' सरपंच निवडणुक : विरोधक आता तरी धडा शिकतील काय? – InMarathi

सरपंच निवडणुक : विरोधक आता तरी धडा शिकतील काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

थेट सरपंच निवडणूक ही उजव्यांना फायदेशीर ठरलेली दिसत असून यामुळे वर्षानुवर्षे सर्व बाबतीत मॅनेजमेंट करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीचे नुकसान झाल्याचे दिसते आहे. थेट निवडणुकीत सर्वांना आपल्या मनाप्रमाणे सरपंच निवडण्याचा अधिकार मिळालेला दिसत आहे. आधीच्या काळात आपल्या सोयीनुसार प्रभाग पाडून राजकारण करण्यात वा इतर अनेक गोष्टी करण्यात काँग्रेसी लोकांचा हातखंडा असे. थेट नगराध्यक्ष व थेट सरपंच या प्रकारात ही गोष्ट मागे पडलेली दिसतेय. भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात हातपाय पसरणे हे महाराष्ट्रातील सरंजामी लोकांसाठी घातक ठरणार असून असेच चालले तर अनेक वेळा नोटबंदी होऊन तिचा फायदा जरी झाला नाही तरी भाजपची पाळंमुळं घट्ट होताना दिसतील.

 

bjp-marathipizza01
ste.india.com

महाराष्ट्र राज्यात थेट सरपंच वा थेट नगराध्यक्ष निवडून येत गेले तर राजकारणात आमूलाग्र बदल होऊ शकतात. नगरपरिषदा ते ग्रामपंचायती पासून महसूल ते पोलीस विभागात पुरोगामीत्वाचे बुरखे घातलेले व पूर्वीच्या प्रस्थापित लोकांच्या तालावर नाचणारे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत. साम्राज्य कोणतेही आले तरी अधिकारी त्याला काम करू देत नाहीत. भाजपची सत्ता दीर्घकाळ राहिल्यास यात चांगले लोक येऊन बदल अपेक्षेप्रमाणे झाले तर काय हरकत आहे? राजकारण हे घरपट्टी, असेंसमेंट, मृत्यूनोंद ते जन्मनोंद पासून सुरू होते ते सातबऱ्याच्या वारसनोंदीपासून ते हक्कसोडपत्र होईपर्यंत चालते हे भाजपला समजले नसेल काय?

आपले सरकार या शासनाच्या पोर्टलमुळे महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचारी प्रकरणे विविध बोर्डावर आल्याने त्याची नोंद मंत्रालय स्तरावर घेतली गेली असं दिसतंय. निदान पोलीस तरी तक्रारी फटाफट घेतात. दुसरा विषय सरकारच्या समर्थनार्थ नाही पण रेरा सारखा कठोर कायदा आल्याने बिल्डर व रियल इस्टेटवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. जनसामान्यांना लोन वगैरे स्वस्त दरात मिळाले तर त्यांचा फायदा जाहिरातीतून तरी दिसतो आहे. या गोष्टी जनतेपर्यंत कदाचित गेल्या असाव्यात.

 

rera-marathipizza
amazonaws.com

घोटाळ्यातील फक्त एकच आरोपी विशेष पाठिंबा नसल्याने वाऱ्यावर आहेत. बाकीचे प्रॉव्हिजनल आरोपी आत जातात का नाही याची जनता वाट पाहत आहे. मूळ प्रकरण समजून घ्यायचे तर असे समजेल की सत्तेत राहून विरोध करणाऱ्या लोकांचे सहयोगी देखील भाजप मध्ये जात आहेत यानेच अनेक गोष्टी समजू शकतात. मूळ प्रवाहात पैसे नाहीत पण शासन प्रवाह अडवून सुद्धा तेजीत म्हणावे लागेल. भाजपची घोडदौड अशीच सुरू राहिली तर एकूणच विरोधकांना सारे मुश्कील आहे व त्यांना भाजपच सक्षम पर्याय दिसतोय हे राणेंच्या भूमिकेने सिद्ध होतय.

सरपंच निवडणुकीत बुलेट ट्रेन, शिवस्मारक, इंदू मिल हे मुद्दे न काढता भाजप निवडून कसे आले हे गावपातळीवर गेल्याशिवाय समजणे अशक्य आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडून देखील याचे उत्तर मिळू शकणे कठीण आहे, कारण त्यांच्याही यशाच्या वा लढाईच्या निवडणूक प्रक्रियेत एक पाऊल भाजप पुढे गेलेलं दिसतंय.

मध्यंतरी पुरस्कार वापसी गँग परत आली होती. ती पुरस्कार वापस केल्याच्या पश्चातापसह त्यांचे धोरण सरदार सरोवर प्रकल्पात न्हाऊन निघाल्याने संतप्त होती. एक दोन निषेध व मेणबत्ती मोर्चे वगळता काही सक्सेस झाले नाही. वातावरण थोडा वेळ गढूळ होते, परत तंग होते व लोक जुने विसरतात. लोक पर्वाचा एल्फिन्स्टन चा अपघात विसरले महाडचा पूल पडला हे ही विसरले.

 

election-marathipizzza
hindustantimes.com

एक महत्वाचे नमूद करावेसे वाटते की परिस्थिती जरी बिकट असली तरी एकही भाजपचा घोटाळा समोर न आल्याने व सिद्ध न झाल्याने सारे काही आलबेल म्हणावे लागते आहे. विकास वेडा झालाय वगैरे म्हणण्यापेक्षा विरोधक निवडणुकी आधी शहाणा होऊन भाजपवासी झाला असे म्हणावे लागेल आणि विरोधीपक्षातल्या उरलेल्या गाळामुळेच कमळ फुलत आहे असे खात्रीने म्हणावे लागेल व कमळावर लक्ष्मी विराजमान असते हे ज्याला कळले नाही तो कसला राजकारणी…!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?