भारत-पाक सीमा कशी तयार केली होती माहितीये? उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देशांतील संबंध आणि परस्पर ताण -तणाव यांचा भला मोठा इतिहास आहे
काश्मीरमध्ये उडणाऱ्या खटक्यांचे पडसाद आज दोन्ही देशांमध्ये आपल्याला दिसून येतात.
मिडीया आणि राजकीय परिस्थितीने आज भारत आणि पाकिस्तानला एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू बनवले आहे.
पण एक असा काळ होता, जेव्हा काही वर्षांपूर्वी हेच दोन देश बंधुभावाने एकत्र नांदत होते.
१९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण एका देशाचे दोन तुकडे झाले. ज्याने एकत्र बंधुभावाने राहणाऱ्या लोकांना दोन देशांमध्ये विभाजित केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तयार करण्यात आलेल्या या सीमेला रेडक्लिफ लाईन नाव देण्यात आले.
या सीमेचे हे नाव ब्रिटीश अॅडव्होकेट सिरीयस रेडक्लिफच्या नावावर पडले, ज्यांना भारताच्या जमिनीला दोन तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचे काम दिले गेले होते.
हा तोच अधिकारी होता, ज्याला भारताची कोणतीच भौगोलिक माहिती नव्हती, तरीदेखील लॉर्ड माउंटबेटनच्या दबावामुळे दोन महिन्यांतच ही सीमा बनवावी लागली.
रेडक्लिफला स्वतः देखील हे माहित होते की, या विभाजनाचा भारत आणि पाकिस्तान या दोघांना देखील परिणाम भोगावा लागेल. पण नाईलाजाने ते असे करण्यास तयार झाले.
याच दबावाचा परिणाम असा झाला की, १५ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीच्या वेळी गुरुदासपुर आणि फिरोजपुर हे प्रदेश पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
स्वतःची ही चूक लक्षात आल्यानंतर लॉर्ड माउंटबेटनने आदेश दिले की, या दोन्ही प्रदेशांना परत भारतामध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला परत एक रेषा आखली गेली. त्यामुळे परत एकदा अंतर्गत कलह आणि दंगल सुरू झाली.
११ ऑक्टोबरनंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये अटारी – वाघा बोर्डर अस्तित्वात आली. या बोर्डरला तयार करण्यामध्ये भारतीय सेनेचे ब्रिगेडियर महिंदर सिंह चोप्रा आणि पाकिस्तानचे ब्रिगेडियर नसीर अहमदचे महत्त्वाचे योगदान होते.
ब्रिगेडियर चोप्रा यांचा मुलगा पुष्पिंदर चोप्रा याने हजेरी लावली होती. पुष्पिंदरने सांगितले की,
आठ ऑगस्टला त्यांच्या वडिलांना १२३ इंफेट्री ब्रिगेड सोबत येथे लक्ष ठेवण्याचे काम दिले गेले होते, त्याचबरोबर पाकिस्तानकडून त्यांचे ज्युनियर आणि पाक सैन्याचे ब्रिगेडियर नसीर अहमद आपल्या सीमेची देखरेख करत होते.
पुष्पिंदर चोप्राने सांगितले की,
जेव्हा फाळणी झाली, तेव्हा येथे कोणतीच सीमा नव्हती. त्यामुळे हे समजत नव्हते की, कोणत्या बाजूला भारताची सीमा संपते आणि कुठून पाकिस्तानची सीमा सुरू होते. यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक ठेवण्यात आली. त्यानंतर चुन्याची रेघआखून सीमा तयार करण्यात आली. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानच्या बाजूला एक–एक ड्रम ठेवण्यात आला. ज्याला दोन्ही देशांच्या पोस्टच्या स्वरुपात वापरण्यात आले.
भारत आणि पाकिस्तान सीमेमुळे मोठमोठ्या घडामोडी घडल्या आणि दोन देशांतील एकत्रित असणारी माणसे मनाने देखील विभागली गेली.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.