Site icon InMarathi

आपण एस्कलेटरचा चुकीच्या पद्धतीने वापर करतोय – जाणून घ्या योग्य पद्धत!

escalator inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – विशाल दळवी 

===

सध्या एस्कलेटर म्हणजेच सरकते जिने सर्रास पाहायला मिळतात. पूर्वी जेव्हा एस्कलेटर भारतात दाखल झाले तेव्हा एखादी जादू बघावी तसे लोक या जिन्यांकडे पाहायचे. त्यावर पाय टाकताना गोंधळून कित्येकांचं कंबरडं मोडलं असेल याची गणतीच नाही.

पण आता आपल्याला या जिन्यांची हळूहळू सवय होऊ लागली आहे. ७-८ वर्षाचं चिमुरडं पोर अगदी सहज एस्कलेटरवर पाय टाकून युद्ध जिंकल्याचा अविर्भाव चेहऱ्यावर आणतं…!

 

एस्कलेटर मनुष्य प्राण्याच्या वेगवान जीवाला अधिक वेग देण्यासाठी बनवलं गेलं, असं एस्कलेटरच्या निर्मात्यांच म्हणणं!

पण आपल्याकडे अगदी उलट घडतं. माणसं एस्कलेटरवर इतकी ढम्मपणे उभी असतात की जोवर एस्कलेटर शेवटच्या पायरीपर्यंत जात नाही तोवर त्यावरून हलत नाही.

परिणामी ज्या माणसाला घाई असते तो ताटकळत मागेच उभा राहतो. कारण एस्कलेटरवरून धावणं आपल्याकडे वर्ज्य आहे, नाही का?!

===

हे ही वाचा – लिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचं शास्त्रीय कारण जाणून घ्या!

===

समजा आम्ही तुम्हाला सांगितलं, की एस्कलेटरवर कुठेही मख्खासारखं उभं रहाणं चुकीचं आहे – तर?

 

हो हे खरं आहे.

जेव्हा एस्कलेटरची निर्मिती झाली तेव्हा त्याचा मूळ उद्देश होता, लोकांना जास्त मेहनत करायला नं लावता त्यांना एका ठिकाणाहून खाली आणणे किंवा एका ठिकाणाहून वर नेणे.

त्यामुळे एस्कलेटर वापरण्याची मूळ पद्धत अशी सांगितली होती, की ‘ज्या लोकांना आरामात जायचे आहे त्यांनी एस्कलेटरच्या एका बाजूला उभे रहावे. जेणेकरून ज्या माणसाला घाई आहे तो एस्कलेटरच्या दुसऱ्या बाजूकडून धावत जात लवकरात लवकर पोचू शकेल.’

 

आपल्याकडे मात्र डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला लोक आरामात उभे असतात. त्यांचं काही बिघडत नाही पण मागच्याला ‘मुका मार’ बसतो त्याचं काय??

 

आता अनेक देशांत पोस्टरच्या पद्धतीने लोकांना एस्कलेटरची मूळ पद्धत सांगून योग्य रीतीने  एस्कलेटरचा वापर कण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. आपल्याकडे देखील लोकांना मूळ पद्धत सांगण्याची नितांत गरज आहे.

===

हे ही वाचा – केवळ एका (अंध)श्रद्धेपोटी मुंबईतील उंच इमारतींमध्ये एक गंमतीशीर साम्य आहे!

===

तर मित्रांनो – पुढच्या वेळेपासून तुम्हाला घाई नसेल तर एस्कलेटर वरून चढताना वा उतरताना डाव्या बाजूला शांत उभे राहा. जेणेकरून ज्याला घाई आहे त्याचा खोळंबा होणार नाही!


आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version