आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
तुम्ही रॉबिनहूड बद्दल तर ऐकले असेलच… दबंग मधील रॉबिनहूड पांडे नाही हो… तर खरा रॉबिन हुड. इंग्लंडच्या लोककथांमधील सर्वात प्रसिद्ध हिरो म्हणजे रॉबिन हूड. तुम्हाला माहित आहे का की या रॉबिन हुडची कहाणी इंग्लंडच्या शेरवूड जंगलांविना अधुरी आहे. इंग्लंडमधील याचं जंगलांतील सर्वात मोठ्या ओक वृक्षांमधून एक आहे ‘मेजर ओक’…
रॉबिन हूड हा इंग्लंडच्या लोककथांमधील अतिशय प्रसिद्ध असा नायक आहे, जो एक कुशल तिरंदाज आणि तलवारबाज होता.
रॉबिन हूड बद्दल अशी चर्चा रहायची की तो श्रीमंतांना लुटून गरिबांना दान करायचा. सांगितलं जातं की रॉबिन हूड आणि त्यांचे साथीदार आपलं काम संपल्यानंतर शेरवूड च्या जंगलातील एक झाडं ज्याला ‘मेजर ओक’ म्हणतात त्या झाडाखाली आराम करायचे.
शेरवूडचे जंगल हे जवळपास ८ एकराच्या परिसरात पसरलेलं आहे. या जंगलातील सर्वात खास आणि तेवढच प्रसिद्ध आहे हे ‘मेजर ओक’. हे या परिसरातील सर्वात उंच झाडं मानलं जाते.
यामुळे हे ओक वृक्ष ब्रिटनची राष्ट्रीय ओळख बनले, तसेच ते पर्यटकांच्याही आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. मेजर ओक चे जुने नावं कॉकपेन होते. पण १८ व्या शतकातिला प्रसिद्ध आर्कियोलॉजिस्ट मेजर हेमन रॉक यांनी जेव्हा शेरवूडच्या आसपासच्या जुन्या झाडांबद्दल आपल्या पुस्तकात लिहिले, तेव्हाचं या कॉकपेन वृक्षाचं नावं ‘मेजर ओक’ ठेण्यात आलं आणि तेव्हापासून या झाडाला याचं नावाने ओळखल्या जाते.
हे वृक्ष किती जुने आहे यासंबंधी काही चोख पुरावा नाही, पण हे वृक्ष शेकडो वर्ष जुनं असल्याचे मानलं जातं.
ब्रिटनची राष्ट्रीय ओळख बनलेल्या या झाडाला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या वृक्षाला बघण्यासाठी इंग्लंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया सहित इतर देशांतूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात, या वृक्षाखाली आपल्या प्यार का इज़हार करुन कपल त्या क्षणाला विस्मरणीय बनवू इच्छितात.
यावरून ‘मेजर ओक’ हे पर्यटकांत किती फेमस आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.