शरियाचा विरोध करणाऱ्यांनासुद्धा त्याचं सौदीतील “हे” इतकं भयावह रूप माहिती नसतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतात बलात्काऱ्यांना शरिया कानून प्रमाणे शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अनेक जणांकडून वारंवार करण्यात आली. अर्थात ती भारतासारख्या लोकशाही देशासाठी कितपत योग्य आहे हा कळीचा मुद्दा ठरू शकतो, असो आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या शरिया कायद्याबद्दल फारशी माहिती नाही.
नक्की हा कायदा कसे काम करतो? त्याने बलात्काऱ्यांना चाप कसा बसेल हे प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आले असतील.
चला जाणून घेऊया काय आहे हा कायदा!
सौदी अरेबियामध्ये शरिया कायदा प्रभावीपणे. या ठिकाणी याच कायद्याप्रमाणे न्याय निवाडा केला जातो. शिवाय गुन्हेगाराला कडक शिक्षाही केली जाते.
मानवाने केवळ रसूलने सांगितलेला आदेशच पाळावा, असे इस्लाम सांगतो. हा आदेश म्हणजेच शरियत कायदा होय.
सौदी अरेबियामध्ये ना पंतप्रधान आहे ना राष्ट्रपती. विशेष म्हणजे या ठिकाणी खासदारही नाही आणि भारताप्रमाणे विविध राजकीय पक्षसुद्धा नाहीत. या देशात आजही राजेशाही आहे.
जेव्हा सौदी अरबियाचे राजा किंग अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला, त्या नंतर तेथील एक लेखक रईफ बदावी यांच्या ब्लॉगमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जावे, अशी मागणी केली होती.
पण त्या ऐवजी त्यांना शरिया कायद्याप्रमाणे शिक्षा म्हणून चाबकाचे १,००० फटके मारण्यात आले.
आपल्याकडे प्रशासन सेवेतील आयएएस हे पद सर्वात मोठे आहे. सौदीमध्ये अशाच प्रकारे जर कुणाला अधिकारी होण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती राजघराण्यातीलच असावी लागते.
विशेष म्हणजे सौदी अरबमधील ७ हजार राजवंशींना अगदी सहजतेने आयएएसच्या समकक्ष नोकरी मिळाली. राजघराणे हाच त्यासाठी एकमेव निकष आहे.
या ठिकाणी राजा ५०० ते ६०० वर्षांपूर्वीप्रमाणे आपल्या गादीवर कोण बसणार याची घोषणा करतो. त्यासाठी ज्येष्ठता हाच एकमेव निकष आहे. ९० वर्षीय अब्दुल्ला यांनी निवृत्ती घेत आपला उत्तराधिकारी म्हणून लहान ७९ भाऊ सलमान यांची निवड केली होती.
सौदीमध्ये कुणी चोरी केली, हे सिद्ध झाले तर त्याचे हात कापले जातात. काही छोटा – मोठा गुन्हा केला तर त्याला गुन्ह्याचे गांभीर्य पाहून चाबकाचे फटके दिले जातात.
नियमांच्या बाबतीत अतिशय कडवट देश म्हणून सौदी अरबची ओळख आहे. या देशात अजूनही १० वर्षांच्या मुलीचे लग्न लावून दिले जाते.
सौदीमध्ये आपल्याप्रमाणे दंड संहिता ( पिनल कोड) नाही. तेथील न्यायाधीश इस्लामी शास्त्रांप्रमाणेच गुन्हेगाराला शिक्षा देतात.
इस्लाममध्ये मक्का आणि मदिनाला पवित्र शहर मानले जाते. दरवर्षी येथे जगभरातून मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव येतात. परंतु, या शहरात गैर-मुस्लिमांना जाण्यास बंदी आहे. गैर-मुस्लिम व्यक्तीला या देशाचे नागरिकत्व दिले जात नाही.
शिवाय या देशात पर्यटन, नोकरी, व्यवसायासाठी इतर देशातून आलले गैर-मुस्लीम आपल्या धर्मानुसार पूजा, प्रार्थनाही करू शकत नाहीत. तसे केल्यास तो गुन्हा आहे. या देशात जादूटोणा करण्यावर बंदी आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक स्पेशल पोलिस पथक आहे.
शिवाय कुणी जर जादूचे प्रयोग करून दाखवत असेल तर तो गुन्हा आहे. अशा व्यक्तीचा गळा कापून त्याला मृत्यूदंड दिला जातो. याच कायद्यामुळे येथे ‘हॅरी पॉटर’सारख्या चित्रपटावरही बंदी आहे.
घरातील कर्ता पुरुष महिलांना जोपर्यंत लेखी परवानगी देत नाही, तोपर्यंत महिला विमानात बसू शकत नाहीत.
सौदीमध्ये महिलेसोबत प्रत्येक वेळी तिचा पिता, काका, भाऊ किंवा मुलगा असा एकतरी पुरुष सोबत असलाच पाहिजे. परंतु, अनोळखी पुरुषासोबत या देशात कुठलीही महिला मग ती स्थानिक असो की विदेशी तिला अनोळखी फिरण्याची परवानगी नाही.
सौदीमधील महिलेला शिक्षण, नोकरी, प्रवास एवढेच नाही तर वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना पुरूषांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. याशिवाय पुरुष सोबत नसेल तर त्या कोणतीही तक्रार देखील दाखल करू शकत नाहीत. त्यामुळे न्याय मिळणे तर लांबची गोष्ट आहे.
अश्या प्रकारे ह्या देशातील कित्येक गोष्टी ह्या शरीया कायद्याप्रमाणे लागू आहेत, ज्या प्रत्येकाला पाळाव्याच लागतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.