Site icon InMarathi

इतिहासातील धडा – डंकर्कची यशस्वी माघार – आता Nolan च्या चित्रपटात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

शाळेत इतिहास विषयातला रटाळपणा कमी झालेला किंवा त्यात रस निर्माण झालेला आठवतो तो इयत्ता दहावीत…!

इतिहासाच्या पाठ्यक्रमात “आधुनिक जगाचा इतिहास” दहावी आधी देखील थोडाफार होताच, पण दहावीत अचानक वाटलं की एवढ्या महत्वाच्या विषयावर मत बनवायला सुरुवात करायला जरा उशीरच झाला.

पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, साम्यवाद, भांडवलशाही वगैरे संज्ञा कानावर पडून सोडून देण्यापेक्षा, समजून घेण्यात करावी लागणारी वैचारिक कसरत आकर्षक होती.

“दुसऱ्या महायुद्धाची कारणे स्पष्ट करा” असा आठ मार्कांचा प्रश्न विचारल्यावर, पहिले महायुद्ध, व्हर्साय चा तह, जर्मनी वर लादल्या गेलेल्या अन्यायकारक अटी वगैरे सगळं पुस्तकातलं कन्टेन्ट पुस्तकी भाषेतच उत्तर म्हणून उत्तरपत्रिकेत छापण्या पलीकडेही त्या प्रश्नाचं, त्या घटनांचं महत्व होतं. आता ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे नुकताच आलेला “डंकर्क” या चित्रपटाचा ट्रेलर अन त्या संदर्भात आठवणारा प्रश्न:

टीप लिहा : डंकर्क ची यशस्वी माघार

😀

तशी डंकर्कची घटना आहे ती evacuation ची, माघार घेण्याची. तरी पण त्याचे ऐतिहासिक महत्व साहसीमोहिमां पेक्षा जास्तच. 1940 च्या मे महिन्यात जर्मन सैन्याने बेल्जियम व उत्तर फ्रान्सवर ताबा घेतलेलाय, ब्रिटन व फ्रान्स चे सैन्य डंकर्क बंदरा जवळ अडकलेलंय, त्यात हे सगळं सैन्य, artillery, जर्मनीच्या हातात पडण्याचा धोका आहे! नुसत्या आकडेवारीकडे बघूनच लक्षात येईल की ही मोहीम दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक घटनांपैकी एक होती.

ऑपेरेशन डायनॅमो असं नाव असलेली ही ‘माघार घेण्याची मोहीम’ सैन्य इतिहासातली सर्वात मोठी rescue मिशन होती. या मोहिमेत दोस्त राष्ट्रांचे (allied forces) तीन लाख हुन अधिक सैन्य अवघ्या आठ दिवसात सोडवण्यात आले. एखाद्या ऍक्शन थ्रिलर पेक्षा कुठे ही कमी नसणारी ही घटना!

 

तसं पाहायला गेलं तर, पाहिलं व दुसरं महायुद्ध हे चित्रपटा साठी काही नवीन विषय नाहीत. दर १-२ वर्ष-आड यावर एखादा चित्रपट निघतो, हॉलिवूडवाल्याना नवनवीन पटकथा या इतिहासातून मिळणं फार सोपं आहे असं दिसतं. तेवढ्या पुरती दर्जेदार पटकथेचा source म्हणूनच युद्धा ची उपयुक्तता मान्य करू. ब्रॅड पिट चा FURY साधारण दोन वर्षां पूर्वी येऊन गेला, एक Sherman Tank अन त्याचा crew यांच्यावर केंद्रित कथा खिळवून ठेवणारी होती. पटकथा, अभिनय, निर्मितीमूल्ये अशा सर्वच बाबतीत कमी न पडणारा हा चित्रपट या पंक्तीतला एकटा नसेल याची खात्री बाळगायला हरकत असायचे कारण नाही.

थोडं मागे जाऊन पाहिलं तर Inglorious Bastards, Saving Private Ryan, Schindler’s List अशी कित्येक नावं या यादीत सापडतील. स्पीलबर्ग सारख्या दिग्दर्शकांनी हा विषय पुन्हा पुन्हा हाताळलेला दिसतो. नाझी छळ छावण्यां पासून ते rescue ऑपरेशन्स पर्यंत किंवा Tarantino च्या alternate history सारख्या वेगळ्या वळणाच्या सादरीकरणा पर्यंत वैविध्य पाहायला मिळते.

पण या सर्वांहून ही महत्वाचं म्हणजे हा चित्रपट घेऊन येतोय तो ख्रिस्तोफर नोलन!

त्याचे मागचे काही चित्रपट पहिले तर त्यात विज्ञान-कथा चा समावेश अधिक दिसतो. Interstellar, Inception, किंवा डार्क Knight Trilogy, Prestige सारखे चित्रपट दिल्या नंतर, त्याच्या दिग्दर्शनात ह्या वेगळ्या थिम वरचा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

नोलन च्या चित्रपटा मध्ये पटकथा असो की दिग्दर्शन, सर्व बाबतीत तो एक सेरेब्रल ट्रीट असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही…!

ही बघा चित्रपटाची झलक :

 

====

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version