Site icon InMarathi

या ८ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानात ‘पारंगत’ झालं!

technology inmarathi

inside retail asia

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज लोकं फुकट कित्येक तास फोन वर बोलत आहेत, आपल्या स्मार्टफोन्सचा वापर करून साता समुद्रापार आपल्या जवळच्या लोकांशी व्हीडियो कॉल करत आहेत, जी गोष्ट पोचायला आधी कित्येक दिवस लागायचे तीच गोष्ट आज एका क्लिक वर तुमच्या दाराशी हजर असते!

ही सगळं शक्य झाल ते केवळ आणि केवळ इंटरनेट आणि तंत्रज्ञान यामुळेच!

इंटरनेट आज जगभरामध्ये खूप महत्त्वाचे झाले आहे. सोशल मिडीयाने सर्व जग जोडले गेले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि मोठ्या शहरांपासून लहान खेड्यांपर्यंत इंटरनेटचा वापर केला जातो. जगभरातील माहिती आपल्याला याच इंटरनेटद्वारे मिळते.

 

technews 2day

 

आज जगभरात दररोज तंत्रज्ञानाचा खूप वापर केला जातो. या तंत्रज्ञानाने जगभरात खूप कामे होतात, त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो.

लाखो लोक या तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत आणि त्याच्या आधारे एकमेकांशी जोडले गेले आहेत. आज आपण अश्या काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी या तंत्रज्ञानामध्ये कमालीची प्रगती करून खूप लोकांच्या जीवनाला प्रभावित केले आहे. चला मग जाणून घेऊया, या तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींबद्दल!

 

१. स्टीव जॉब्स, अॅपल

the new york times

 

६० च्या दशकामध्ये अमेरिकेच्या हिप्पींबरोबर जवळून वेळ घालवणारे स्टीव यांच्यावर बॉब डॅलन आणि महात्मा गांधींचा प्रभाव होता.

त्यांना तंत्रज्ञानाचा गॉडफादर म्हटले जाते. स्टीवच्या कंपनीने गेल्या दशकामध्ये आपला आयफोन लाँचच्या बरोबरच मोबाईल फोनमध्ये क्रांतिकारी बदल केले गेले. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढणाऱ्या या मार्केटचे खूप श्रेय अॅपलला दिले जाते.

 

२. मार्क झुकरबर्ग, फेसबुक

 

the next web

 

मार्कने स्वतःच्या बळावर सोशल मीडीयाचा चेहराच बदलून ठेवला आहे. मैत्री वाढवण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेला फेसबुक आज मिमच्या माध्यमातून समाजातील कंटाळवाण्या स्टिरिओटाईप्स व्यतिरिक्त सामाजिक टॅब्यूसवर देखील घातक वार करत आहे.

बातम्यांपासून मनोरंजनापर्यंत फेसबुकवर सर्व काही आहे आणि फेसबुक लाइव्हच्याद्वारे सिटीजन जर्नलिस्ट्सच्या कॉन्सेप्टला एक नवीन ताकद प्रदान केली आहे, पण यामुळे खोट्या बातम्या पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

३. बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट

 

 

१९९५ पासून २००७ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले बिल गेट्स तंत्रज्ञानाचे डॅमी गॉड मानले जातात. त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचे ८ टक्के स्टॉक्स आहेत आणि ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेयरमन सारखे काम करतात.

गेल्या काही वर्षात एक मोठे परोपकारी म्हणून समोर आलेले गेट्स आणि त्यांची पत्नी आपल्या संपत्तीमधील कमीत कमी अर्धा भाग चॅरिटीला दान करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे.

 

४. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन, गुगल

 

the times

 

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी १९९८ मध्ये एका भाड्याच्या गॅरेजमध्ये गुगलची सुरुवात केली होती. १२ वर्षानंतर गुगल इंटरनेटचा सर्वात मोठा मिडिया कॉरपोरेशन बनला आहे आणि आता याच्याशिवाय इंटरनेट वापरण्याची कल्पना करणे देखील कठीण होऊन बसले आहे.

 

५. इवान विलियम्स, ट्विटर

 

tedcdn.com

 

कॉलेज ड्रॉप आउट असलेल्या इवानने ट्विटर आणि ब्लॉगची सुरुवात करून इंटरनेट कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली. आता ते ट्विटर बरोबर नाहीत, पण त्यांच्या योगदानाने सायबर वर्ल्डला एक नवीन दिशा नक्कीच दाखवून दिली आहे.

 

६. जेफ्री बेझोस, अॅमेझॉन

vulcon post

 

जेफ्रीने १९९४ मध्ये अॅमेझॉनची सुरुवात केली होती. प्रिन्स्टनमधून पदवी मिळवलेल्या जेफ्रीने अमेरिकेमध्ये असलेल्या आपल्या गॅरेजमधूनच या कंपनीला सुरु केले होते आणि ऑनलाईन रिटेलिंगचा चेहराच बदलून टाकला,

जेफ्रीने प्रथम पुस्तके ऑनलाईन विकणे सुरु केले होते. पण त्यानंतर त्याने जवळपास सर्वच प्रकारचे प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यास सुरुवात केली. १९९९ मध्ये जेफ्रीला टाइम पर्सन ऑफ़ द इयर म्हणून निवडण्यात आले होते. आज ते जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहेत.

 

७. टीम बर्नर्स ली, वर्ल्ड वाइड वेब

 

forbes

 

२० वर्षांपूर्वी ब्रिटनचे एक संगणक वैज्ञानिक टीम बर्नर्स ली यांनी वर्ल्ड वाइड वेबची निर्मिती केली होती. www जगातील सर्वात पहिला वेब सर्व्हर होता. टीमच तो माणूस आहे, ज्याच्यामुळे आपण आज ब्राउजर वापरून इंटरनेट सर्फिंग करू शकतो.

 

८. अकिओ मोरिटा, सोनी

 

leaderonomics.com

 

जपानचे मोरिटा एक नौसेना अधिकारी होते, ऑफिसर मोरिटाने आपला कौटुंबिक व्यवसाय (फॅमेली बिजनेस) सोडून १९४६ मध्ये सोनी कॉर्पोरेशनची स्थापना केली होती. सोनीचे कितीतरी प्रसिद्ध प्रोडक्टस जसे, मॅग्नेटिक टेप्स, टेप रेकॉर्डर, पॉकेट साइज रेडीओ आणि वॉकमेन यांनी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये क्रांती घडवली.

असे हे आणि यांसारखे इतर लोकांनी तंत्रज्ञानामध्ये क्रांतिकारी बदल घडवून लोकांचे जीवन सुखकर केले आहे आणि तंत्रज्ञानाला एका उच्च स्तरावर नेले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version