महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दु:शासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महाभारत हा आपल्या हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा ग्रंथ मानला जातो. महाभारतामधील घडलेल्या घडामोडी ह्या आपल्याला वाचताना स्वतः अनुभवल्यासारख्या वाटतात.
द्रोपदीने पाच पांडवांबरोबर केलेला विवाह, सारीपाटामध्ये पांडवांनी हरलेले संपूर्ण राज्य, पांडव आणि कौरव यांच्यामधील युद्ध, कृष्णाने पांडवांना केलेली मदत या महाभारतातील सर्व गोष्टी खूपच विलक्षण आहेत.
मूळ महाभारताबद्दल इतरत्र जाणून घेताना सर्व पांडवांच्या नावांचा वारंवार उल्लेख होतो. परंतु सर्वच कौरवांच्या नावांचा उल्लेख होत नाही.
ज्यांना महाभारताचे सखोल ज्ञान आहे त्यांना या कौरवांची नावे माहिती असतील पण सामान्य वाचकांना आजही दुर्योधन, दु:शासन आणी फार फार तर दुर्मुख ही तीनच नावे माहित असतात.
गांधारीला मिळालेल्या वरदानामुळे तिला १०० कौरव झाले, हे आपल्याला माहीतच असेल. हे सर्व कौरव माहित नसले तरी, दुर्योधन आणि दु:शासन हे तर तुम्हाला नक्कीच माहित असतील.
पण तुम्हाला हे माहित आहे का? की त्यांना ही नावे कशी पडली, नाही ना. ते एक मोठे आश्चर्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागील रहस्य..
कौरवांचे वडील धृतराष्ट्र आणि आई गांधारी होती. धृतराष्ट्र हे जन्मापासूनच दृष्टिहीन होते.
आपला पती दृष्टिहीन आहे हे समजल्यावर पत्नीधर्माचे पालन करत गांधारीने देखील आपल्या डोळ्यावर आजन्म पट्टी बांधून ठेवण्याचा संकल्प केला होता. एकदा महर्षी व्यास हस्तिनापुरात आले असताना गांधारीने त्यांचा उत्तम पाहुणचार केला.
त्यामुळे खुश होऊन व्यासांनी तिला वरदान मागण्यास सांगितले. त्यानुसार गांधारीने आपल्या पोटी शंभर पुत्रांनी जन्म घ्यावा जे अतिशय शूर असतील असा वर मागितला.
त्यामुळे गांधारीला गर्भधारणा झाली. पण दीर्घकाळ गर्भधारणा होऊन देखील तिला मुल झाले नाही.
यामुळे गांधारी क्रोधीत झाली. महर्षी व्यासांनी आपल्याला फसवले असा समज करून चिडलेल्या गांधारीने स्वत:च्या पोटावर भयानक प्रहर केला. त्यानंतर तिच्या पोटामधून शंभर मांसाचे तूकडे बाहेर आले.
महर्षी व्यासांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ही गोष्ट तत्काळ ओळखली आणि त्यांनी तडक गांधारीला गाठले. आपले वरदान कधीही वाया जाणार असे सांगून व्यासांनी तिला तुपाचे १०० कुंड (लहान भांडे) तयार करायला सांगितले.
महर्षी व्यासांनी त्या मांसाच्या तुकड्यांना तुपासह १०० वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवले. ही भांडी दोन वर्ष तशीच झाकून ठेवण्यात आली.
त्यानंतर पहिले भांडे दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस उघडण्यात आले. त्यामध्ये एक मुल आढळले आणि हा मुलगा म्हणजेच दुर्योधन होता.
जेव्हा दुर्योधन जन्माला आला, तेव्हा तो दिवस खूप भयानक होता. सगळीकडे अशांती होती आणि घुबड, लांडगे संपूर्ण राज्यात ओरडत होते.
त्यावेळी महर्षी व्यास यांनी धृतराष्ट्राला सांगितले की, ‘तुझा सर्वात मोठा मुलगा हा या राज्यासाठी हानिकारक आहे, त्याला कुठेतरी बाहेर सोड, येथे ठेवू नकोस.
पण त्यावेळी धृतराष्ट्राने त्यांचे ऐकले नाही आणि पुढे खरंच दुर्योधनाने पूर्ण राज्याची हानी केली.
दुर्योधनाचे खरे नाव सुयोधन हे होते. असे मानले जाते की, त्याच्या वाईट कर्मामुळे त्याचे नाव बदलले गेले. काही दंतकथेनुसार काही लोक मानतात की, दुर्योधनाने स्वतःचे नाव स्वतःच बदलले होते.
सुयोधन या नावाचा अर्थ होतो, ‘खूपच भारी योद्धा’ आणि दुर्योधन या नावाचा अर्थ “असा कोणीतरी जो कधीही होऊ शकत नाही.” आता तुम्हाला समजले असेल की, त्याने त्याचे नाव का बदलले.
दु:शासन हा दुर्योधनाचा धाकटा भाऊ होता आणि दुर्योधनाला आपला हा भाऊ खूप प्रिय होता. दु:शासनाचे खरे नाव सुशासन होते. पण त्याने केलेल्या चुकांमुळे त्याचे नाव बदलून दुष्यासन करण्यात आले.
काही लोकांचे असे देखील मत आहे की, कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या युद्धादरम्यान जेव्हा भीमाने दुर्योधनाला, दुर्योधन म्हणून संबोधले होते, तेव्हा त्याला खूप राग आला आणि तो भीमाला म्हणाला,
“मला दुर्योधन म्हणू नको, माझे नाव सुयोधन आहे.”
दुर्योधनाला ‘काली’ नावाच्या राक्षसाचा अवतार मानले जाते. दुर्योधनावर त्याच्या शकुनीमामाचा खूप प्रभाव होता. तो शकुनीच होता, ज्याने दुर्योधनाला पांडवांबरोबर युद्ध करण्यास सांगितले होते.
अशी ही या दुर्योधन आणि दु:शासन यांच्या नावामागची कथा आहे. संपूर्ण महाभारत घडण्यामागे ह्या दोन भावांची महत्त्वाची भूमिका होती आणि म्हणूनच महाभारतातील ही दोन पात्रे दुर्लक्षित न करता येण्यासारखी आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.