अनेक प्रयोग केले असून ते मोटिवेशनल देखील स्पिकर आहेत.

त्यांनी जगातील ४० देशांमधील शाळांत तीन हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ते बेसबॉलची स्टिक तोडतात. दोन हातात दोन मुलांना सहजपणे उचलतात. इ.इ.. त्यांच्या या ताकदीची दखल सीएनएन, फॉक्सन्यूज, इएसपीएन, एबीसी, युएसए सारख्या चॅनल्सनी घेतली आहे.

आता इतक्या चॅनलनी दखल घेतलेल्या व्यक्तीला पुरस्कारही तितकेच मिळाले असतील. ते जगातील १४ वे शक्तीशाली व्यक्ती आहेत. तसेच त्यांना आशिया आणि भारतातील सर्वात शक्तीशाली व्यकटी म्हणून गौरवण्यात आले आहे. तसचं छत्तीसगढ जायंट, बँगलोर भिमा, गिनज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.

२) प्रियांशी सोमानी :

गणित हा अनेकांचा नावडता विषय असेल. पण याच गणितात प्रियांशी सोमानी या मुलीने आश्चर्य वाटावे असं काम केले आहे. प्रियांशी आता १८ वर्षांची आहे. प्रियांशीचे वडील बिझनेसमन आहेत. ती मेंटल कॅलक्युलेटर म्हणून ओळखली जाते.

ती मेंटल कॅलक्युलेशन वर्ल्डकप २०१० ची विजेती आहे. वर्ग, वर्गमुळ आणि अनेक गणिती प्रकरांमध्ये तीने १००% बरोबर उत्तरं दिली आहेत. तिचे नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. जागतिक गणित दिवस २०११ साली तिला भारताची राजदूत म्हणून बोलवण्यात आले होते. आता तिला गणितातला एप्लुस अवार्ड मिळवण्याची इच्छा आहे.

३) मंकी मॅन :

स्पायडर मॅन हा जगभरातील लोकांच्या आवडीचा सुपरहिरो आहे. तो त्याच्या हातातून जाळे सोडण्याच्या सुपर पावरद्वारे इथून तिथे उड्यामारतो. झोके घेतो, इमारतींवर चढतो इ.इ. आपण बघितले आहेच. कर्नाटकातील ज्योती राज उर्फ कोटी राजू किंवा मंकी मॅन म्हणून ओळखले जातात. हे स्पायडरमॅन सारखेचं भिंतीवर चढतात.

कर्नाटकातील जोग धबधब्यावर चढणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. या धबधब्याची उंची ८३० फुट आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे ही म्हण आपण ऐकली असेल पण ज्योतींनी ती ही म्हण बदलली. त्यांनी प्रवाहा विरुद्ध चढून दाखवले. तसेच मसुरी येथील क्लॉक टॉवरवर ते १५ मिनिटांत चढले होते. ग्रिप सुटू नये म्हणून ते हातांना मॅग्नेशियम कार्बोनेट पावडर लावतात.

४) राज मोहन नायर :

माणसाला विजेचा शॉक बसला तर काय होऊ शकते हे कोणालाही सांगायला गरज नाही. पण मानवी शरीराच्या क्षमतेपेक्षा १० पट जास्त विजेचा धक्का सहन करायची क्षमता असलेल राज मोहन नायर हे खरेखूरे सुपरह्युमन आहेत.

राज मोहन नायर यांना इलेक्ट्रीक मॅन म्हणून ओळखले जाते. ते एक असे व्यक्ती आहेत, ज्यांचे प्रराक्रम बघितल्यानंतर त्यांना मानवी इलेक्ट्रीसिटी कंडक्टर ही उपमा द्यावीशी वाटते. शरीरात विजेची वायर जोडून ते बल्ब किंवा इस्त्रीला वीज पुरवठा करतात.
मानवी शरीरातून विजेचा प्रवाह गेल्याने बल्ब पेटतो हे कल्पनेतच होऊ शकतं. पण नायर हे प्रत्यक्षात करून दाखवतात.

सात वर्षाचे असताना त्यांची आई दगावली. ते घोर निराशेत असताना त्यांनी विजेच्या प्लांटवर चढून चालू विजेची वायर धरली तरीही त्यांना काही झाले नाही. तेव्हा त्यांना लक्षात आले की, आपल्याला निसर्गाने एक वेगळी शक्ती दिली आहे.

 ५) अक्रीत जसवाल :

अक्रीत जसवाल हा वयाच्या १२ वर्षी मेडिकल स्टुडंट झाला. इतकंच नाही तर पाचव्या वर्षी त्याने शेक्सपिअर वाचायला सुरवात केली होती. जरा आठवा आपण वयाच्या पाचव्या वर्षी काय वाचत होतो. अक्रीत आता २० वर्षांचा आहे, सध्या तो अप्लाईड केमेस्ट्री मध्ये मास्टर्स करतोय.

६) नंदना :

९ वर्षांच्या नंदनाला ऑटिस्टिक स्पॅक्ट्रम डिसॉर्डर नावाची व्याधी आहे. या व्याधीतील लोक एकाजागी लक्षं केंद्रीत करू शकत नाहीत. तसंच बोलूही शकत नाहीत. पण नंदनाला – तिचे आई वडील काय म्हणणार आहेत – हे त्यांनी काही बोलायच्या आधीच कळतं…! आपली आई काय करत आहे हे नं बघताच नंदना ओळखू शकते! आहे ना आश्चर्य !

एकदा नंदनाची आई स्वयंपाक करत होती त्यावेळी नंदनाने तिच्या जवळ जात ती काय बनवत आहे हे सांगितले होते. तेव्हा नंदनाच्या आईला या गोष्टीची जाणीव झाली.

आपल्या अवती भवती असे लोक आहेत, ज्यांच्याकडे फक्त कल्पनेत पाहता यावी अशी शक्ती आहे. हे बघून खरच थक्क व्हायला होतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version