विमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
विमानातून प्रवास करण्याची इच्छा तर सगळ्यांचीच असते. विमानातून प्रवास करण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो. विमानतळावर होणारी चेकिंग, तेथील कडक सुरक्षा, सगळीकडे लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरा, विमानात देण्यात येणारी सुविधा आणि प्रवाश्यांचा होणारा आदर हे सर्वात जास्त तिथे अनुभवयाला मिळते.
आपल्यातील बहुतेकांनी एकदातरी विमानाचा प्रवास नक्कीच केला असेल, त्यामुळे काही वेगळे तुम्हाला सांगायला नको. पण तुम्ही जर विमानतळावर गेला असाल, तर तुम्हाला लक्षात आले असेल की, विमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची बॉटल नेण्याची परवानगी नसते.
कोणतीही व्यक्ती फक्त चेकिंग पॉइंटपर्यंतच पाण्याची बॉटल आपल्याजवळ ठेवू शकतो, त्याच्यापुढे आपण ती घेऊन जाऊ शकत नाही. अश्यावेळी तुम्ही पाहिजे तर, बॉटल तिथेच सोडून देऊ शकता आणि चेकिंग केल्यानंतर नवीन पाण्याची बॉटल खरेदी करू शकता किंवा बॉटलमधील पाणी फेकून चेकिंग केल्यानंतर दुसरे पाणी भरू शकता.
यावरून असे समजते की, तुम्ही खाली असलेली पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता, पण पाणी भरलेली बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की, यामुळे नक्की काय होईल आणि असे करण्यामागे नक्की हेतू काय?
चला तर मग जाणून घेऊया, विमानतळावरील चेकिंग करतेवेळीच्या या नियमाविषयी…
कदाचित तुमच्यातील कितीतरी लोकांना यामागील खरे कारण माहित नसेल. खरे तर, पाण्याच्या बॉटल संबंधित असलेला हा नियम जगभरात असलेल्या सर्वच विमानतळावर वापरला जातो. हा नियम प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेला आहे.
पाण्याच्या बॉटलमध्ये कोणी लिक्विड स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा विस्फोटक पदार्थ घेऊन जाऊ नये, यासाठी सुरक्षा चेकपॉइंटनंतर पाण्याची बॉटल घेऊन जाण्यास मनाई आहे, कारण कोणीही लिक्विड स्वरूपात विस्फोटक पदार्थ पाण्याच्या नावाखाली या बॉटलमधून घेऊन जाऊ शकतो.
अश्यावेळी प्रत्येक प्रवाश्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणीच आहे की, अजून दुसरा कोणता विस्फोटक पदार्थ आहे, हे तपासणे खूप कठीण काम आहे, त्यामुळे बॉटलमधील पाण्यावर निर्बंध लावण्यात आला आहे.
अमेरीकेमधील इंटेलिजन्स एजन्सीने अल कायदा या आतंकवादी संघटनेच्या हल्ल्याच्या योजनेला जेव्हा मोडीत काढले, तेव्हा हा नियम बनवण्यात आला, आता या नियमाचा सर्व जग आपल्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वापर करत आहे.
जेव्हा अमेरिकेचे अधिकारी विस्फोटक बनवले जात असलेल्या ठिकाणी गेले, तेव्हा त्यांनी तिथे पहिले की, हायड्रोजन बॉम्बला लिक्विड स्वरूपामध्ये मिनरल पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी अलर्ट जाहीर करून बॉटलमधील पाण्यावर निर्बंध आणले आणि बॉटलमधील पाणी चेकिंग केल्यानंतर आता न नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कारणामुळे आपल्याला विमानतळावर चेकिंग करताना आपली बॉटल तिथेच सोडून द्यावी लागते किंवा त्यामधील पाणी फेकून, आत गेल्यानंतर नवीन पाणी भरावे लागते. असा हा नियम सुरक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.