Site icon InMarathi

Takeshi’s Castle येतोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला, चला मग खदखदून हसण्यासाठी तयार व्हा!

castle-marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

टेलिव्हिजनवर लागणारे कार्यक्रम बहुतेकांना आवडतात, फक्त प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात. काहींना डेलीसोप आवडतात, तर काहींना कॉमेडी शो. पण कॉमेडी शो हे आपल्याला दिवसभरातील थकवा कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडतात. कॉमेडी शो हे आपल्याला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी गरजेचे आहेत. आपण विविध कॉमेडी शो बघतो, पण सर्वात भारी आणि पोट धरून हसायला लावणारा शो म्हणजे Takeshi’s Castle. पोगोवर लागणारा हा शो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. पोगोवर लागणारा हा शो एकदा बघितल्यावर तुम्ही परत स्वतःहून पाहाल असा होता. जावेद जाफरीच्या मजेशीर कोमेंट्रीने त्यात अजून रंगत भरली होती. तसे बोललात तर, लहानांपासून मोठ्यापर्यंत या गमती – जमती पाहून नेहमीच खदखदून हसत असत.

imgur.com

कोण विसरू शकतो, त्या पडणाऱ्या – झडणाऱ्या लोकांना, जनरल लीच्या भावना नसलेल्या भयानक चेहऱ्याला आणि प्रत्येक गोष्टीवर मिमिक्री करणाऱ्या जावेद जाफरीला. दररोजचा संध्याकाळचा टाइमपास असायचा Takeshi’s Castle. जर तुम्ही देखील य शोचे चाहते असाल आणि या शोची आठवण अजून काढत असाल, तर तुमची वाट पाहण्याची वेळ आता संपली आहे, कारण Takeshi’s Castle आता परत एकदा तुमच्या भेटीला येत आहे.

blogspot.com

Takeshi’s Castle हा शो खूप जुना आहे. २ मे १९८६ मध्ये या शोचा पहिला एपिसोड आला होता. Takeshi’s Castle हा एक जॅपनीझ गेम शो आहे आणि हा गेम शो १९९० पर्यंत चालला होता. त्यावेळी हा शो खूप पॉप्युलर झाला होता. त्यामुळे हाच शो भारतामध्ये हिंदीत डब करून दाखवला गेला. जावेद जाफरीने केलेले ते डबिंग भारतीय फॅन्सना खूप आवडले. हा शो जपानमधील टोकियो ब्रॉडकास्टिंग सिस्टम हे नेटवर्क प्रदर्शित करत असे.

डिजिटल स्पायमध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले होते कि, आताच्या Takeshi’s Castle य शोची शूटिंग थायलंडमध्ये होईल आणि हा शो ह्याच वर्षी कॉमेडी सेन्ट्रलवर दाखवण्यात येईल. या शोच्या इंग्रजी वर्जनची कोमेंट्री ब्रिटीश टॉक शो होस्ट जोनाथन रॉस करतील. आता फक्त हीच आशा आहे कि, या शोची हिंदी डबिंग जावेदने करावी, कारण त्यांच्याशिवाय हा शो अपुरा असल्यासारखा आहे. जावेदने याबद्दल अजून काही सांगितले नाही आहे.

ytimg.com

चला तर मग आता पुन्हा एकदा त्या स्पर्धकांच्या धडपडी आणि जनरल ली पाहण्यासाठी तयार व्हा. त्यातील प्रत्येक मज्जा अनुभवण्यासाठी आता जास्त वेळ घालवावा लागणार नाही, असे आता दिसतंय. मग काय आता रोजच्या कामातील थकवा, संध्याकाळी हा शो पाहिल्यानंतर कुठे निघून जाईल, हे समजणार देखील नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version