Site icon InMarathi

“इंटरनेटवर” या गोष्टी करणे बेकायदेशीर आहे! तुम्हाला ठाऊक आहे का?

internet im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या काळात इंटरनेट म्हणजे एक अनिवार्य गोष्ट झाली आहे. पहिले अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानल्या जायच्या, पण सध्या गंमतीने अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट (WiFi) या मूलभूत गरजा आहेत असे म्हटले जाते!

गंमतीने जरी या वाक्याकडे पाहिले तरी ती खूप गंभीर गोष्ट आहे आणि ती जाणीव आपल्याला व्हायलाच हवी!

सध्याची तरुण पिढी तर इंटरनेटशिवाय राहू सुद्धा शकत नाही आणि सध्या आलेल्या जियो ४जी मुळे तर प्रत्येक जण हा इंटरनेट वापरायला लागलाय!

प्रथम मोबाईल मध्ये इंटरनेट हि चैनीची गोष्ट मानली जायची,पण स्मार्टफोन्स आणि त्यात असलेला फास्ट स्पीड चा डेटा हि खूप किरकोळ गोष्ट झाली आहे!

या इंटरनेट मुळेच आज आपण जगाच्या काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकलो आहेत. आपण हवं ते काम या इंटरनेटच्या मदतीने करू शकतो. पण जसे इंटरनेटच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले गेलो तसेच त्याचा चुकीचा वापर सुद्धा आपल्याकडून व्हायला लागला!

दिवसभरात आपल्याला पडणाऱ्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आपण इंटरनेटवर शोधत असतो. इतकच काय तर हे इंटरनेट आपल्याला येणाऱ्या समस्यांचं समाधान करण्यातही मदत करतो.

पण कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की इंटरनेट वापरताना काही गोष्टी करण्यास बंधन लावण्यात आली आहेत. या गोष्टी केल्यास त्या बेकायदेशीर मानल्या जातात. पण आपण या ज्ञानापासून दूर असल्याने बिनधास्तपणे इंटरनेटवर ही गैर कामे करत असतो..

चला तर मग जाणून घेऊया कोण-कोणती आहेत ही बेकायदेशीर कामे…

 

जाहिराती ब्लॉक करणे : 

 

 

इंटरनेटवर काही सर्च करत असताना किंवा काही वाचत असताना नेहमी एक गोष्ट आपल्याला डिस्टर्ब करत असते आणि ती म्हणजे जाहिराती. मग आपण यावर तोडगा म्हणून अॅड ब्लॉकर च्या सहाय्याने त्या अॅड्स  बॅन करतो आणि निश्चिंत होऊन इंटरनेटचा उपभोग घेतो,

पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या या अॅड्स बॅन केल्यामुळे अॅडव्हर्टायझरला कोटींच नुकसान सहन कराव लागत. जे बेकायदेशीर आहे.

स्काईप वरील बोलणे रेकॉर्ड करणे : 

स्काईप हे एक विडीओ कॉलिंग अप्लिकेशन आहे. यावर बोलत असताना तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तिची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्यातील बोलणे रेकॉर्ड करू शकत नाही.

जर तुम्ही समोरच्याच्या परवानगी शिवाय रेकॉर्डिंग केली आणि ती रेकॉर्डिंग इतर कुणासोबत शेअर केली तर तो अपराध मानला जातो. ज्यासाठी तुम्हाला तुरुंगाची हवाही खावी लागते.

 

आपली इन्कम सांगितल्याशिवाय eBay वर सामान विकणे : 

 

 

जे लोकं eBay स्टोर्स चालवितात त्यांना हे माहिती असायला हवं की, हे एखाद्या नोकरी सारखचं आहे. यासाठी तुम्हाला सरकारला इन्कम टॅक्स द्यावा लागतो.

जर तुम्ही असं करत नसाल तर म्हणजेच तुम्ही जर टॅक्स चुकवेगिरी करून eBay स्टोर्स चालवीत असाल तर ते कायद्याने चुकीचे आहे आणि त्यासाठी तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

 

दुसऱ्याच वायफाय नेटवर्क वापरणे : 

 

 

हे आपल्या इथे सर्वात कॉमन आहे. आजकाल दर दुसऱ्याच्या घरी वायफाय असतो आणि मग ज्यांच्याकडे इंटरनेट नाही असे लोक त्या वायफायचं पासवर्ड क्रॅक करून ते त्याचा मनसोक्त उपभोग घेतात.

जर वायफाय ओपन असेल मग तर काही विचारायलाच नको. पण काय तुम्ही कोणाच्याही घरात त्यांना न विचारता जाता का नाही ना? मग हे पण तसचं आहे. तो वायफाय दुसऱ्या कोणाचा आहे तो तुम्ही त्याला न विचारता वापरणे हे अपराधिक आहे.

यासाठीही तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

 

पायरेटेड गाणी आणि व्हिडियोज डाउनलोड करणे : 

 

 

इंटरनेट मुळे प्रत्येक गोष्ट अगदी एका क्लिकवर आपल्याला मिळायला लागली आणि यातूनच उगम झाला तो पायरसीचा..सध्याची तरुण पिढी हि सरास कित्येक ऑनलाईन साईट्स वरून गाणी सिनेमे व्हिडियोज डाउनलोड करते!

पण तुम्हाला माहीत आहे का कि हे सगळं पायरेटेड व्हर्जन्स असतात, अर्थात त्याची ओरिजिनल कॉपी तुम्ही युट्युब किंवा तत्सम साईट वरून घेऊ शकता पण दुसऱ्या कोणत्या साईट्स चा वापर करून या सगळ्या गोष्टी डाउनलोड करणं म्हणजे पायरसीला प्रोत्सहन देण्यासारखंच आहे!

 

सबस्क्रिप्शन पासवर्ड शेअर करणे : 

 

 

एखाद अकाउंट सब्सक्राइब करणे आणि त्याचं पासवर्ड इतर लोकांसोबत शेअर करणे. जर तेही त्याच अकाउंटचं वापर इतर कोणी देखील करत असेल तर ते कायद्याने दंडनीय आहे. यामुळे तुम्हाला पोलिसांच्या प्रश्नोत्तरांना सामोरे जावे लागते.

सायबर बुलिंग :

 

 

ऑनलाईन कोणाची फसवणूक करणे किंवा त्याला धमकावणे हे सर्व सायबर क्राईमच्या अंतर्गत येते. यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते.

 

कमी वयात फेसबुक अकाउंट बनविणे :

 

 

फेसबुकवर १३ वर्षाखालील मुलांचे अकाउंट बनविण्यास मनाई आहे. तरी देखील जर कुणी चुकीची माहिती देऊन फेक आयडी बनवतो तर ते बेकायदेशीर मानले जाते.

 

कॉपीराईट वाले फोटो आणि GIF’s डाउनलोड करणे : 

 

 

कुठल्याही वेबसाईट किंवा  इंटरनेटवर ट्रेंडमध्ये असणारी फोटो ही तुमच्या पर्सनल उपयोगासाठी नसते. त्याचं कॉपीराईट असते. या कॉपीराईट असलेल्या फोटोजना आपल्या पर्सनली वापरणे गुन्हा मानला जातो.

 

पूर्वीपासून रजिस्टर्ड असणाऱ्या डोमेनचा वापर करणे : 

 

 

जर तुम्ही कुठल्या अश्या डोमेनचा वापर करण्याचा विचार करत आहात जो ऑलरेडी पॉप्युलर आहे. तर हा विचार सोडून द्या कारण जर तुम्ही असं केलं तर ती एक चोरी असेल. यासाठी तुम्हाला शिक्षा भोगावी लागू शकते.

कारण प्रत्येक कंपनीचा त्यांचा स्वतःचा वेगळा डोमेन असतो जो त्यांनी पैसे देऊन विकत घेतलेला असतो.

 

जर तुम्ही यापैकी काहीही करत असाल तर जरा खबरदारी ठेवा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version