Site icon InMarathi

शाळेसाठी जागा नव्हती, म्हणून त्याने स्वत:च्या घरातच ‘शाळा’ थाटली!

school-marathipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शिक्षण हे माणसाला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण अपुरे राहिल्यास माणसाला खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. अशिक्षित लोकांना काही गोष्टी लक्षात न आल्यामुळे किंवा कोणत्याही वस्तूंचा हिसाब न लावता येत असल्याने त्यांना फसवले जाते. त्यामुळे अश्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे असते. शहरामधील बहुतेक मुलांना शिक्षण मिळते, पण गावामध्ये राहणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी खूप धडपड करावी लागते. हलाखीची परिस्थिती असल्यामुळे काही मुलांना आपले शिक्षण मधेच सोडावे लागते. प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी देखील या मुलांना कितीतरी किलोमीटर पायी जावे लागते, पण आता सरकारने सर्व शिक्षा अभियानामार्फत सर्व मुलांना शिक्षण देण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहेत.

snehadharafoundation.org

सर्व शिक्षा अभियान ही योजना भारतामध्ये २०१० पासून चालू करण्यात आली. पण या योजनेवर सरकारने २००० – २००१ पासूनच काम करण्यास सुरुवात केली होती. या योजनेने भारतामधील २७२ जिल्ह्यातील आणि १८ राज्यातील मुलांना शिक्षण दिले आहे. मुलांना कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी योग्य रीतीने मिळावे असा या योजनेचा हेतू आहे. ६ ते १४ वर्षातील मुलांना या योजनेमार्फत शिक्षण दिले जाते. या योजनेला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरु केले होते. आज आपण याच योजेनेने अंतर्गत कर्नाटकातील एका गावातील मुलांना कसे शिक्षण दिले आणि त्यासाठी गावातील एका माणसाने कशी मदत केली, याबद्दल जाणून घेऊया..

प्रत्येक दिवशी वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणाऱ्या जीवन संसाधानांमुळे लोकांना या संसाधनांचा अभाव सहन करावा लागत आहे. कर्नाटकमधील एका भागामध्ये एवढी कमतरता झाली होती कि, मुलांना शिकवण्यासाठी देखील येथे कोणतीही जागा नव्हती. राज्य सरकारने कर्नाटकामधील सिरसीच्या इसलूर गावामध्ये मुलांसाठी एक रेजिडेंशियल शाळा स्थापन करण्याची योजना आखली होती. पण गावामध्ये अशी कोणतीच जागा नव्हती, जिथे ४० मुले देखील बसायची व्यवस्था होऊ शकते.

newindianexpress.com

सरकारच्या सर्व शिक्षा अभियान या योजनेमार्फत शाळा स्थापित करण्याची योजना येऊन देखील मुलांची मुलांची शाळा बंद होत आहे, हे पाहून गावामध्ये राहणाऱ्या शशिधर भट्ट यांनी आपल्या घरामध्येच शाळेची व्यवस्था केली. याबद्दल शशीने सांगितले की,

जेव्हा मला समजले की, माझ्या गावामध्ये सुरु होणारी शाळा ही सुरु होण्याच्या आधीच बंद होत आहे, हे ऐकून मला खूप दु:ख झाले. मी मुलांसाठी काहीतरी करू इच्छित होतो. याबद्दल मी माझ्या मुलाचा सल्ला घेतला आणि तो शाळेसाठी घर देण्यास तयार झाला.

या शाळेचे नाव डॉ. आंबेडकर रेजिडेंशियल ठेवण्यात आले. ज्यामध्ये गेल्या ४ महिन्यापासून ३६ मुले आणि मुली आपले शिक्षण घेत आहेत. हे सर्व मुले गावातील वेगवेगळ्या समुदायातील आहेत आणि एकत्र येऊन शिक्षण घेत आहेत. भट्टने फक्त आपले घरच शाळेसाठी दिले नाही, तर भविष्यात ५ क्लास ते शाळेसाठी बनवू इच्छित आहेत.

pinimg.com

यावरून हेच लक्षात येते कि, भट्टसारखे लोक सर्वच गावांमध्ये असतील, तर कोणत्याही गावातील मुले शिक्षणाअभावी राहणार नाहीत. भट्टने हे सत्कार्य करून माणुसकीचा नवीन आदर्श घालून दिला आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version