Site icon InMarathi

तामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘भगवान के घर देर है अंधेर नही’ ही म्हण आपण कित्येकदा सिनेमांमध्ये ऐकली असेल.तीच म्हण भारत देशालाही लागू होते. तसंच गावात पाण्याच्या प्रवाहाने वीज निर्मिती करणारा स्वदेस मधला शाहरूख म्हणजेच मोहन भार्गव बघितला असेल.

सर्व भारतीयांना ही गोष्टं नव्याने सांगायला नको की भारतात आजही अनेक खेडी अंधारात आहेत. पण हे नक्कीच सांगायला हवे की आज त्यातली काही खेडी ही प्रकाशमान होत आहेत.

अशाच नव्याने प्रकाशमान झालेल्या तामिळनाडूमधल्या खेड्याची गोष्टं आहे. ज्यांना भारत स्वातंत्र्य झाल्याच्या ७० वर्षांनंतर आज वीज मिळाली आहे.

तामिळनाडूतील थुमन्नुर हे तसं आदिवासी बहूल गाव आहे. या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर या दिवाळीत पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळाल्याने ते आनंदात आहेत.
इतके की गावक-यांसोबत तिथले आमदारही नाचताहेत. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता तेथील आमदार व्ही.सी. अरुकुट्टी यांच्याहस्ते इलेक्ट्रीसिटीच्या दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले.
अरुकुट्टीयांनी गावक-यांसोबत स्थानिक वाद्यांच्या तालावर फेर धरला असता फॉरेस्ट विभागाच्या कर्मचा-यांनांही नाचण्याचा मोह अनावर झाला व त्यांनी जनतेच्या आनंदात नाचून सहभाग दर्शवला. या गावातील २०० कुटुंब व एका ग्रामपंचायतीच्या शाळेला वीज मिळाल्याने गावातील अबालवृद्ध आनंदात आहेत.
या गावातील रहिवासी हे शेतकरी आहेत. त्यांच्या गावात ४० लाख रुपयांचे ८० इलेक्ट्रीसिटीचे पोल आल्याने ते भारावून गेले. तब्बल चार वर्षांपूर्वी आम्ही सेंम्बुकराय आणि थुमन्नुर या गावांना वीज देण्यात यावी म्हणून तामिळनाडू डिस्ट्रीब्यूशन अँड कॉर्पोरेशनकडे प्रस्ताव पाठवला होता.
ज्याची अंमलबजावणी आज करण्यात आली. असं अशी प्रतिक्रिया स्थानिक पत्रकारांना आमदार अरुकुट्टी यांनी दिली आहे. या आधी पंचायत युनियन मिडलस्कुल मध्ये एक सौर ऊर्जेवर चालणारं पॅनल होतं. परंतू ते चालू व्हावं याकरता बरेच खटाटोप करावे लागत.
तसंच त्या उपकरणाच्या काही मर्यादा आहेत. आता पूर्णवेळ वीज आल्याने गावातील रहिवासी मिक्सर ग्राइंडर, टीव्ही, फ्रिज, पंखे व इतर उपकरणे केव्हांही वापरू शकतात. उशिरा का होईना स्थानिक प्रशासनाने त्यांना वीज दिली आहे.
===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version