रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींचा फारसा माहित नसलेला रंजक इतिहास जाणून घ्या !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे शॉर्ट मॅसेजेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. त्यातही मॅसेजेसमध्ये सिम्बॉल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मॅसेजेसमध्ये स्माइलींचा वापर हा तर जणू अनिवार्य आहे असा केला जातो.
प्रेमासाठी वापरले जाणारे हार्टचे चिन्ह हे मूळ एका झाडाच्या बीच्या आकारापासून तयार झाले होते.
अशाच आपल्या रोजच्या वापरातील काही सिम्बॉलबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
हे सिम्बॉल सर्वात आधी कधी वापरले गेले आणि त्याचा प्रसार कसा होत गेला, हे यातून समजणार आहे.
इनव्हर्टेड क्रॉस
हॉरर फिल्म मेकर्स या सिम्बॉलच्या प्रेमात आहेत. हा सिम्बॉल ख्रिश्चन धर्माचे प्रतिक म्हणूनही वापरला जातो. पीटर नावाच्या एका ख्रिस्त शिष्याला जेव्हा येशूंप्रमाणे वधस्तंभावर मारण्याची शिक्षा सुनावली होती.
त्यावेळी त्याने आपल्याला येशूंप्रमाणे लटकवणे योग्य नसल्याचे सांगत स्वतःला उलटे लटकवण्याची मागणी केली होती.
तेव्हापासून हा उलटा क्रॉस मानवतेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. आजही अनेक चर्चमध्ये असा क्रॉस आढळतो.
हॅशटॅग
पौंडचा शॉर्ट फॉर्म म्हणून याचा सर्वात आधी वापर सुरू झाला. दोन उभ्या रेषांवर आडव्या रेषा असलेला हा सिम्बॉल सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक वापरला जातो.
पीस (शांततेचे) सिम्बॉल
१९५८ मध्ये गेराल्ड हॉल्टॉम यांनी अण्वस्त्रा कपातीच्या मोहिमेसाठी हा सिम्बॉल तयार केला होता. या मोहिमेअंतर्गत लंडन ते अॅमस्टरडॅमपर्यंत काढण्यात आलेल्या मार्चमध्ये सर्वप्रथम या लोगोचा वापर झाला.
पण हिप्पी समुदायाने त्यांच्यासाठी जेव्हा याचा वापर सुरू केला तेव्हा त्याचा अधिक प्रचार प्रसार झाला.
खोपडी आणि हाडे, विषयासाठी वापरले जाणारे सिम्बॉल
या सिम्बॉलचा वापर प्रामुख्याने विष किंवा धोकादायक असे दर्शवण्यासाठी केला जातो. त्याधी याचा वापर दोन विरुद्ध गोष्टींसाठी केला जायचा.
त्यापैकी एक सागरी चाचे त्यांच्या झेंड्यावर वापर करायचे. तर स्पेनमध्ये काही दैवी शक्तींशी संबंधित कृत्यांमध्ये त्याचा वापर केला जायचा.
स्माइली
याच्या नेमक्या शोधाबाबत अनेक प्रकारच्या चर्चा आहेत.
१९६० च्या दरम्यान अमेरिकेत द फनी कंपनी नावाच्या लहान मुलांच्या टिव्हीशोमध्ये याचा वापर केला होता. पण त्याच दरम्यान एका विमा कंपनीसाठी हार्वे बॉल नावाच्या एका कलाकाराने स्माइली फेसचा लोगो डिझाइन केला होता.
ओके साईन
सध्या दक्षिण अमेरिकेसारख्या अनेक देशांत हा सिम्बॉल वापरणे गुन्हा ठरते. कारण या ठिकाणी याचा अर्थ गुद्दद्वार असा होतो.
पण याचा सुरुवातीचा वापर बौद्ध आणि हिंदु कलांमध्ये आढळतो. याला वितर्क मुद्रा म्हणतात. त्याचा अर्थ चर्चेची मुद्रा असा होतो. याचा एक अर्थ धडा शिकवणे असाही होतो.
गौतम बुद्धांनी असे साईन केल्याचे दाखलेही काही ठिकाणी आहेत.
डेव्हील्स हॉर्न
रॉक अँड रोलमधील हा सर्वात प्रसिद्ध सिम्बॉल आहे. रॉकर रॉनी जेम्स डिओ याने याचा शोध लावला असे म्हटले जाते. पण डिओने स्वतःच तसे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. याच्या खऱ्या शोधाबाबत माहिती नाही.
पण इटलीत त्याचा सर्वाधिक वापर केला गेला आहे. इटलीत काही दैवी शक्तींबरोबर त्याचा संबंध जोडला गेला होता. डिओला त्याच्या इटालीयन आजीने त्याला हे साईन शिकवले होते असे सांगितले.
हार्ट सिम्बॉल
जगात सर्वाधिक वापरला जाणारा हा सिम्बॉल प्रेमाचा आहे हे सांगायची गरज नाही. याच्या शोधाचा इतिहास रोमन साम्राज्याशी संबंधित आहेत.
एका झाडाच्या बीच्या आकारासारखा हा आकार आहे. या बीमध्ये गर्भनिरोधक तत्वे होती. ही वनस्पती रोममधून नामशेष होण्याच्या मार्गावर होती. तसेच त्याबद्दल एवढे आकर्षण होते की, रोमन नाण्यांवरही त्याचे चित्र होते.
अॅट द रेट
ई मेलच्या वापरानंतर हा सिम्बॉल मोठ्या प्रमाणात वापरला गेला. विशेषतः अनेक जाहिरातींमध्येही त्याचा वापर केला जातो. व्यावसायिक आणि उद्योग जगतातही त्याचा मोठा वापर केला जातो.
पॉवर बटण सिम्बॉल

जवळपास सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्वर हा सिम्बॉल आढळतो. डिजिटल डाटा हा केवळ ० आणि १ या दोन्हींपासून तयार होतो. त्यामुळे या सिम्बॉलमध्ये या दोन्हींचा समावेश आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.