दिवाळीत दिवे का लावावेत? कसे लावावेत? आणि कोणत्या दिशेला ठेवावेत? जाणून घ्या.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दिवाळी हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत असतो. यंदा कोरोनाच्या महामारीचे संकट असूनही, दिवाळीचा उत्साह मात्र कमी झालेला नाही.
फटाके फोडण्यावर यंदा बंदी घालण्यात आली असली, तरीही दिवाळीत दिव्यांचा झगमगाट होणे आणि संपूर्ण परिसर उजळून निघणे या गोष्टी होणारच आहेत.
दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देखील ओळखला जातो. या सणाला प्रकाशाचे खूप महत्व आहे. दिवाळी ही अमावस्येच्या दिवशी येत असते – जेव्हा सर्वत्र काळोख पसरलेला असतो – तेव्हा या काळोखाला दिव्याची एक छोटीशी ज्योत दूर करते.
अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अंधार हा कितीही गडद असला तरी प्रकाशाची एक किरण त्याला भेदू शकते, अंधाराचा नाश करू शकते. म्हणूनच अंधारावर प्रकाश मात करतो असे म्हणतात.
दिवाळी या सणाला जसे प्रकाशाचे महत्व आहे तसेच तो प्रकट करणाऱ्या दिव्यांचेही आहे. आपल्या मनात नेहमी हा प्रश्न येत असेल की दिवाळीत दिव्यांचे एवढे महत्व का आहे? आता दिवाळी या शब्दातच दिवा येत असल्याने त्याला महत्व असणारच…
दिव्यांना प्रकाशाचे प्रतिक मानले जाते. दिव्याची ज्योत आपल्याला जीवनात नेहमी जळत राहण्याची म्हणजेच काहीतरी करत राहण्याची प्रेरणा देते.
–
दिव्याची ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते तसेच आपणही आपल्या जीवनात अशी काही कामे करायला हवीत ज्याने इतरांना लाभ होईल.
ही दिव्याची ज्योत आपल्याला या जगाप्रती या समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी दर्शवते. स्वतः जळतांना कितीही त्रास झाला तरी इतरांना त्यांच्या अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यावे अशी प्रेरणा ही ज्योत आपल्याला देते.
तसेच दिव्याची जळती ज्योत आपल्याला नेहमी ताठ मानेने जीवन जगण्याची प्रेरणा देते. कितीही कष्ट आले तरी हार न मानता सतत कार्यशील राहण्याची शिकवण ती देते.
सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या चिनी लाईट्स आणि एलईडी बल्ब समोर आपण दिव्यांचे महत्व विसरत चाललो आहोत. पण शास्त्रानुसार असे मानल्या जाते की –
या दिवशी गायीच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावावा. दिवाळीच्या दिवशी तुपाचे दोन दिवे घराच्या मुख्य द्वारावर लावल्याने विष्णू देव आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.
तसेच इतर दिवशीही तुळशीपुढे रोज एक दिवा लावल्याने घरात नेहमी सकारात्मक उर्जा राहते. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावल्याने शनी दोषांपासून आणि राहू-केतू दोषातून मुक्ती मिळते.
दिवाळीच्या रात्री म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या रात्री घराच्या गच्चीवर दिवे ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही, असे देखील मानतात. एवढच काय तर दिव्यांची ज्योत कुठल्या दिशेने असावी याचेही एक महत्व असते असे मानतात.
जसे की ज्योत पूर्व दिशेने ठेवल्यास दीर्घायुष्य मिळते. दक्षिण दिशेने ठेवल्यास हानी होते. पश्चिम दिशेकडे ठेवल्यास दुखः मिळते, तर उत्तर दिशेकडे ठेवल्याने धन, आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते.
तसेच दिव्याची ज्योत पेटवल्यानंतर ती विझवणे हे अशुभ मानले जाते. दिव्याला दिवा लावून त्याची ज्योत पेटवणे हे देखील चुकीचे मानले जाते.
तर असे आहे हे दिवाळीतील दिव्यांचे महत्व… या एका छोट्याश्या दिव्याकडून आपण जीवनाचा आदर्श शिकू शकतो.
काय तर मग मंडळी, यापुढे दिवाळीत दिवे लावताना तुम्हाला लक्षात राहील ना, ते करण्यामागचे महत्त्व!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.