Site icon InMarathi

आपल्या आवडीचे हे १२ सेलिब्रिटी मृत्यूनंतर देखील पैसा कमवत आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखाद्या माणसाला आपल्या जीवनात सर्वात मोठी चिंता असते, ती म्हणजे पैसा कमावण्याची. माणसाला आपल्या जीवनात पैसा कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

पण आज आम्ही तुम्हाला अश्या काही लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी जिवंतपणी तर खूप कमाई केली आणि प्रसिद्धी देखील मिळवली. पण आज ते ह्या जगात नसून देखील पैसा कमवत आहेत, काय खोटे वाटतंय? पण हे सत्य आहे. चला मग जाणून घेऊया, आज अश्याच काही व्यक्तींबद्दल..

किंग ऑफ पॉपच्या नावाने प्रसिद्ध मायकल जॅक्सन मृत्यूनंतर कोट्यवधींची कमाई करत आहे. फोर्ब्स मॅगझीनच्या आकडेवारीनुसार २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मृत सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली होती.

त्यात मायकल जॅक्सनने ११५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ७२६ कोटी रुपयांसह या यादीत सर्वात वरचे स्थान पटकावले होते. ही कमाई त्यांच्या जुन्या अल्बममधून मिळालेल्या रॉयल्टीचा एक भाग आहे. त्याधीच्या वर्षी त्याच्या कमाईचा आकडा ८६१ कोटी रुपये होता.

अॅल्व्हिस प्रेस्लेही आघाडीवर

या यादीत मायकल जॅक्सननंतर त्याचे सासरे आणि प्रसिद्ध पॉप सिंगर अॅल्व्हीस प्रेस्ले (३५४ कोटी), पीनट्स कार्टुनिस्ट चार्ल्स शुल्ज (२५५ कोटी) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीमध्ये बॉब मर्ले आणि एलिजाबेथ टेलर हे टॉप ५ मध्ये आहेत.

१. मायकल जॅक्सन

मृत्यूच्या सहा वर्षांनंतरही कमाईमध्ये मायकल जॅक्सन आघाडीवर आहे. जॅक्सनचा दुसरा अल्बम ‘एस्केप’ रिलीज झाला. तो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. मायकलचा ‘इम्मोर्टल’ हा शो आजही लोक आवडीने एन्जॉय करतात.

 

 

कमाई -११५ मिलियन डॉलर (सुमारे ७२६ कोटी)
मृत्यू – २५ जून, २००९
मृत्यूचे कारण -ओव्हरडोस / हत्या
वय – ५०

२. एल्विस प्रेस्ली

अॅल्व्हिसला किंग ऑफ रॉक अँड रोल असे म्हटले जाते. त्यांच्या फेसबुक पेजला मिलियन्सपेक्षा जास्त लाइक्स आहेत.

 

 

कमाई – ५५ मिलियन डॉलर (सुमारे ३४७ कोटी)
मृत्यू – १६ ऑगस्ट १९७७
मृत्यूचे कारण – हृदय विकाराचा झटका
वय – ४२

३.चार्ल्स शुल्ज

चाली ब्राऊन आणि स्नुपी सारखे कार्टून तयार करणारे कार्टूनिस्ट चार्ल्स शुल्ज यांना फोर्ब्सने तिसरे स्थान दिले आहे.

 

 

कमाई – ४० मिलियन डॉलर (सुमारे २५२ कोटी)
मृत्यू – १२ फेब्रुवारी २०००
मृत्यूचे कारण – हृदय विकाराचा झटका
वय – ७७

४. एलिजाबेथ टेलर

तत्कालीन सेक्स सिंबॉल असलेल्या टेलरच्या नावाचे परफ्युम आजही सर्वाधिक विकले जातात. तिच्या जुन्या चित्रपटांची देखील बक्कळ कमाई होती.

 

 

कमाई – २० मिलियन डॉलर (सुमारे १२६ कोटी)
मृत्यू – २३ फेब्रुवारी २०११
मृत्यूचे कारण – हार्ट अटॅक
वय – ७९

५. बॉब मार्ले

बॉब मार्लेची कमाई अल्बममधून होते. मार्ले अपॅरल, लाइफ स्टाईल,क्लोदिंग ही लाँच करण्यात आले आहे.

 

 

कमाई – २१ मिलियन डॉलर (सुमारे १३२ कोटी)
मृत्यू – ११ मे १९८१
मृत्यूचे कारण – कँसर (कर्करोग)
वय – ३६

६. मार्लिन मनरो

मार्लिन मनरो फोर्ब्सच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. तिची कमाई कपडे आणि लाँजरी ब्रँडमधून होते.

 

 

कमाई – १७ मिलियन डॉलर (सुमारे १०७ कोटी)
मृत्यू – ५ ऑगस्ट १९६२
मृत्यूचे कारण – ओव्हरडोस
वय – ३६

७. जॉन लेनन

आय ट्यूनच्या विक्रीमधून कमाई होते. त्याशिवाय त्यांचे शो देखील आयोजित केले जातात.

 

 

कमाई – १२ मिलियन डॉलर (सुमारे ७५ कोटी)
मृत्यू – ८ डिसेंबर १९८०
मृत्यूचे कारण – हत्या
वय – ४०

८. अल्बर्ट आइनस्टाइन

पोस्टर आणि टी – शर्टच्या मोठ्या रेंजनंतर आता त्यांच्या ब्रँडचे टॅबलेट डिझाईन केले जात आहे.

 

 

कमाई – ११ मिलियन डॉलर (सुमारे ६९ कोटी)
मृत्यू – १८ एप्रिल १९५५
मृत्यूचे कारण – नैसर्गिक
वय – ७६

९. पॉल वॉकर

फास्ट अँड फ्युरीयस या हॉलीवूड चित्रपटामधून पॉल वॉकरने प्रेक्षकांच्या मनामध्ये मानाचे स्थान मिळवले होते. आजही त्याच्या फॅन्सना त्याची उणीव जाणवत आहे. त्याच्या जाण्याने सर्वांनाच खूप दु:ख झाले.

 

 

कमाई – १०.५ मिलियन डॉलर (सुमारे ६६ कोटी)
मृत्यू – ३० नोव्हेंबर २०१३
मृत्यूचे कारण – कारचा अपघात
वय – ४०

१०. बेट्टी पेज

बेट्टी पेज ही एक अमेरिकन मॉडेल होती. १९५० मध्ये ती पिन अप फोटोमुळे चर्चेत होती. तिला ‘क्वीन ऑफ पिन अप्स’ म्हणायचे.

 

 

कमाई – १० मिलियन डॉलर (सुमारे ६३ कोटी)
मृत्यू – ११ डिसेंबर २००८
मृत्यूचे कारण – नैसर्गिक
वय – ८५

११. थियोडोर गजल

थियोडोर गजल यांच्या ‘द कॅट इन द हॅट’, ‘द लोरेक्स’, ‘डॉ सेउस’ या पुस्तकांची रॉयल्टी अजूनही सुरु आहे.

 

cbc.ca

 

कमाई – ९.५ मिलियन डॉलर (सुमारे ६० कोटी)
मृत्यू – ११ सप्टेंबर १९९१
मृत्यूचे कारण – नैसर्गिक
वय – ८७

१२. स्टीव मैकक्वीन

स्टीव्ह मॅकक्वीन हे एक अमेरिकन अभिनेते होते.

 

 

कमाई – ९ मिलियन डॉलर (सुमारे ५६ कोटी)
मृत्यू – ३० नोव्हेंबर १९८०
मृत्यूचे कारण – सर्जरी
वय – ५०

असे हे लोक आणि यांसारख्या इतर काही लोक त्यांच्या मृत्यनंतर देखील अजूनही कमवत आहेत आणि ते आजही लोकांच्या मनामध्ये जिवंत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version