Site icon InMarathi

या रेल्वे स्थानकांवर रात्री गेलात तर…

haunted railway station inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रेल्वेने प्रवास करायला सगळ्यांनाच आवडते. कमी दरात आपल्याला रेल्वेमध्ये चांगल्या सुविधा मिळतात. रेल्वेने आता जगातील खूप शहरे जोडली गेली आहेत. काही लहान गावांमध्ये देखील आता आपल्याला रेल्वे स्थानके झालेली आपल्याला दिसून येतात. दळणवळणाची कितीतरी नवीन साधने आता आली आहेत, तरी देखील रेल्वेचे महत्त्व कुठेही कमी झालेले दिसून येत नाही. या रेल्वेमुळे विकासामध्ये देखील फार मोठा हातभार लागला आहे. पण जगामध्ये काही अशी रेल्वे स्थानके देखील आहेत, जिथे भूत असण्याची चर्चा कितीतरी वेळा झाली आहे. आज आम्ही तुम्हाला अश्याच काही रेल्वे स्थानकांची माहिती देणार आहोत, जिथे लोकांनी काही तरी भयानक पाहिले आहे. चला तर मग जाणून घेऊया, या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांबद्दल..

 

१. युनियन स्थानक, फिनिक्स, यूएसए :

timeincuk.net

१९५० पर्यंत हे स्थानक फिनिक्सचे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक मानले जात होते. पण या शहरामध्ये विमानतळ बनवल्यानंतर या स्थानकाला १९५५ मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला येथे एक भूत फिरताना दिसले होते. या स्थानकाची देखरेख करणारा कर्मचारी म्हणतो की,

एकेदिवशी अचानक कोणीतरी त्याच्या डोक्यावर मारले पण त्याला लांबवर कुणीही दिसले नाही.

 

२. ग्लेन ईडन रेल्वे स्थानक, न्यूझीलँड :

tripadvisor.com

हे स्थानक न्यूझीलँडच्या पश्चिमी ऑकलँडमध्ये स्थित आहे, जे एका कब्रस्तानच्या जवळ आहे. ११ जानेवारी १९२४ मध्ये या स्थानकावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता, जेव्हा एका धावत जाणाऱ्या रेल्वेचा हुक त्याच्या डोळ्यांमध्ये घुसला होता. तेव्हापासून त्याचा आत्मा राखाडी रंगाचा कोट घालून या स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसते, असे म्हटले जाते.

 

३. काऊबाऊ रोड रेल्वे स्थानक, चीन :

blogspot.com

शांघाई शहरामध्ये असलेले हे स्थानक एकेकाळी खूप प्रसिद्ध होते, परंतु अचानक स्थानकावरून लोक गायब होऊ लागले. प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ९ लोकांचा अचानक मृत्यू झाला. असे म्हटले जाते की, एक हात येतो आणि लोकांना मारून जातो. असे म्हटले जाते की, एका मुलीने येथे आत्महत्या केली होती, त्यानंतर प्रत्येक रात्री ओरडण्याचे आवाज या स्थानकावर ऐकू येत असत. हे आवाज येणे वाढल्यामुळे आणि लोकांना येणाऱ्या अनुभवामुळे, या स्थानकाला कायमचे बंद करण्यात आले.

 

४. एडीसकोम्बे रेल्वे स्थानक, इंग्लंड :

dailymail.co.uk

इंग्लंडमध्ये असलेल्या एडीसकोम्बे या रेल्वे स्थानकाला २००१ मध्ये तोडण्यात आले, कारण १९०० च्या सुरुवातीला या लाईनवर एक रेल्वे चालकाचा मृत्यू झाला होता. मेल्यानंतर त्याच्या भुताची एक अंधुक सावली खूप लोकांना दिसून येत असे. या स्थानकाला जेव्हा तोडण्यात आले, तेव्हा देखील ही सावली लोकांना दिसली होती, असे म्हटले जाते.

 

५. बेगुनकोडोर रेल्वे स्थानक, भारत :

railyatri.in

बेगुनकोडोर हे कोलकात्यापासून १६१ किमी अंतरावरील एक गाव आहे. या गावाच्या या रेल्वे स्थानकावर पटरीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर एक सफेद साडी घातलेली एक स्त्री धावताना दिसून येते. कितीतरी वेळा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ती गायब होत असे. अश्या बातम्यांमुळे लोक येथे जाण्यास घाबरतात. पण पर्यटकांसाठी परत एकदा हे स्थानक सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्यावर काम सुरू आहे.

 

६. कोनोली स्थानक, आयर्लंड :

geograph.org.uk

कोनोली स्थानकाला आयर्लंडमधील सर्वात मोठे स्थानक मानले जात असे. १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या स्थानकाला बॉम्बने उडवण्यात आले होते. २०११ मध्ये परत एकदा या स्थानकाला बनवण्यात आले. पण प्रत्येक दिवशी रात्री येथे सैनिकाचे भूत चालताना दिसून येत असे. त्यामुळे लोकांनी येथे येणे – जाणे बंद केले, ज्यामुळे या स्थानकाला कायमचे बंद करण्यात आले.

 

७. वॉटरफ्रंट स्थानक, कॅनडा :

insidevancouver.ca

कॅनडाच्या गॅसटाउनमध्ये स्थित असलेल्या वॉटरफ्रंट स्थानकाला १९१५ मध्ये बनवले गेले होते. पण आता या स्थानकाला शहरातील सर्वात भीतीदायक जागा मानली जाते. यामागे एक गोष्ट आहे ती अशी की, १९२० च्या दरम्यान स्थानकाच्या गार्डला आणि इतर लोकांना प्लॅटफॉर्मवर एक बाई नाचताना दिसली होती. जेव्हा एकाने त्या बाईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती बाई गायब झाली. त्यानंतर येथे लोकांचे येणे – जाणे बंद झाले.

 

८. मॅक्वेरी फिल्ड्स रेल्वे स्थानक, ऑस्ट्रेलिया :

wikimedia.org

मॅक्वेरी फिल्ड्स रेल्वे स्थानक ऑस्ट्रेलियाच्या सिडनीच्या दक्षिण – पश्चिम, न्यू साऊथ वेल्समध्ये स्थित आहे. असे म्हटले जाते की, येथे रात्रीचे एका तरुण मुलीचे भूत फिरताना दिसून येते. काही लोकांनी तिच्या ओरडण्याचा आवाज देखील ऐकला आहे. ती रक्ताने माखलेली असते आणि जोरजोरात नाचत असते.

टीप: सदर माहिती ही निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने देण्यात आली असून ती कितपत खरी किंवा खोटी हे त्या भुतालाच माहित असावे.!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version