आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
सध्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगातील सर्व माणसे एकमेकांशी जोडली गेली आहेत. व्हॉट्सअप आणि फेसबुक यांच्याशिवाय लोकांचा दिवसच पूर्ण होत नाही. या व्हॉट्सअपमुळे लोक एकमेकांच्या अजून जवळ आली आहेत. या सोशल नेट्वर्किंगचे काही फायदे आहेत, तर काही तोटे देखील आहेत. पण यांच्या वापरामुळे लोकं प्रगत झालेली आपल्याला दिसून येतात. वॉट्सअपवरून आता तुम्ही कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकता, त्यामुळे आज कोणत्याही माणसाशी आपण समोरासमोर बोलू शकतो आणि यासाठी काही वेगळे पे देखील करावे लागत नाही, फक्त तुमच्या नेटवर तुम्ही हे सर्व करू शकता.
व्हॉट्सअप हे खूप कमी वेळेत लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. फेसबुकनंतर जर कोणते सोशल नेटवर्किंगसाठी लोकांना कुठला अॅप आवडला असेल, तर तो म्हणजे व्हॉट्सअप. या अॅपमुळे दरदिवशी नवनवीन माहिती आपल्याला मिळते. आपण ह्यामुळे लोकांच्या जवळ आलो आहोत. जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअप’ आपल्या वापरकर्त्यांसाठी या सणामध्ये उपहाराच्या स्वरूपात एक नवीन फिचर घेऊन आले आहे.
व्हॉट्सअप वापरकर्ते आता आपली लोकेशन देखील या मॅसेजिंग अॅपच्या मदतीने सेव्ह करू शकता. आतापर्यंत व्हॉट्सअप वापरकर्ते आपल्या कॉन्टेक्टच्या मदतीने आपली लोकेशन शेयर करू शकत होते.
गेल्या मंगळवारी व्हॉट्सअपने रियल टाईम लोकेशन शेयर करण्याची सुविधा देण्याची सुरुवात केली आहे. या फिचरच्या मदतीने आपले मित्र आपल्या लोकेशनवर सोप्या पद्धतीने लक्ष ठेवू शकतात. या फिचरच्या मदतीने आपण आपल्या मित्रांची आणि नातेवाईकांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो.
जर समजा आपण एखाद्या ठिकाणी आपली सुट्टी घालवण्यासाठी गेलो आहोत आणि आपल्याला तिकडची काहीही माहिती नाही. अशावेळी कुठेही एकटे जाणे, कधीही सुरक्षित नसते. पण व्हॉट्सअपच्या या फिचरच्या मदतीने आपले मित्र आणि घरातील लोक सहज आपली रियल टाईम लोकेशन म्हणजेच आपण त्या वेळेला नक्की कोणत्या ठिकाणी आहोत, हे जाणून घेऊ शकतात. जर आपण कुठल्या समस्येमध्ये पडलो, तर आपले कुटुंबीय आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतात. त्यामुळे आपण आपली सुरक्षा सुनिश्चित करू शकतो. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपने End to End Encryption फिचर लाँच केले होते, ज्याच्या सहाय्याने आपण आपले मॅसेज सुरक्षित करू शकत होतो.
कसा करू शकतो या नवीन फिचरचा वापर :
१. जर तुम्ही अॅन्ड्रॉइड किंवा आयओएस वापरकर्ते असाल, तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जा आणि आपले व्हॉट्सअप अपडेट करा.
२. आता ज्या कॉन्टेक्टबरोबर तुम्ही आपले लोकेशन शेयर करू इच्छित आहात, त्या कॉन्टॅक्टवर जाऊन चॅटबॉक्स उघडा.
३. आता Attachment आयकॉनवर जाऊन लोकेशन ऑप्शनवर क्लिक करा.
४. येथे तुम्हाला शेयर लाइव्ह लोकेशन ऑप्शन दिसेल.
५. या ऑप्शनवर क्लिक करा, आता त्या कॉन्टॅक्टला तुमचे रियल टाईम लोकेशन समजत राहील.
तुम्ही कोणत्याही कॉन्टॅक्टला आपले लोकेशन शेयर करण्याची मर्यादा देखील ठरवू शकता.
एकीकडे व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरमुळे बाहेर गेलेली आपली मुले कशी असतील, पालकांचे हे टेन्शन कमी होणार आहे. तर दुसरीकडे तुम्ही तुमच्या लोकेशन संबंधी आता कुणालाही खोट बोलू शकणार नाहीत… व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरमुळे आता तुमची प्रायव्हसी संपुष्टात येणार आहे.
त्यामुळे आता हे फिचर वाटतंय तेवढ उपयोगी असणार की, डोकेदुखी ठरणार हे तर येणारा काळचं ठरवेल…
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi