Site icon InMarathi

सोन्याचे विमान आणि ७००० कार्सचा ताफा; ‘सुलतानाचा’ राजेशाही थाट!

Brunei sultan IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्‍ये गणना झालेल्या ब्रुनेईचा सुलतान मध्यंतरी पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यांनी आपला छोटा मुलगा प्रिन्स अब्दुल मलिकच्या राजेशाही विवाहाचे रिसेप्शन आलीशान नुरुल इमान पॅलेसमध्‍ये आयोजित केले होते. विशेष म्हणजे पॅलेस ग्रँड गोल्ड प्लेटने सजवण्‍यात आले होते.

 

abc.net.au

 

सुलतान हसनल यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो. कारण आहे तेलविहिरी. १९८० च्या शेवटी सुलतानला प्रथमच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश झाला. मात्र १९९० मध्‍ये अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी हा बहुमान त्यांच्याकडून हिसकावून घेतला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सुलतान यांची एकूण संपत्ती जवळपास २,८०,००० करोड रुपये आहे. ते नेहमी सोन्याचे विमान आणि कार घेऊनच बाहेर पडतात. या व्यतिरिक्त त्यांच्या गॅरेजमध्‍ये सात हजाराहून अधिक कार उभ्या आहेत. सुलतान यांचा जन्म १५ जुलै १९४६ मध्‍ये ब्रुनेई टाऊन झाला.

त्यांचे परदेशात शिक्षण झाले आहे. आयलँड ऑफ बोरनियोतील ब्रुनेई एक छोटासा देश आहे. सुलतान हसनल बोलकियाला तीन पत्नी आहेत. पहिली पत्नी सध्‍या त्यांच्याबरोबर राहत असून बाकीच्या दोघींनी घटस्फोट घेतला आहे.

d.ibtimes.co.uk

 

त्यांना महागड्या कारचे संग्रह करायला आवडते. फरारी वॅगनाजेशन्स, एस्टन मार्टिन आणि बेंटलेसह अनेक आरामदायी कार त्यांच्याकडे आहेत. बेंटले ही सुलतानांची सर्वात आवडती लक्झरीयस कार. त्यांच्या गॅरेजची लांबी-रुंदीही  पाच विमानाच्या हँगरप्रमाणे आहे.

 

qph.ec.quoracdn.net

 

सुलतान यांच्याकडे ७ हजार सुंदर गाड्या आहेत. यात ६०० मर्सिडीज कार आहेत. अंदाजे यांची किंमत ५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त असण्‍याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याकडे एक गोल्ड प्लेटेड कारही आहे.

 

i.ytimg.com

 

सुलतान यांच्याकडे स्वत:चे बोइंग 747-400 विमान आहे. ते एका महालापेक्षा कमी नाही. विमानाच्या आत एक लिव्हिंग रुम, बेड रुम आणि खूप सोनं आहे. हे जेट पूर्णपणे अ‍ाधुनिक उपकरणांनी सज्ज असून एक रिमोट कंट्रोल डेस्कही आहे.

 

i0.wp.com

 

त्यांच्या जवळ बोइंग 767-200 हे विमानही आहे. त्याची निर्मिती बोइंग कमर्शियल एअरप्लॅन्सने केली आहे. या व्यतिरिक्त एक एअरबस ए 340-200 या विमानाचा समावेश आहे. यात २६१ प्रवाशी बसू शकतात.

 

काय? आहे की नाही एकदम अलिशान लाईफ?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version