आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
बिग बॉस हा तसा टीव्ही इंडस्ट्री मधील नावाजलेला शो. पण यावेळी ‘बिग बॉस सीझन 11’ हा जरा हटके आहे. हा शो मुळातच विवादांचा शो आहे, त्यामुळे दर दिवशी याचा कुठला न कुठला वाद समोर येतच असतो. पण यावेळी तर बिग बॉसच्या घराचं तपमान जरा जास्तच वाढलेलं दिसलं आणि त्याला कारणीभूत ठरला ‘बिग बॉस सीजन 11’ स्पर्धक झुबेर खान…
‘बिग बॉस सीझन 11’ च्या पहिल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घराबाहेर पडलेला स्पर्धक झुबेर खान याने या शोचा होस्ट म्हणजेच सलमान खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. होस्ट सलमानने धमकी दिल्याने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत झुबेरने मुंबईच्या अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
झुबेरने आपल्या या तक्रारीत म्हटलं आहे की, “सलमानने मला नॅशनल टीव्हीवर इंडस्ट्रीमध्ये काम करु देणार नाही अशी धमकी दिली. तसच बाहेर पडल्यावर कुत्रा बनवण्याचही म्हटलं.” झुबेरने अँटॉप हिलमध्ये नोंदवलेली लेखी तक्रार लोणावळा पोलिसांनाही पाठवली गेली आहे.
झुबेरने सलमान खान सोबतच कलर्स चॅनलवर आरोप करताना म्हटलं आहे की, –
मी कधीही स्वत:ला दाऊदची बहिण हसीना पारकरचा जावई समजलं नाही. कलर्सच्या लोकांनी मला जी वाक्य बोलायला सांगितली ती मी माझ्या व्हिडीओत बोललो. सलमानने मला सगळ्यांसमोर धमकी दिली, ज्याचं मी कायदेशीर उत्तर देणार आहे.
झुबेर एवढ्यावरच थांबला नाही तर, “सलमान खानला घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही,” असंही झुबेर म्हणाला. “कलर्स चॅनलच्या लोकांनी जाणीवपूर्वक मला सरकारी रुग्णालायत दाखल न करता खासगी रुग्णालयात दाखल केलं,” असा आरोपही झुबेर आणि त्याच्या वकिलांनी केला आहे.
झुबेरचा नेमका वाद काय…
झुबेर खान हा हिंदी टीव्ही इंडस्ट्रीचं सर्वात चर्चिला जाणारा शो ‘बिग बॉस सीजन 11’ चा कंटेस्टंट आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यात तो या शोच्या बाहेर निघाला. झुबेर खानला सलमाने त्याच्या वाईट वागणुकीबद्दल खडेबोल सुनावले, सलमान झुबेरवर भडकल्याने तो टेन्शनमध्ये आला आणि त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्याच्या वागणुकीचा परिणाम हा त्याच्या वोट्स वर झाला आणि शोच्या पहिल्याच आठवड्यात तो बाहेर निघाला.
झुबेरचं घरातील अर्शी खानसोबत जोरदार भांडण झालं होतं. अर्शीला शिवीगाळ करत त्याने तिला अपशब्द वापरले होते. झुबेर खान स्वत:ला हसीना पारकरचा जावई आणि हसीना चित्रपटाचा निर्माता असल्याचं सांगतो. परंतु सत्य हे काही वेगळच आहे. हसीना चित्रपटाचा सह निर्माता आणि दाऊद कुटुंबातील सदस्य समीर अंतुलेने झुबेरला फ्रॉड म्हटलं आहे. जुबैरचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. तो प्रसिद्धीसाठी दाऊदच्या नावाचा वापर कारत असल्याचे त्याने सांगितले.
वीकेंड वॉरमध्ये सलमान खान झुबेरवर अक्षरशः तुटून पडला. बिग बॉसच्या घरात शिवीगाळ करुन वातावरण बिघडवणाऱ्यांची सलमानने चांगलीच शाळा घेतली. पण झुबेर खानवर मात्र सलमान जरा जास्तच नाराज होता.
आता भाईजानचा राग तर आपल्याला ठावूकच आहे. सलमानने रागाच्या भरात झुबेरला ‘नल्ला डॉन’ म्हणून संबोधले. तर सलमान एवढ्यावरच थांबला नाही, तो झुबेरला फ्रॉड देखील म्हणाला. जेव्हा झुबेर सलमानला ‘सॉरी भाई’ बोलला, तेव्हा तर तो आणखी भडकला आणि म्हणाला की, “तू मला भाई बोलायचं नाही.” सलमान म्हणाला की, “(तुमच्यासारखे लोक) नाव खराब करण्यासाठी इथे येतात, आईचं नाव धुळीला मिळवणार, आपल्या “मोहल्ल्या”चं नाव खराब करणार आणि काय बोलणार तर मुलांसाठी आलोय.”
इतकं सर्व झाल्यावर देखील झुबेर थांबला नाही तर रिपोर्ट फाईल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने सलमानला धमकी देत म्हटले की, हिम्मत असेल तर सलमानने मला बांद्रामध्ये येऊन भेटावे. त्याने सलमानवर अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा आरोपही केला तसेच त्याच्या हिट अॅण्ड रन केस नंतर स्वतःची इमेज बनविण्यासाठी त्याने ‘बिंग ह्युमन’चा निर्माण केल्याचं ही तो म्हणाला.
तर इंडिया टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानला “फिल्म इंडस्ट्रीचा दाऊद इब्राहीम” म्हणून संबोधिले. तसेच त्याने सांगितले की, “मला या शोमधून बाहेर काढणारा सलमान कोण? मी त्या मुलीशी दुर्व्यवहार केला, जेव्हाकी तो तर नेहमीच बिग बॉसच्या सेटवरून सर्वांशी दुर्व्यवहार करत असतो. तो त्याच्या “Bad Image” साठीच ओळखला जातो. काय तर त्याने ‘Being Human’ची निर्मिती केली, पण मी रुग्णालयात दाखल असतना तो मला एकदाही भेटायला आला नाही. मी त्या गोळ्या घेतल्यानंतर त्यांनी मला सरकारी नाही तर खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. कारण त्यांना कुठलीही FIR नको होती. ते मला बिग बॉसच्या घरातून जाऊ देत नव्हते म्हणून मला त्या गोळ्या खाव्या लागल्या.”
पुढे तो म्हणाला की, “सलमान इंडस्ट्रीमधील सर्वात वाईट माणूस आहे. तो किती वाईट आहे हे मी जगासमोर उघड करेन. २००२ च्या त्याच्या हिट अॅण्ड रन केस नंतर त्याने त्याच्या पीआरच्या सहाय्याने स्वतःला वाचवले. सलमानचे दाऊद सोबत देखील संबंध आहेत. त्याचा ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हा सिनेमा अंडरवर्ल्ड कडून फायनान्स करण्यात आला होता.”
हे दबंग सलमान खानचं काही पहिलं वादग्रस्त प्रकरण नाही. तो नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणारे वादात असतोच. त्याचा हा वाद आता कुठल्या थराला जातो हे बघणं बिग बॉस पेक्षाही रंजक ठरणार हे नक्की…
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.