जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
दिवाळी अगदी तोंडावर आली असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आकस्मित निर्णयाने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. तो निर्णय म्हणजे ‘फटाके बंदीचा’! दर वेळी दिवाळी आली की पर्यावरण प्रेमी आणि संस्कृती प्रेमींमध्ये नेहमीच जुंपते. दिवाळीमध्ये फटाके फोडणे म्हणजे पर्यावरणाचे नुकसान करणे असे म्हणत नेहमीच फटाके बंदीची मागणी पर्यावरण प्रेमी आणि आधुनिक विचारवंतांकडून लावून धरली जाते आणि दिवाळी हा फटाक्यांचा सण आहे, तेव्हा फटाके फोडायचे नाही तर कधी फोडायचे असा प्रतिप्रश्न करून संस्कृती प्रेमीं देखील शाब्दिक लढाईसाठी पुढे सरसावतात.
पण यंदाच्या दिवाळीमध्ये मुंबई मध्ये उच्च न्यायालयामार्फत आणि दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामार्फत चक्क फटाकेबंदीचा आदेश आल्याने संस्कृती प्रेमींमध्ये चांगलीच नाराजी आहे. त्यातल्या त्यात बहुतांश लोकांनी म्हणजेच समाजातील प्रतिष्ठीत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून न्यायालयाच्या ह्या निर्णयाचे स्वागत केले. त्यात अभिनेत्री जुही चावलाचा देखील समावेश होता. पण मजेशीर गोष्ट ही की तिचे हे समर्थन आता तिच्याच अंगलट आले आहे आणि त्यासाठी सोशल मिडियावरच्या ट्रोलर्सनी तिचा खरपूस समाचार घेतला.
जुही चावलाने दिल्ली मध्ये लागू करण्यात आलेल्या फटाकेबंदीच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि त्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देताना तिने ट्विट केले की,
दिल्ली सुप्रीम कोर्टातर्फे स्वागतार्ह निर्णय, १ नोव्हेंबर पर्यंत फटाक्यांवर बंदी! ह्या वर्षीची दिवाळी फक्त दिव्यांची आरास करून आणि खूप सारे प्रेम वाटून साजरी करूया
आणि झालं…! जुही चावलाची फिरकी घेण्यासाठी ट्विटरकर सरसावले…!
आता तुमच्या पैकी बऱ्याच जणांच्या ही गोष्ट लक्षात आली असलेच की तिने ट्विट मध्ये काय चूक केली, पण तरीही ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी तिचं ट्वीट परत एकदा वाचावं…
काय म्हणता? अजूनही नाही लक्षात आलं?
अहो तीने ट्वीट मध्ये उल्लेख केलाय –‘ दिल्ली सुप्रीम कोर्ट’ असा!
आलं न लक्षात? भारतात एकच सुप्रीम कोर्ट आहे…..आणि ह्या मॅडमनी उत्साहाच्या भारत केवळ सुप्रीम कोर्ट लिहिण्याऐवजी ‘दिल्ली सुप्रीम कोर्ट’ लिहिलंय.
दिल्ली मध्ये फटाकेबंदीचा निर्णय हा भारताच्या सुप्रीम कोर्टाकडून आलाय. पण बहुधा जुही चावलाला सुप्रीम कोर्ट हे दिल्लीमध्ये असल्याकारणाने ते केवळ दिल्लीचेच सुप्रीम कोर्ट असावे असा गैरसमज झालेला दिसतोय…
असो…म्हणूनच ती म्हण आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात, जराशी बदलून, अगदी चपलख लागू होते –
अति घाई अंगलट येई…!
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.