Site icon InMarathi

मृत्यू म्हणजे नेमकं काय? – सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घ्या!

death marathipizza

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जन्म आणि मरण यामधील काळ म्हणजे जीवन. जन्म होणे म्हणजे काय हे तर सर्वश्रुत आहे, परंतु मरताना नेमकं काय होतं याबद्द्दल अनेक जणांकडून आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील. पण ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, हे आपल्याला माहिती नसतं.

चला…माणूस मरताना शास्त्रीयदृष्ट्या नेमक्या कोणत्या प्रक्रिया होतात ते आपण जाणून घेऊया.

१) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंदू बंद पडल्याने माणसाचा मृत्यू होतो.

मेंदू बंद पडला नाही तर माणूस जिवंत राहून पुन्हा क्रियाशील होऊ शकतो. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्यामुळे पुन्हा जिवंत झाल्याची उदाहरणे ऐकिवात आहेत.

 

 

२) ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे मेंदू काम करणे थांबवतो.

ऑक्सिजन शिवाय मेंदू काहीही काम करू शकत नाहीतर. त्यामुळे श्वासोच्छ्वास बंद झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प होतो आणि आपसूकच मेंदू बंद पडण्यास सुरुवात होते.

 

 

३) मेंदूने काम थांबवल्‍याने न्यूट्रॉनचे काम ठप्‍प होते.

 

 

४) मेंदू शरिरातील विविध भागांकडे हार्मोन्स पाठवणे बंद करतो. ज्यामुळे शारीरिक प्रकिया बंद होतात.

 

 

५) मांसपेशी, अवयव शिथील होतात.

त्‍यामुळे काही जणांचे मलमूत्र आपोआप बाहेर येते.

 

 

६) रक्‍तप्रवाह थांबल्‍याने शरीर थंड पडून पिवळे पडायला लागते.

 

 

७) नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडतात, दृष्टी स्थिर होते, शरिरावरील केस ताठ होतात. आणि अखेर माणूस गतप्राण होतो.

 

 

८) ही संपूर्ण प्रक्रिया होण्यास 10 ते 15 मिनिटांचा कालावधी जातो.

 

 

९) मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात.

म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते.

 

 

तर अशी आहे मृत्यूची प्रक्रिया !

ह्या प्रक्रीयेमुळे वैज्ञानिक दृष्टीकोन असणाऱ्या लोकांसाठी “आत्मा निघून जातो म्हणून माणूस मरतो” या गोष्टींमधे विश्वास वाटत नाही…कारण त्या सिद्ध करता येत नाही…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version