Site icon InMarathi

भारताला २०० वर्ष लुटणाऱ्या, जगाचा इतिहास बदलणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या जन्माचा अनभिज्ञ इतिहास

east india company inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१५ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता.

अखेर मोठ्या संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पण त्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागली होती.

 

scroll.in

 

भारतातील संपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट करून इंग्रजांनी सोन्याची चिमणी म्हटल्या जाणाऱ्या अापल्या देशाला अक्षरशः कंगाल केले.

पण इंग्रजांच्या केवळ ५ शिलिंग (भारतीय चलनानुसार आताचे १० रुपये तेव्हा याचे मूल्य अवघे काही पैसे असेल) तोट्यासाठी भारताला एवढी किंमत मोजावी लागली होती.

ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रज भारतात आले आणि त्यांनी याठिकाणी पाय रोवून भारतावर सत्ता स्थापन केली, हा इतिहास आपण सगळेच जाणतो.

पण या ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरू होण्यामागे आणि पर्यायाने भारताच्या पारतंत्र्यामागे या पाच शिलिंगच्या तोट्याचे रंजक कारण लपलेले आहे.

कारण जर हा” पाच शिलिंगचा प्रश्न” उद्भवलाच नसता, तर अशी कोणतीही कंपनीच अस्तित्वात आली नसती.

चला तर मग जाणून घेऊयात या पाच शिलिंगच्या तोट्यामागचे आणि भारतावर राज्य गाजवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीमागचे नेमके सत्य!

 

                          victorianweb.org

 

१६ व्या शतकामध्ये मसाल्यांचा व्यापार हा खासगी डच व्यावसायिकांच्या ताब्यात होता.

सप्टेंबर १५९९ मध्ये या डच व्यावसायिकांनी मीरी (मसाल्यातील पदार्थ-Pepper) महाग केले होते. मीऱ्याचे दर त्यांनी ५ शिलिंगने (इंग्लंडमधील चलन) वाढवले होते.

सध्याच्या रुपयाच्या मूल्याचा विचार करता इंग्लंडचा एक शिलिंग म्हणजे भारतातील दोन रुपये.

डच व्यावसायकांनी केलेल्या दरवाढीमुळे ब्रिटीश व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे २४ सप्टेंबर १५९९ मध्ये लंडन येथील लीडनहॉल स्ट्रीट येथे २४ व्यापाऱ्यांनी एका मिटींगचे आयोजन केले होते. त्यामध्ये या व्यापाऱ्यांनी एक नवी कंपनी (Trading firm) सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या व्यापाऱ्यांनी त्यांच्या नव्या कंपनीसाठी १२५ शेअर होल्डर्स एकत्र जमवले.

त्या सर्वांच्या माध्यामातून ७२,००० पौंड एवढी रक्कम जमवली.

या जमिनीचा कंपनीचे भांडवल म्हणून वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या व्यापाऱ्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता. तो म्हणजे अधिकाधिक नफा मिळवणे. याच उद्देशाने त्यांनी एका अशा भविष्याकडे वाटचाल सुरू केली ज्याबाबत त्यांनी कधीही विचार केलेला नसेल.

 

                     britannica.com

३१ डिसेंबर १५९९ रोजी प्रथम व्हिक्टोरिया राणीने त्यांच्या या कंपनीला रॉयल चार्टर (अधिकृत मान्यता) दिले. तेव्हापासून कंपनीने अधिकृतरित्या व्यवसाय सुरू केला. याच कंपनीला इस्ट इंडिया कंपनी म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यानंतर या कंपनीने हळू हळू पाय पासरायला सुरुवात केली आणि त्या काळातील (साम्राज्यवादाच्या काळातील) सर्वात मोठी आणि प्रभावी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.

कंपनीने विविध देशांत केलेला विस्तार आणि बदल या माध्यमातून मोठे यश मिळवले.

ऑगस्ट १६०० साली कंपनीने भारतात सर्वप्रथम पाऊल ठेवले.

समुद्राच्या मार्गे ब्रिटीश प्रथम अधिकृतरित्या भारतात दाखल झाले. सर्वात आधी ब्रिटीशांचे जहाज सूरतच्या किनाऱ्यावर आले. भारतावर साम्राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने ते पहिले पाऊल होते.

त्यानंतर १७५७ पासून ते १८५७ पर्यंत सुमारे१०० वर्षे या कंपनीने भारतावर अधिराज्य गाजवले. पण त्यानंतर १८५७ च्या क्रांतीनंतर ही कंपनी बरखास्त करण्यात आली आणि इंग्लंडने भारतावर अधिकृतपणे सत्ता गाजवायला सुरुवात केली.

कंपनीकडून एवढा मोठा कारभार सांभाळणे शक्य होणार नसल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

 

                        wikimedia.org

 

भारतावर ब्रिटीशांचे राज्य अशाप्रकारे अधिकृतरित्या सुरू झाले होते.

त्यानंतर सुमारे ९ दशकांनंतर ब्रिटीशांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता. पण तोपपर्यंत या सोन्याच्या चिमणीला पूर्पणे कंगाल करण्याचे काम ब्रिटीशांनी केले होते.

एकूण काय तर ५ शिलींगच्या महागाईच्या मोबदल्यात इंग्रज आपल्या देशातून बरेच काही लुटून घेऊन गेले.

जर डचच्या खासगी व्यावसायिकांनी त्यांचा नफा वाढवण्यासाठी मिऱ्यांचे दर वाढवले नसते किंवा इंग्रज व्यापाऱ्यांनी त्यावर एवढ्या वेगाने निर्णय घेतला नसता तर भारताचा इतिहास बराच वेगळा राहिला असता.

या ५ शिलिंगचा मोबदला भारताला सुमारे २०० वर्षांचे पारतंत्र्य आणि मोठ्या आर्थिक नुकसानीने भरून काढावा लागला.

जगाच्या इतिहासात एवढा मोठा अध्याय लिहिणारी ही घटना अगदी छोटी होती, पण त्याचा परिणाम असा होईल, याचा विचार कोणीही केला नसावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version