आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्याइथे राजकारण आरोप प्रत्यारोप हे सगळं चालूच असतं, त्यात मग कधी कधी आपल्या सैन्यातलेसहूर जवान भरडले जातात तर कधी त्यांनी वापरेले टॅंक, फायटर जेट्स किंवा युद्धनौका!
सेवेतून निवृत्त होण्याच्या आधी भारतीय नौदलाचे अविभाज्य अंग म्हणून प्रसिद्ध असलेली आयएनएस विराट ही युद्धनौका ३ वर्षांपूर्वी चर्चेत आली होती!
यावेळी कारण असे आहे की, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही युद्धनौका खाजगी कौटुंबिक सहलीसाठी वापरल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता!
या आरोपाबद्दल समाज माध्यमांवर बरीच चर्चा रंगली होती, बऱ्याच माध्यमांनी यात त्यांची पोळी भाजून घेतली!
जी युद्धनौका राजीव यांनी वापरली ती आयएनएस विराट भारतीय नौदलासाठी इतकी खास का होती? या लेखातून जाणून घेऊ..
भारतीय नौसेना जहाज विराट हे भारतीय नौसेनेतील एक विमान वाहक जहाज आहे. १९९७ साली INS विक्रांत ला सेवानिवृत्ती दिल्यानंतर INS विराटने त्याची कमी पूर्ण केली होती.
भारतीय नौसेनेने १९८० च्या दशकात ही युद्धनौका जवळजवळ साडे सहा कोटी डॉलरमध्ये विकत घेतली होती. १२ मे १९८७ ला या नौकेला सेवेत सामील केलं गेलं.
भारताआधी ही युद्धनौका १९५९ मध्ये ब्रिटनच्या रॉयल नेवीच्या सेवेत होती. याने रॉयल नेवीत २७ वर्ष सेवा दिली, तेव्हा याला एचएमएस हर्मिस या नावाने ओळखले जात असे.
१९५९ ते १९८५ सालापर्यंत हा रॉयल नेवीच्या अखत्यारीत होता.
भारतीय नौसेनेने कित्येक देशांच्या युध्दनौकांचे परीक्षण केल्यानंतर या युद्धनौकेला विकत घेतले.
यानंतर या जहाजात अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या जेणेकरून हे जहाज पुढील एक दशकापर्यंत कार्यशील राहील. यातील तांत्रिक सुधार हे देवेनपोर्ट डॉकयार्ड येथे झाले.
INS विराटने ब्रिटिश रॉयल नेवीतर्फे अर्जेन्टिना विरुद्ध फॉकलैड युद्धात देखील भाग घेतला होता. या युद्धनौकेचा निर्माण १९४३ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान करण्यात आला होता.
या युद्धनौकेवर एका वेळी १५०० सैनिक तैनात राहत होते, तर तीन महिन्याचं रेशन घेऊन ही युद्धनौका समुद्रात निघायची.
हिच वजन २४ हजार टन होतं. हिची लांबी ७४३ फुट आणि रुंदी १६० फुट होती.
या युद्धनौकेचा वेग ताशी ५२ किलोमीटर होता. आतापर्यंत INS विराटने ९ लक्ष ३० हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे.
जगातील सर्वात जास्त काळापर्यंत सेवा देणारी ही एकमेव युद्धनौका असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये देखील INS विराटचं नाव दाखल करण्यात आलं आहे.
INS विराट ला ‘ग्रेट ओल्ड लेडी’ या नावाने देखील ओळखले जाते.
विराटवर १२ डिग्री कोन वाला एक स्की जंप आहे जो सी हैरीअर श्रेणीच्या लढाऊ विमानांना उडाण घेण्यास उत्तम आहे. या जहाजावर एका वेळेला १८ लढाऊ विमानं ठेवता येतात.
यावर ७५० लोकांच्या राहण्याची सोय आहे तसेच ४ छोटी नावे देखील आहेत ज्या सैनिकांना किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
त्या काळात इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने कव्हर केलेल्या माहिती नुसार, राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ख्रिसमस साजरी करण्यासाठी गांधी परिवार लक्षद्वीप येथे गेले होते!
तेंव्हा त्या बोटीवर त्यांच्यासोबत काही परदेशी पर्यटक सुद्धा होते, इतकंच नव्हे सुप्रसिद्ध कलाकार अमिताभ बच्चन आणि त्यांचा परिवार सुद्धा या सेलिब्रेशनसाठी तिथे हजर होते!
शिवाय नुकतंच कॉँग्रेस चीफ आणि राजीव गांधी यांचे सुपुत्र राहूल गांधी यांनी सुद्धा एक जाहीर स्टेटमेंट दिलं, ज्यात त्यांनी म्हंटल की “माझे वडील पंतप्रधान असताना मी त्यांच्या सोबत आयएनएस विराट वर गेलो होतो!
त्याचे फोटोग्राफ सुद्धा आहेत, पण ती एक ऑफिशियल व्हिजिट होती, आणि मी माझ्या वडिलांसोबत गेलो होतो! आम्ही कधीच त्या युद्धनौकेचा वापर सहलीसाठी केला नाही!”
असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.