आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जगामध्ये आज कितीतरी प्रकारची भांडणे चालू आहेत. इकोनॉमीमुळे सध्या देशांदेशांमध्ये काही वाद निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे काही देशांच्या अंतर्गत देखील वाद निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी हे वाद निर्माण झाले आहेत.
काही आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, तर काही सरकारच्या विरोधात लढत आहेत. पण हे सर्व आपले वेगळे राज्य किंवा राष्ट्र बनवण्यासाठी होत आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया, अशी काही राज्य जी वेगळी होऊ पाहत आहेत आणि ज्यांना वेगळ्या राष्ट्राचा दर्जा हवा आहे.
१. कैटालोनिया
कॅटालोनिया हे स्पेनमधील बार्सिलोना येथे स्थित आहे. हे या देशाचे आर्थिक केंद्र देखील आहे. पण कॅटालोनियाच्या लोकांना बऱ्याच काळापासून त्याला वेगळे राष्ट्र बनवायचे आहे.
२०१४ च्या जनमतमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त कॅटालोनियाच्या लोकांनी त्याकरिता मतदान केले. हे केलेले मतदान बेकायदेशीर मानले गेले होते, परंतु लोकसंख्येच्या प्रतिक्रियेचे मोजमाप करण्यात आले.
कॅटालोनियाच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २०१७ मध्ये पोलीस कारवाई करून व्यत्यय आणला होता. मतदानाचे प्रमाण कमी असले, तरी देखील कॅटालोनियाचा नेता कार्लेस पुइग्देमॉंट याला विश्वास वाटत आहे की, त्या लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. पण तरीदेखील स्पॅनिश सरकारशी चर्चा करण्याची तयारी आहे.
२. कुर्दिस्तान
अनेक दशकांपासून कुर्दिस्तानमध्ये आंदोलनं सुरु आहेत. वेगळ्या राष्ट्रासाठी त्यांचा चालू असलेला लढा अजून संपलाच नाही आहे. सिरीयामध्ये झालेले गृह युद्ध आणि इसीस यांच्याशी देखील त्यांना सामना करावा लागला.
तथापि, येथील नागरिकांना असे वाटते की, त्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ९२ टक्के मतदारांना स्वातंत्र्य हवे होते. इराकने या सार्वभौमत्वाला नाकारले, पण स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढा चालूच आहे.
३. पूर्व आणि पश्चिम लिबिया
हा देश एक नवीन दिशा शोधत आहे. परिणामी, अनेक सरकार ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले गेलेले आणि यूएन समर्थित सरकार त्रिपोलीमध्ये आहे, जे पश्चिमेला आहे.
तर काही लोक टूरबूकच्या पूर्व भागांमध्ये जनरल खलिफा हफ्तार सरकारच्या अधिपत्याखाली आहेत. त्याचबरोबर इतरही स्वतःची काही सरकारे आहेत, पण ही दोन प्रमुख आहेत. त्यांचामधील युद्धाने हा देश विभागला गेला. पूर्व आणि पश्चिम लिबिया लवकरच वास्तवामध्ये येऊ शकतात.
४. सोमालीलैंड
येथील प्रत्येक प्रदेश स्वत:ला स्वतंत्र समजतो, खरेतर याचे इतर अनेक देशांबरोबर अनौपचारिक संबंध देखील आहेत. पण सरकारला फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्ष ओळखले जाते.
सोमालीलँड हा भाग सोमालियाच्या उत्तर – पश्चिम भागामध्ये आहे. त्याचे स्वतःचे चलन आहे, स्वतःचे सरकार आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःची सेना देखील तयार केली आहे. पण सोमालीलँड प्रजासत्ताक सरकार म्हणून औपचारिक ओळख शोधत आहे.
५. रिपब्लिका सर्प्स्का (Republika Srpska)
युगोस्लावियाचे विघटन झाल्यानंतर ते सात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्लोव्हेनिया, सर्बिया, क्रोएशिया, मासेदोनिया, बोस्निया, कोसोवो आणि मॉन्टेनेग्रोमध्ये विभागले गेले. त्यानंतर रिपब्लिका सर्प्स्का हे वेगळे राज्य बनवण्याची मागणी समोर येऊ लागली.
पण पूर्वीच्या सार्वभौमत्वाला पुढे ढकलण्यात आले आणि ते अयशस्वी ठरले. पुढील १० ते १५ वर्षांपर्यंत त्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही असा अहवाल सांगण्यात आला होता. तथापि, अमेरिकन विश्लेषक रिपब्लिका सर्प्स्का २०२६ पर्यंत स्वातंत्र्य प्राप्त करेल, असा दावा करतात.
६. स्कॉटलँड
२०१४ मध्ये यूकेचा स्कॉटिश स्वातंत्र्याचा एक सार्वभौमिक प्रयत्न अयशस्वी ठरला. पण त्याविषयीची चर्चा कधीच संपणार नाही. मागील लोकमतानुसार ५५ टक्के जनता यूकेमध्ये राहण्यास तयार होती.
पण ब्रेक्सिटमध्ये झालेल्या मतदानाच्या वेळी ६२ टक्के लोकांना युरोपियन युनियनबरोबर राहायचे होते, पण तसे झाले नाही. त्यांच्या पहिल्या मंत्री निकोला स्टर्जन यांच्याकडून आणि यांच्यासारख्या अनेक मंत्र्यांकडून त्यांना आशा निर्माण झाली होती की, बहुतेक लोकांना स्वातंत्र्याचे समर्थन मिळेल. पण ब्रेक्सिटच्या अटी अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेल्या नाहीत.
७. पश्चिम सहारा
पश्चिम सहारा हे एक विवादित क्षेत्र आहे. पोलीसारिओ फ्रंट आणि मोरोक्कोद्वारे यावर हक्क सांगितला जातो. १९९१ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने येथे युद्धबंदी लागू केली आहे. येथे असे देश आहेत, जे मोरोक्कोचा यावर कायदेशीर सार्वभौमत्व असल्याचा दावा करतात.
पण अनेकजण स्वतंत्र राज्याप्रमाणे वागतात. संयुक्त राष्ट्रसंघाने यावर कोणाचेही राज्य नसल्याचे ओळखले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचा यावर सार्वभौमत्व राखण्याचा प्रयत्न चालू आहे आणि सार्वभौमत्त्वाच्या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी दोन्ही पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे.
जर हे देश खरेच स्वतंत्र झाले त्तर येणाऱ्या काळात जागतिक पटलावर मोठे बदल नक्कीच घडू शकतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.