आजही रहस्य बनून राहिलेल्या या राणी बाबतच्या काही खास गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पद्मावती या चित्रपटात राणी पद्मावतीची सुरेख कथा आणि अल्लाउद्दीन खिलजीचे रुद्र रूप पाहण्यास मिळाले. चित्रपटामध्ये राजा राणा रावल रतन सिंगची भूमिका शाहिद कपूरने, पद्मावतीची भूमिका दिपिका पादुकोणने आणि अल्लादिन खिलजीची भूमिका रणवीर सिंगने साकारली
आजही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आवर्जुन पाहिला जातो.
आज आपण राणी पद्मिनी उर्फ पद्मावतीच्या जीवन काळाविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

१५४० मध्ये पद्मावत नावाची कविता, मुहम्मद जयासी या कवीने लिहिली होती. ही कविता १३१६ मध्ये मृत्यू पावलेला शासक खिलजीच्या सुमारे २०० वर्षानंतर लिहिण्यात आली होती.
राणी पद्मावतीच्या अस्तित्वाचा हा पहिला पुरावा होता आणि ऐतिहासिक कार्यात त्यांचा उल्लेख देखील होता. पण असे देखील म्हटले जाते की, पदमावती ही खऱ्या जीवनात नव्हती आणि या कवितेतील तिचा उल्लेख ही सर्व कवीची कल्पना होती.
कवीने केलेल्या वर्णनानुसार, राणी पद्मावती ही भारतीय नसून श्रीलंकन होती.
कवीने केलेली पद्मावत कवितेची सुरुवात सिम्हाला – द्वीपसारख्या ठिकाणापासून होते. कवीच्या म्हणण्यानुसार, राणी पदमावती ही लग्नापूर्वी सिम्हाला – द्वीप येथे राहत होती आणि सध्या सिम्हाला – द्वीप हे श्रीलंकेच्या सिलोनमध्ये स्थित आहे.

कवितेनुसार, राजा राणा रावल रतन सिंग हे राजपूत होते, तसेच ते मेवाडचे शासक देखील होते. त्यांनी पद्मावतीच्या स्वयंवरात भाग घेतला आणि राणी पद्मावतीला जिंकले.
कवीनुसार, राणी पद्मावतीच्या स्वयंवराच्यावेळी राणीने एक अट ठेवली होती. या अटीनुसार स्वयंवराला उपस्थित राजकुमारांनी त्या सैनिकाला हरवयाचे होते आणि हा सैनिक म्हणजेच राणी पद्मावती होती.
राणी पद्मावतीला जो कोणी लढाईत हरवेल, ती त्याच्याशीच लग्न करणार होती. त्यावेळी राजा राणा रावल रतन सिंगने पदमावतीला लढाईमध्ये हरवले आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले.
राणी पदमावतीकडे बोलणारा पोपट होता, त्याचे नाव हरी – मणी हे होते. कवीनुसार, या पोपटाने चितोरच्या राजाला राणी पदमावतीच्या सौंदर्याबद्दल सांगितले. त्यानंतर राणी पदमावतीचे लग्न राजा राणा रावल सिंगबरोबर झाले होते.

राघव चैतन्य हा राजाच्या दरबारात पुरोहित म्हणून काम करत होता. पण कालांतराने हे लक्षात आले ही, राघव चैतन्य हा एक जादुगार आणि विशेष शक्ती असलेला माणूस होता. राजाला हे समजल्यानंतर आणि राघवने याबद्दल कबुली दिल्यानंतर त्याचा अपमान करून त्याला हद्दपार करण्यात आले. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी राघव हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याला जाऊन मिळाला.
जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला राजा रावल सिंगचे राज्य मिळवणे शक्य होत नव्हते, त्यावेळी राघवने राणी पद्मावतीच्या सौंदर्याची भुरळ त्यावर घातली.
राघवने तिच्या सौंदर्याबद्दल सांगितल्यानंतर खिलजीने चितोरगड या किल्ल्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण राघव सांगतोय, ते खरच सत्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी त्याने पदमावतीला भेटण्याचे ठरवले.
पद्मावती खिलजीचा हेतू बरोबर ओळखून होती. पद्मावतीने धोका ओळखून, क्रूर शासक खिलजीला सांगितले की,
तू फक्त माझे प्रतिबिंब पाहू शकतोस. माझा चेहरा तू पाहू शकत नाहीस.
पण खिलजी ते ऐकण्यास तयार नव्हता, त्याला तिचा चेहराच पहायचा होता. वरील घटनेमुळे खिलजी खूप संतापला होता. त्याने राजा रतन सिंगला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याला पकडले.
राजाच्या सुटकेच्या बदल्यात खिलजीने पद्मावतीला शरण येण्यास सांगितले. पण, आपल्या पतीला आणि इतर लोकांना वाचवण्यासाठी पद्मावतीने ७०० सैनिक पाठवले. पण शेवटी, त्या सर्वांचा अंत झाला आणि किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी युद्ध घोषित करण्यात आले.

त्यानंतर चितोर किल्ल्यामध्ये एक भयंकर लढाई झाली आणि या लढाईमध्ये राजा राणा रतन सिंग यांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकल्यावर किल्ल्यातील सर्व स्त्रियांनी ‘जौहर’ करून आत्महत्या केली आणि आपले प्राण अर्पण केले.
अश्याप्रकारे राजा राजा राणा रतन सिंग याच्या मृत्युनंतर राणी पद्मावतीने स्वत: चा अंत केला. पण ती कधीही खिलजीसमोर झुकली नाही. राणी पद्मावती ही एक महान राणी होती आणि तिने आपल्या पतीला शेवटपर्यंत साथ दिली.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.