सरोवरावर वसलेलं आगळं वेगळं गाव…
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza
===
गावं म्हंटल की आपल्या डोळ्यांसमोर येते ते शेत, मातीची घरे, मातीचे रस्ते इत्यादी. आपल्यासाठी एका गावाची हीच परिभाषा. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या गावाबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला आश्चर्यचकित केल्याविना राहणार नाही…

पश्चिमी आफ्रीकेच्या बेनीनमध्ये एक असं गाव आहे जे पूर्णपणे सरोवरावर वसलेलं आहे. २० हजार लोकवस्तीचं हे गाव नोकोऊ सरोवरावर वसलेलं आहे. य गावाचं नाव गेनवी आहे.

या गावातील बहुतांश लोकांची घरं ही सरोवराच्या मधोमध आहे. या गावाला सरोवरावर वसलेलं आफ्रिकेच सर्वात मोठं गावं मानल्या जातं. जगभरातील पर्यटक या गावाला भेट देण्याकरिता येत असतात.

काही लोकांच्या मते १६ व्या किंवा १७ व्या शतकात तोफिनु समुदायाच्या लोकांनी स्वतःच्या रक्षणाकरिता या सरोवारचा आश्रय घेतला आणि मग ते इथलेच होऊन गेले.

त्या काळी फोन नावाची जमात या लोकांना गुलाम बनविण्याकरिता घेऊन जायचे. पण आपल्या धार्मिक मान्यतेनुसार ते पाण्यात जात नसे. म्हणूनच तोफिनु समुदायाच्या लोकांनी या सरोवराचा उपयोग आपल्या बचावाकरिता केला आणि त्यांनी या सरोवरावर आपलं गाव वसवलं.

एवढ्या वर्षांपासून हा समुदाय येथे राहत असल्या कारणाने आता या समाजाने पाण्यावरच आपली संस्कृती विकसित केली. ते यानंतर देखील येथेच राहू इच्छितात. येथील सर्व घरं, दुकानं, उपहारगृह पाण्यावरच आहेत. पाण्यापासून काही फुट उंचीवर लाकडांच्या सहाय्याने ते तयार करण्यात आले आहेत. या सरोवरावर तरंगता बाजार देखील भरतो.

गेनवी गावातील लोकांजवळ जमीन देखील आहे, जी त्यांनीच तयार केली आहे. त्यासाठी नावेत माती भरून आणावी लागली होती. मग त्या मातीने सरोवराचा काही भाग बुजवून त्यावर जमीनीचा भाग तयार करण्यात आला. आता या जमिनीवर एक शाळा आहे.
माणूस स्वतःच्या रक्षणासाठी पाण्यावर तरंगणारे गावं देखील उभारू शकतो, म्हणजे माणूस कितीही वाईट परिस्थितीतून मार्ग काढू शकतो याचचं हे एक उदाहरण.
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.