' “मला मोदीच नवरा हवा गं बाई!” : मोदींशी लग्न करायचं म्हणून जंतरमंतरवर आंदोलन! – InMarathi

“मला मोदीच नवरा हवा गं बाई!” : मोदींशी लग्न करायचं म्हणून जंतरमंतरवर आंदोलन!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासूनआजवर बरेच मोठे निर्णय घेतलेत.  कित्येक लोकांना प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे आपल्या निर्णयांसमोर झुकवले. आजवर मोदी सरकार विरोधात कित्येक विरोधकांनी आवाज उठवला, आंदोलने, निदर्शने, केलीत. पण मोदी कुणा समोर नमले नाही. मोदींनी आपल्या परदेश दौऱ्या दरम्यान जवळजवळ सर्वच मोठ्या देशांशी मैत्री संबंध जोडले, वाढवले. त्यांच्या समर्थकांचा तर असा विश्वास असतो की अशक्य अशी सर्व कामे शक्य करून दाखविण्याची शक्ती मोदींमध्ये आहे.

मात्र आता त्यांच्यासमोर जी समस्या उद्भवली आहे, त्यातून त्यांना देवच सावरेल…!

 

modi01-marathipizza
viralinindia.net

तुम्हाला दिल्ली येथील जंतर मंतर तर माहितच असेल. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांपासून ते बड्याबड्या राजनीतिक व्यक्तिमत्वांनी आपापल्या मागण्यांसाठी या मैदानावर धरणे आंदोलने केलीत. तेच जंतरमंतर आता पुन्हा एका धरणे आंदोलनासाठी चर्चेत आहे. पण यावेळी येथे कुणी राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ता धरणे देऊन नाही बसलाय. तर एक स्त्री मागील एक महिन्यापासून धरण्यावर बसली आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवल.. अहो नवल ती धरण्यावर बसली याचं नाही तर ती ज्या मागणीकरिता बसली आहे त्याच आहे… आणि ती मागणी म्हणजे,

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न करायची!

होय…ही महिला “औंदा लगीन करायचं बाई, मला मोदीच नवरा हवा गं बाई!” असा हट्ट धरून आंदोलनाला बसली आहे!

 

jaipur-woman-modi02-marathipizza
yuotube

या महिलेचं नाव जय शांती वर्मा आहे. त्या  ४० वर्षीय असून, एक महिन्यापूर्वी दिल्लीत आल्या आणि तेव्हापासून त्या जंतर मंतरवर धरणे देऊन बसल्या. आता या बाईची मागणीच अशी आहे की, त्याला कोणीच काही करू शकत नाही. जय शांती यांना नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न करायचं आहे, हे ऐकायला जरा विचित्र वाटतं. पण हेच ते कारण ज्यामुळे ८ सप्टेंबर पासून त्या धरणं देऊन बसल्या आहेत.

 

jaipur-woman-modi002-marathipizza
youtube

आतापर्यंत आपण एखाद्याला लग्नासाठी प्रपोज करण्याचे अनेक प्रकार बघितले असतील. पण एखाद्या देशाच्या पंतप्रधानांना लग्नासाठी मागणी घालण्यासाठी चक्क आंदोलन करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रकार असावा. अभिनेता/अभिनेत्री यांना अश्या प्रकारच्या मागण्या येणं हे तर रोजचच. पण देशाच्या पंतप्रधानांना अशी मागणी घालणं हे आश्चर्यकारकच.

modi03-marathipizza
intoday.in

पंतप्रधानांशी तुम्ही लग्न का करू इच्छिता असे विचारल्यावर जय शांती यांनी सांगितले की,

मला मोदींची वागणूक खूप आवडते, तसेच त्यांच्या गरीब-गरजू लोकांची सेवा करण्याच्या भावनेपासून मी खूप प्रभावित झाली आहे.

त्या सांगतात की त्या एकट्या आहेत. त्याचं लग्न झालं होतं, पण त्यांच्या पतीने त्यांना धोका दिला. यामुळे ते नातं तुटलं. लग्नाच्या एका वर्षानंतर १९८९ साली त्यांचे पती त्यांना सोडून गेले. त्या तेव्हापासून एकट्याच आहेत. त्यांना एक २० वर्षांची मुलगी देखील आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी अनेक स्थळ आलीत, पण पंतप्रधान मोदींच्या व्यक्तित्वाने त्यांना प्रभावित केले.

आता त्या मोदींशी लग्न करून त्यांची सेवा करू इच्छितात. त्याचं म्हणणं आहे की, त्यांच्या पतीने त्यांना धोका दिला, हे दुःख मोदी समजू शकतील.

 

jaipur-woman-modi-marathipizza
ndtvimg.com

जय शांती यांनी जंतर मंतर येथे पंतप्रधानांसोबत स्वतःचा एक फोटो आणि एक बॅनर लावला आहे. ज्यावर त्यांनी स्वतःची इच्छा लिहिली आहे. त्या म्हणाल्या की जोपर्यंत त्या मोदीना नाही भेटणार तोपर्यंत त्या आपलं धरणे आंदोलन सुरूचं ठेवतील. एक महिन्यापासून धरण्यावर बसलेल्या जय शांती या गुरुद्वारा आणि मंदिरात जाऊन जेवतात.

 

modi02-marathipizza
viralinindia.net

याला म्हणतात समस्या…! 😀

मोदींनी देशासंबंधी, आपल्या पार्टीसंबंधी अनेक समस्यांचा सामना केलाय. पण आता ते या समस्येतून कसे बाहेर पडतील हे बघणं खरचं उत्सुकतेचं ठरेल…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?