ताजमहाल हा भारताचा फक्त ऐतिहासिक ठेवा, सांस्कृतिक वारसा अजिबात नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : महेश मोहन वैद्य.
===
मला वाटतं “ताज महाल” च्या सध्याच्या वादाला काही अर्थ नाही. हा वाद फक्त “ताज महाल” कसा बांधला यावर आहे. पण खरा, महत्वाचा वाद वेगळाच आहे – असायला हवा. तो हा की – “ताज महाल” भारताचा “सांस्कृतिक वारसा” आहे की “ऐतिहासिक ठेवा”? पण काही लोक याला भारताचा “सांस्कृतिक वारसा” म्हणतात जे मला मंजूर नाही.
असं म्हणतात की तिथे पहिले मंदिर असू शकते, पण मंदिर पाडून ताज महाल उभा केला असेल किंवा कुतुबमिनार सारखे मंदिराचे अवशेष वापरून. पण मंदिराला कबरी मध्ये इतक्या चांगल्याप्रकारे बदलू नाही शकत.
–
हे ही वाचा – भारतीयांच्या अफाट स्थापत्यशास्त्राची कल्पना देणाऱ्या या ११ ऐतिहासिक वास्तु बघायलाच हव्यात
हे खरं आहे कि “पुष्कळ” लोक, “”अरबस्थान” वरून आलेले इथे येऊन अश्या इमारती कश्या बांधू शकतात?” असे “बाष्कळ” प्रश्न निर्माण करतात. पण “ताज महाल” बांधणारे बाहेरून आलेले नव्हते, इथले हिंदू कारागीर होते आणि मुस्लिम शासकाच्या कल्पनेला मूर्त रूप देणारे “हिंदूच” होते. तसेही मुघल आल्यानंतर “ताज महाल” खूप नंतर बांधण्यात आला.
त्या अगोदर लाल किल्ला, लाहोरचा किल्ला, फतेहपुर सिकरी, दिल्लीची जामा मस्जिद (थोडा काळ पुढे मागे झाला असेल) इत्यादी मोठ्या इमारतींचं बांधकाम मुघल आणि इतर मुस्लिम शासकांकडून झालेच होते की. लोक हळू हळू शिकत असतातच.
आज त्यांनी बुर्ज खलिफा बांधली. भारतात अजून बनली नाही. म्हणजे भारतीय तशी इमारत बांधू शकत नाही असे नाही. बगदाद शहर एकेकाळी मोठ्या आणि सुंदर इमारतींसाठी इतिहासात प्रसिद्ध होते.
आपण ज्याला “मुघल वास्तुशास्त्र” म्हणून ओळखतो ते फक्त इस्लामकडून आलेले नसून त्याचे मूळ हे इकडे हिंदुस्थानातच आहे. ती इस्लामी कॅरीओग्राफी किंवा नकाशी आणि हिंदू वास्तुशास्त्र याचा अजोड मिलाफ आहे. इस्लाम आक्रमण भारतात येईपर्यंत हिंदू वास्तुकारांनी अनेक अजोड आणि आश्चर्यात टाकणाऱ्या वास्तू बनविल्या आहेत.
महाराष्ट्रातील “हेमाडपंथी” मंदिर याची साक्ष देऊ शकतात. फक्त दगड एकमेकांवर रचून किंवा एकमेकात गुंतवून कोणताही वेगळा जोडणी करणारा (उदा. चुना, चिक्कन माती) पदार्थ न वापरता ही सगळी मंदिरे गेली हजारो वर्षे उभी आहेत.
अगदी भूकंपातसुद्धा यांचा दगड हलला नाही. त्या नंतर पण अनेक वास्तू अश्या आहेत ज्या आश्चर्यात टाकतात, कर्नाटकात एक मंदिर आहे ज्याच्या खांबां खालून कपडा आरपार जाऊ शकतो, तमिळनाडू येथील गोपूर अनेक मजली आहेत, अप्रतिम सूर्यमंदिर हे सगळे हिंदू कारागीरानीच बनविले आहे.
–
हे ही वाचा – ताजमहालशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत!
पण “ताज महाल” हिंदू कारागिरांनी बनवला म्हणून त्याला “सांस्कृतिक वारसा” म्हणता येणार नाही. कारण त्या कारागिराने ज्याच्या करता ती वास्तू बनवली त्याचा भारतीय संस्कृतीचा अर्थाअर्थी काही सबंध नव्हता आणि त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन कुठेही होत नाही. त्यात प्रत्येक ठिकाणी ठाशीवपणे इस्लामी संस्कृती आणि त्याचे महात्म्य समोर येते. म्हणून तो एक “ऐतिहासिक ठेवा” होऊ शकतो, पण “सांस्कृतिक वारसा” नाही.
आजकाल “गंगा – जमुनी संस्कृती” असे म्हणतात आणि त्यात भारतीय संस्कृतीला बसवायच्या प्रयत्नांत “ताज महाल” पण “सांस्कृतिक वारसा” म्हणून मोठा करतात. हा प्रयत्न आजचा नाही , हा “हिंदू – मुस्लीम ऐक्याच्या” स्वप्ना इतका जुना आहे. मात्र हा एकदम रद्दी प्रकार आहे.
मुळातच “गंगा-जमुनी तहजीब” म्हणजे “हिंदू – मुस्लीम” मिलन नसून हिंदू आणि मुस्लीम यांनी जास्त संघर्ष न करता एकमेकांसोबत वागतांना पाळायचे अलिखित सामंजस्याची पद्धत आहे. यात अर्थातच “मुस्लीम शासक” म्हणून त्यांना दिलेला जास्त मान, त्यांच्या मताला दिलेली जास्त किंमत आणि त्याच्या भाषेत केलेला व्यवहार हा प्रथम अधोरेखित होतो. यात समानता, सहिष्णुता वगैरे भानगड नसून जिथे हिंदू संघर्ष जास्त आहे – तो नं लढता कमी कसा करता येईल हा विचार “तिकडून” – तर – न मिळणारा मान मरतब, न लढता मिळतोय हा “इकडून” असा विचार होता.
म्हणूनच मी वर म्हणालो कि, “मुळात “ताज महाल” हा मुद्दाच नाहीये”. मुळ मुद्दा हा आहे कि भारत हा हिंदू बहुल म्हणून “हिंदू छाप” जगावर उमटवायची कि “सेक्युलर राष्ट्र” म्हणून तीच “गंगा – जमुनी तहजीब” चे गोडवे गात मुस्लीम शासकांनी भारताचा “सांस्कृतिक उद्धार” केला हे समजायचं हे तुमच्या हातात आहे. आणि मुख्य मुद्दा पण तोच आहे.
आपल्या नशिबाने आपल्याला मिळालेले आधुनिक नेते या विचारला पूर्ण सामोरे कधी गेले नाही, त्या मागील कारण काही असो. त्याचमुळे भारताच्या बाहेर भारताची ओळख म्हणून फक्त ताजमहल, कुतुब मिनार, लाल किल्ला असल्या गोष्टी गेल्या. पण या गोष्टींच्या शेकडो वर्षाअगोदर बांधल्या गेलेल्या हम्पीची मंदिर, कोणार्कचे सूर्यमंदिर, अजंठा-वेरूळ, तामिलनाडूची अनेक मजली गोपूर असलेली मंदिर, अश्या अनेक “सांस्कृतिक वारसा” असलेली ठिकाण भारताची भारताबाहेरील ओळख झाल्या नाही.
===
हे ही वाचा – भारतातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपतील!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.