माणसाच्या विकृतीला बळी पडलेल्या या ६ ऐतिहासिक वास्तु पाहून मन सुन्न होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वास्तूशिल्पं ही प्रत्येक देशाची ऐतिहासिक धरोहरे असतात. यामुळे त्या देशाचा इतिहास किती समृद्ध होता याची माहिती मिळते. या वास्तू त्या देशाच्या संस्कृतीची ओळख असतात.
पण काही लोकांच्या मुर्खपणा आणि द्वेषाने जगातील कित्येक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केले. आज आपण अश्याच काही वास्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या माणसाच्या द्वेषाला बळी पडल्या.
१) निमरुद

इराक देशाच्या मोसुल या शहराच्या दक्षिणेस असलेले निमरुद हे एक ऐतिहासिक शहर आहे. ते एक पुरातन आणि सांस्कृतिक शहर आहे. हे शहर जवळजवळ ३ हजार वर्ष जुने आहे. हे शहर मेसोपोटेमिया सभ्येतेचा जिवंत पुरावा होते.
मोसुल येथून ३० किलोमीटर दूर तिरगीस नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर ई.स. पूर्व १२५० ला वसविण्यात आले होते. पण इस्लामिक राष्ट्राच्या आतंकवाद्यांनी ३ हजार वर्ष जुने हे शहर निस्तनाबूत केले. त्यासोबतच या शहराची पुरातन सभ्यता देखील मातीस मिळाली.
२) एलेक्ज़ेंड्रिया लायब्ररी

ई.स. पूर्व तिसऱ्या शतकात एलेक्ज़ेंड्रिया लायब्ररी चा निर्माण टॉलेमी आई सोटरने केला होता. त्या वेळी या लायब्ररीत 4 लक्ष प्राचीन पुस्तकं होती. जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेली विविध विषयांवरील पुस्तके येथे ठेवण्यात आली होती.
पण ज्युलिअस सीझर, रोमन सम्राट ऑरेलीयन, एलेक्जेंड्रियाच्या पोप थियोफिल्स इत्यादींनी हळूहळू या लायब्ररीला नष्ट केले.
३) बामियान

अफगाणिस्तानच्या बामियान येथे बुद्धाची १७४ फुट उंच मूर्ती होती, जिला २००१ साली तालिबानी आतंकवाद्यांनी उडवले. १५०० वर्षाहून अधिक काळापासून या मुर्त्या तेथे असल्याचं सांगितल्या जातं.
या मुर्त्या केवळ अफगाणिस्तानातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. एवढचं नाही तर युनेस्कोने यांना वर्ल्ड हेरीटेज साईट अंतर्गत सूचीबद्ध देखील केले होते.
४) पार्थेनन

पार्थेनन अथीनियन एक्रोपोलीस येथील एक मंदिर आहे. हे मंदिर ग्रीस येथील देवी एथेना हिला समर्पित आहे. या देवीला एथेंसचे लोकं संरक्षक देव म्हणून मानतात. या मंदिराचे बांधकाम ई.स. पूर्व ४४७ साली सुरु झाले. तर ई.स. पूर्व ४३८ साली हे मंदिर पूर्ण झाले.
हे प्राचीन युनानचे सर्वात महत्वपूर्ण मंदिर आहे. पार्थेननला प्राचीन ग्रीस आणि पश्चिमी सभ्यतेचे प्रतिक मानल्या जाते. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक स्मारकांमधून एक मानल्या जाते. पण ई.स. पूर्व ४८० मध्ये फारसी आक्रमणकर्त्यांनी या मंदिराला नष्ट केले.
५) नालंदा

पटना येथून ९५ किलोमीटर अंतरावर असलेले नालंदा हे एकेकाळी ज्ञानाचे महासागर मानल्या जायचे. नालंदा हे एक प्रसिद्ध विश्वविद्यालय होते. येथे जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी यायचे. या भव्य विद्यालयात महावीर आणि गौतम बुद्ध देखील आले होते.
नालंदा विश्विद्यालय ५ व्या शतकात तयार करण्यात आले होते. पण जेव्हा इस्लाम भारतात आपले पाय पसरवू लागला तेव्हा हळूहळू नालंदा विश्विद्यालय आपले अस्तित्व गमावू लागले. अखेर बख्तियार खिलजीने या विद्यालयाला पूर्णपणे मातीमोल केले.
६) बालशामिन मंदिर

या मंदिराचा निर्माण १७ व्या शतकात झाला होता. रोम सम्राट हादरीयान याने १३० व्या शतकात याचा प्रचार व प्रसार केला होता. बालशामिन नावाचे हे मंदिर युनेस्कोच्या यादीत समाविष्ट आहे.
सीरियाच्या पलमायरा या शहरात हे मंदिर होते. सीरियाची राजधानी दश्मिक येथे इस्लामिक राष्ट्रांच्या जिहादींनी २०१५ साली या प्राचीन मंदिराला बॉम्बने उडवले.
अशा या काही वास्तू ज्यांनी या जगाच्या इतिहासात आपली एक ओळख निर्माण केली, ज्या आपल्याला आपल्या ऐतिहासिक संस्कृतीची जाणीव करून देतात त्याच आज माणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या…
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.