आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
TATA Airlines म्हणून १९३२ साली जे आर डी टाटांनी स्थापन केलेली विमानसेवा नंतर “देशाची” झाली.
त्यानंतर बरेच बदल झाले. तिच्या एका शाखेने – Air India Express ने – ह्यावर्षी तब्बल ३६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.
SBI Capitals Ltd कंपनीने नागर विमानन मंत्रालय म्हणजेच Ministry of Civil Aviation च्या मदतीने Air India Express चा वार्षिक उलाढालीचा लेखाजोखा मांडलाय. ह्याच reports मध्ये मांडलेल्या आणि एप्रिल २०१२ मध्ये संमत केलेल्या Targets ला वेळेच्या २ वर्ष आधीच achieve केलंय. अधिकाऱ्यांच्या मते “AI कर भरून नफ्यात येण्यासाठी २०२१-२२ चं target दिलं होत जे २०१८-१९ मध्ये कर्जाचा डोंगर पार करून साध्य होणार हे नक्की दिसतंय.”
के. शाम सुंदर, Air India Charters Ltd चे अधिकारी, ह्यांच्या मते सुधारित कार्यक्षमतेच्या जोरावर हे अशक्य शक्य होत आहे.
तोटेखोर कंपनी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ह्या AI Express ने नफा मिळवण्याची प्रमुख कारणे..
- स्वस्त इंधन
सगळ्यात महत्वाचा असलेली इंधनाची किंमत कमी झाल्यामुळे AI Express ला बरीच मदत झाली आहे.
- स्टार अलायंस मध्ये सदस्य
जगातल्या सर्वात मोठ्या airline अलायंस चा भाग होणे निश्चितच एक उजवी बाजू आहे. ह्याने नेहमीच्या ग्राहकांमध्ये वाढ होण्याचा फायदा झाला. भारतातील कोणतीच airline कंपनी SkyAlliance आणि OneWorld ह्या जगातील सर्वात मोठ्या airline आघाडीचा एक सदस्य बनला आहे. आता नेमकी ही वेळ मोडी सरकारच्या पथ्यावर पडली आहे.
- खाजगीकरण
आधी Air India प्रत्येक विमानतळावर तिकीट बुकिंग पासून सगळी कामे स्वतः करत होती. पण छोट्या विमानतळांवर ही कामे खाजगी कंपन्यांना वाटली. अशा तऱ्हेने Cost Cutting करून AI Express ने नफ्यात हातभार लावला.
- सरकारचं १० वर्षांचं ३०००० हजार कोटींच Bailout package
UPA2 सरकारच्या काळात २०१२ साली मिळालेल्या १० वर्षांच्या ३०००० हजार कोटींच्या Bailout package मुळे Dreamliners सारख्या महागड्या विमानांच्या खरेदीसाठी संजीवनी मिळाली. आता एवढ्या निधीची खरच गरज होती का? हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण जगभरात अनेक देश आपल्या देशी कंपन्यांना दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी अशी packages देत असतात. इथे ह्या निधी चा फायदाच झाला.
- वाढीव प्रवासीवाहक विमाने
आता व्यापार वाढवायचा म्हणजे विमानांची संख्या वाढवायला हवीच ना? तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील ४ वर्षांत १०० विमाने वाढवण्याचा निर्धार आहे Air India Express चा.
- सुधारित कार्यक्षमता
AI Express ने कर्मचारी वर्ग प्रत्येक विमानात वाढवला ज्याने ग्राहकांना मिळणारी सुविधा अजुन सुधारली.
- जोडीला मार्केटिंग
मार्केटिंग ही आजच्या काळाची गरज बनली असून तुमचं नाणं जरी खणखणीत असेल तरी ते वाजवून लोकांना दाखवण्याची गरज आज आहे. बस तर मग AI Express ने हीच नस ओळखून मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करायला सुरुवात केली आणि प्रतिसाद मिळू लागला.
आता नफ्याची सुरुवात झालीच आहे. इथून पुढची वाटचाल इंधनाच्या किमतीच्या बदलांवर, सोयीसुविधांवर आणि ग्राहकाच्या समाधानावर अवलंबून असणार आहे. आता होणार काय हे तर येणारा काळच ठरवेल. पण AI Express च्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा बोजा विसरता कामा नये.
आता AI Express ला आधीच्या राजेशाही थाटात, दिमाखात मिरवतांना बघायला कुणाला नाही आवडणार?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.