आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza
===
स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या खूप बातम्या सध्या कानावर येत आहेत. दिवसेंदिवस स्त्रियांवर होणारे हे अत्याचार वाढतच चालले आहेत. दरदिवशी कोणीतरी स्त्री बलात्कार, घरात करण्यात येणारा अत्याचार, छेड काढणे, विनयभंग, सासरच्या लोकांनी केलेला अत्याचार यांची शिकार होत असल्याचे दिसून येते. आजकाल रस्त्याने एखादी स्त्री किंवा मुलगी जात असताना खूपवेळा त्यांची छेड काढली जाते, पण त्यांच्या तोंडाला कोण लागेल असा विचार करून या स्त्रिया गप्प बसतात. नवऱ्याच्या शोषणाने त्रस्त असलेल्या कितीतरी स्त्रिया आपण या समाजामध्ये पाहतो, पण आपला संसार वाचवण्यासाठी त्या गप्प बसतात, असे हे स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक शोषण कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. स्त्रियांना त्यांच्याविषयी माहित नसलेले अधिकार आणि त्यांच्याशी जोडलेले कायदे यांची माहिती नसणे हे स्त्रियांच्या शोषणाचे सर्वात मोठे कारण आहे.
यामध्ये स्त्रियांचे अधिकार सांगण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती जर तुमची मर्जी नसेल, तर तुमच्याकडून कोणतेही काम करून घेऊ शकत नाही आणि जर कोणी तुमची छेड काढत असेल किंवा तुमच्याबरोबर सेक्सच्या संदर्भात जबरदस्ती करत असेल, तर तुम्ही कायद्याची मदत घेऊन त्यांना धडा शिकवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या अधिकारांची माहिती असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला स्त्रियांशी निगडीत काही कायदे सांगणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील. चला तर जाणून घेऊया, या स्त्रियांच्या अधिकारांबद्दल, ज्याचा आधार घेऊन स्त्रिया स्वतःला न्याय मिळवून देऊ शकतात.
१. जन्माच्या आधी गर्भ लिंग चाचणी करणे आणि एखाद्या निवडक लिंगासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, कायद्याने गुन्हा आहे.
२. चौकशी दरम्यान पोलीस स्त्रियांना त्यांच्या घराच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी चौकशीसाठी बोलावू शकत नाही.
३. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या स्त्रीने आपली साक्ष ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटद्वारे लवकरात लवकर रेकॉर्ड केली पाहिजे.
४. स्त्रियांना कोणत्याही प्रकरणामध्ये केस फाइल करण्यासाठी आणि सेल्फ प्रोस्टेटसाठी विनामुल्य कायदेशीर मदत घेण्याचा हक्क आहे.
५. स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा इशारा करणे किंवा शिटी वाजवून छेड काढणे, हा कायदेशीर गुन्हा आहे.
६. बलात्कार पीडित स्त्री, महिला पोलीस ऑफिसरला आपली साक्ष देण्यासाठी आपल्या इच्छेनुसार जागेची निवड करू शकते.
७. इंटरनेटवरून कोणत्याही स्त्रिचा विनयभंग करणे, हा गुन्हा मानला जातो.
८. कोणतीही अविवाहित स्त्री मुलगा किंवा मुलगीला दत्तक घेऊ शकते.
९. एखाद्या स्त्रीने नकार दिल्यानंतर देखील सारखा – सारखा तिचा पाठलाग करणे किंवा बोलण्याचा प्रयत्न करणे, हा कायद्याने गुन्हा आहे.
१०. कोणत्याही स्त्रीवर अश्लील भाषेचा वापर करणे, तिच्याकडे संभोग करण्यासाठी मागणी करणे किंवा तिच्या इच्छेविरुद्ध तिला पॉर्न दाखवणे, हा कायद्याने गुन्हा आहे.
११. जर एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीबरोबर हिंसात्मक व्यवहार करत असेल, तर तो व्यक्ती ती स्त्री राहत असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही.
मग महिलांनो, तुम्हाला आज तुमचे अधिकार नक्कीच लक्षात आले असतील, मग याच अधिकारांचा फायदा घेऊन तुमच्यावर किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर नक्कीच दाद माग आणि त्याविरुद्ध लढून न्याय मिळवा.
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.