Site icon InMarathi

या ८ कारणांमुळे विदेशी पर्यटक भारताकडे जास्त आकर्षित होतात!

incredible-india Feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या हिंदुस्थानातून सोन्याचा धूर निघायचा ही गोष्ट खूप आधीपासून आपण ऐकत आलो आहोतच, म्हणूनच कदाचित पहिले मुघल मग ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांनी आपल्यावर बरीच वर्षे राज्यं केलं, तर आपल्या देशाच परकीयांना वाटणार आकर्षण ही काही नवीन नाही!

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध धर्म, पंथ, जातीचे लोक आपल्याला येथे पाहायला मिळतात. विविध परंपरा आणि सण असलेला आपला भारत सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतो.

 

yatrablog,com

 

संस्कृती जपण्यामध्ये भारत कुठेही मागे पडलेला नाही. विदेशातील दरवर्षी कितीतरी लोक भारतामध्ये पर्यटनासाठी येतात.

आपण आपल्याच देशाला कधी – कधी नावे ठेवतो, पण परदेशातील लोक नेहमी भारताची स्तुतीच करताना आपल्याला दिसतात.

पाहुण्यांना देव मानायची रीत, पहिल्यापासूनच आपला देशात चालत आलेली आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला येणारी परदेशी माणसे ही बहुतेकदा चांगलाच अनुभव घेऊन त्यांच्या देशात परततात.

भारतामध्ये मिळणारे पदार्थांमधील वेगळेपण, कदाचितच तुम्हाला दुसऱ्या कोणत्या देशात पाहण्यास मिळेल.

 

allunnedstolnow.blogsopt

 

सर्व धर्मातील माणसे येथे पाहण्यास मिळतात, त्यामुळे हे सर्व पाहण्यासाठी आणि भारताला जवळून अनुभवण्यासाठी बहुतेक विदेशी लोक भारतामध्ये येतात.

चला तर मग जाणून घेऊया अश्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या विदेशी लोकांना देखील भारतात पर्यटनासाठी येण्यासाठी आकर्षित करतात!

 

१. पदार्थांमधील विविधता

 

masala wala

 

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये असलेली विविधता परदेशी पर्यटकांना खासकरून आवडते. शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतामध्ये उत्तम मिळतात.

चटणी, करी आणि भाज्यांचे मोहक वर्गीकरण पर्यटकांना आकर्षित करते. वडापाव आणि चटणी यांसारखे रस्त्यावरील पदार्थ देखील त्यांना आवडतात आणि हे पदार्थ ते मोठ्या आवडीने खातात.

 

२. भारताचा इतिहास

 

YouTube

 

भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती हे सुद्धा परदेशी पर्यटकांना आकर्षित करते, भले त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केले आणि आपल्याला पारतंत्र्यात टाकलं, त्यामुळेच आपल्या लोकांना हा असा अजरामर इतिहास घडवता आला रचता आला!

आज देशातल्या प्रत्येक राज्याला आणि छोट्यातल्या छोट्या गावाला सुद्धा काही ना काहीतरी ऐतिहासिक वारसा लाभला आहे,यांचे कारण एकच देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येकाने भारताच्या या इतिहासात त्यांच योगदान दिलेलं आहे!

भारताचा इतिहास हा चित्र, शिल्प आणि शिलालेखांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. राजे – राजवाडे, क्रांतिकारी चळवळी यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

 

३. पर्यटन स्थळे

 

the fact research

 

पर्यटन या क्षेत्रात भारताने खूप उंच भरारी घेतली असून, विविधतेच्या दृष्टीने भारताचा भूगोल हा अभिमानास्पद आहे. केरळचे बॅकवॉटर असो किंवा लेह – लडाखचा उंचीवरील रोमांचकारी प्रवास असो. अश्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांसाठी भारत प्रसिद्ध आहे. विदेशी पर्यटकांना ही पर्यटन स्थळे खूप भावतात.

आग्र्याचा ताज महाल, गंगा घाटावर होणारी पूजा, कुंभमेळा, कोकणातलं निसर्गसौंदर्य, काश्मीर मधली घाटी या सगळ्यांच असं स्वतंत्र असं काही वैशिष्ट्य आहे आणि या सगळ्या विविधतेमुळेच बाहेरच्या देशातल्या लोकांना यांचे आकर्षण वाटते!

 

४. विधी, परंपरा आणि संस्कृती

 

desiblitz

 

विधी, संस्कृति परंपरा यामध्ये तर भारताला मागे टाकण मुश्किल आहे, कारण हजारो वर्षांपासून आपल्या कडे रूढी परंपरा धार्मिक विधी कर्मकांड यांना खूप महत्व दिल गेल आहे! अगदी बारशापासून अंत्यविधिपर्यंत प्रत्येक विधिला काहीतरी अर्थ आहे, शास्त्रीय कारण आहे!

खासकरून विवाहाच्या परंपरा आणि उत्साहवर्धक धार्मिक विधी अनेक वेळा विदेशी पर्यटकांवर छाप सोडून जातात. भारतामध्ये साजरे करणारे सण पाहण्यासाठी हे पर्यटक मोठ्या उत्साहाने येतात.

काही विदेशी सेलिब्रेटी देखील भारतीय संस्कृतीनुसार विवाह करण्यासाठी उत्सुक आहेत. येथील विवाहाची भव्यता आणि अतिथी पाहून त्यांना येथील विवाह सोहळा खूप आवडतो.

 

५. भारतीय साहित्य आणि संगीत

 

gkwala

 

भारताने जगाला अमर्त्य सेन आणि रवींद्रनाथ टागोर यांसारखे नोबेल लॉरेट्स दिलेले आहेत. भारताच्या पंडित रविशंकर यांनी वूड्सस्टॉक फेस्टिव्हलमध्ये आपल्या अभिनयाने जगावर विजय मिळवला. त्यामुळे भारतीय साहित्य आणि संगीत विदेशातील पर्यटकांना भुरळ घालते.

 

६. स्मारके

 

business today

 

भारतातील आग्रामधील ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे आणि त्यानंतर अजिंठा – वेरूळ गुहा आणि खजुराहो मंदिर हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

आणि सध्या गुजरातमध्ये नुकतेच उद्घाटन झालेले Statue of Unity हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाच आकर्षण जास्त आहे, कारण या स्मारकाची ओळख आता जगातील सर्वात उंच स्मारक अशी झाली आहे!

 

७. भारतीय प्रजाती

 

youtube

 

भारतात काही दुर्मिळ आणि जवळपास नामशेष प्रजाती पाहण्यास मिळतात. रॉयल बंगाल टायगर, उत्तर – पूर्व अभयारण्यांमध्ये असलेला गेंडा इत्यादींसह विविध पर्यावरणातील गोष्टी प्रसिद्ध आहेत.

जिम कॉर्बेट यांच्या कादंबरीमध्ये भारताच्या सफारीबद्दल आणि पशुसंवर्धनास देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल सांगण्यात आलेले आहे. या भारतीय प्रजाती पाहण्यासाठी पर्यटक खासकरून भारतात येतात.

८. अतिथी देवो भव

 

dailymail.co.uk

 

भारतामध्ये भारतीय पर्यटन मंडळाकडून आमीर खान यांच्यामार्फत अतिथी देवो भवो हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे हसतमुखाने स्वागत केले जाते.

त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन आपल्या भारताचे नाव खराब होऊ नये, असा यामागचा हेतू आहे आणि आज प्रत्येकजण यामध्ये सहभागी झालेले आहेत.

ह्या आणि यांच्यासारख्या कितीतरी गोष्टी विदेशी पर्यटकांना आपल्या भारतात पर्यटनाला येण्यासाठी आकर्षित करतात. तुमचे देखील काही मत असले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version